कामापुरता नर
एखादं मधमाशांचं पोळं भरात आलं की त्या झाडाखाली जमिनीवर काही मधमाशा मृतावस्थेत आढळतात. त्या नर माशा असतात. नरांचं काम संपलं की राणीमाशी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवते. किंवा सरळ त्यांना रक्षक माशांकडून मारले जाते. ती मात्र आपली अंडी उबवण्यातच धन्यता मानते. किती हा विरोधाभास! म्हणजे ज्या नरांमुळे आपल्या उदरी नवी पिढी जन्म घेणार आहे, त्या पित्यांनाच यमसदनास पाठविण्याचा हेतू काय?
कोळ्याच्या मादीने आपलं अंडं उराशी बाळगून कोळीष्टक विणलं की त्यात गुरफटला जातो तो अंडे फलित केलेला नरच. तिच्या लेखी त्याचं ‘काम’ संपलेलं असतं. तसा तो देहयष्टीनं तिच्यापुढे लिंबू टिंबूच असतो म्हणा.
मिसळपाव