Skip to main content

घोषणा

लेखक सरपंच यांनी गुरुवार, 03/02/2011 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
घोषणा - हा भाग व्यवस्थापनाकडून वेळोवेळी केल्या जाणार्‍या घोषणांकरीता आहे. तसेच येथे मिपाच्या आगामी योजनांची माहिती देण्यात येईल. नवीन सोई आणि त्यात सदस्यांना आलेल्या अडचणी ते येथे मांडू शकतात. आज येथे मिपावरील एक सदस्यं आमोद शिंदे यांना प्रतिबंधीत करण्यात आले आहे अशी घोषणा करण्यात येत आहे. त्यांचेशी संपादन मंडळाने सातत्याने संपर्क साधला आहे. मात्र त्यांनी सहकार्य करायचे नाकारले आहे. त्यांना याबाबत अधीक काही म्हणायचे असल्यास नीलकांत यांना मेल करावा. तसेच अन्य सदस्यांनासुध्दा असे आवाहन करण्यात येते की त्यांनी मिसळपावच्या रोजच्या घडामोडींत संपादकांवर ताशेरे ओढू नयेत.

रोटी कशी बनववी?

लेखक धनुअमिता यांनी गुरुवार, 03/02/2011 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
कोणीतरी मला सा॑गाल का की हॉटेलमध्ये जशी रोटी बनवतात तशी घरी तव्यावर कशी बनवावी? खुप खुप आभर.

आजकाल कावळ्याचे खिडकीवर बसून ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 03/02/2011 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
काऊ तोगे कोकताहे शकुणतोगे मागताहे आजकाल कावळ्याचे खिडकीवर बसून शकून देणे खोटे ठरू लागलेय काल कावळा ओरडत होता माझ्या माहेरच्या घराच्या खिडकीवर बसून मान तिरपी करून वाटले येतात की काय हे ..? मन कसे उधाणले ह्यांची आठवण येऊन कशी उठली शिरीशिरी नि मन गेले हरवून घराच्या बाजूची पाउल वाट सापासारखी वळत गेलेली नागमोडी टोकाला गुलमोहराचे झाड गाडी तेथेच उभी राहते लाल रंगाची हे उतरले की दिसतील मला खिडकीतून किती आसासून गेलेय मन ह्यांच्या आठवणीने सेल दिलाय सोबत पण रेंज येतेय कोठे ...? म्हणून कावळ्याने दिलाय शकून काऊ तोगे कोकताहे शकुणतोगे मागताहे मी वाट बघतेय सकाळची गा
काव्यरस

खारे शंकरपाळे

लेखक स्वाती दिनेश यांनी गुरुवार, 03/02/2011 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारी आजी आजोबा गेले ऑस्ट्रीयन आल्प्स मध्ये हिंडायला. त्यांना अशा ट्रीपमध्ये च्यावम्याव खायला म्हणून नेहमी खारे शंकरपाळे आवडतात.(रेड वाइन बरोबरचा त्यांचा आवडता चकणा आहे तो..) ह्या वेळी मी थोड्या वेगळ्या प्रकारे हे शंकरपाळे केले. ह्यावेळी थोडे वेगळे मसालेही त्यात घातले.

कर्तव्य

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 03/02/2011 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
" काल रात्री कुणीतरी मिल्टन नावाची बाई तुम्हाला फोन करत होती" उठवायचस ना. "रात्री एक वा़जता"? काय म्हणत होती? "नीटसे काय कळत नाही. पण अमेरिकन वाटत होती. कोण ही"? माहीत नाही ब्वॉ? "तुम्ही परत फोन लावा बघु माझ्या समोर. काय ते मला पण कळू दे" वेडी की काय तु. अमेरिकेला फोन लावायची जहागिरदारी ? हॅट. असेल गरज तर परत फोन करेल. ----------------------------------------------------------------------------------------- "उठा आता. बघा तीच बया परत फोनवर आहे. काय बोलते आहे ते कळले तर शप्पथ." हॅलो. "प्र्फुमॅस्टर, मी पॅरिस हिट्लन .

परग्रहावरील जीवसृष्टींचा शोध.

लेखक प्यारे१ यांनी गुरुवार, 03/02/2011 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
मराठेंची विज्ञानकथा वाचून पूर्वी मनात आलेला एक थोडा वेगळा विचार मांडावासा वाटला. माहितगार व्यक्ति (मुख्यत: भौतिकशास्त्राचे अभ्यासक) शक्याशक्यतांचा विचार करुन अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया देतील ही अपेक्षा. पृथ्वी हा ग्रह मुख्यत्वे 'पृथ्वीतत्वा'पासून बनला आहे. (मॅटर????) त्यातून आलेल्या /मिळालेल्या/ प्रक्रिया केल्या गेलेल्या धातू, वगैरेंपासूनच (जी पृथ्वीतत्वाची आहेत) आपली उपकरणे बनलेली आहेत. तसेच येथील जीवसृष्टी ही पृथ्वी तत्वापासून बनलेली. आपण इतर ग्रहांवरील जीवसृष्टीचा शोध घेताना या उपकरणांचाच वापर करतो आहोत.

देव जरी मज...

लेखक अमित करकरे यांनी गुरुवार, 03/02/2011 07:06 या दिवशी प्रकाशित केले.
'देवबाप्पा खूप पॉवरफुल व ग्रेट आहे. त्याला सर्व जगाची काळजी असते. देवबाप्पाला शांत मुले व मोठ्यांचे ऎकणारी मुलेच आवडतात. तो आपले सारे हट्ट पुरे करतो. आजी म्हणते की आपण त्याचे ऎकले नाही की त्याचा कोप होतो, तो चिडतो व आपल्याला शाप देतो. तो खुश असेल तर आपण मागू ते मिळतं… मी कधीच देवबाप्पाला भेटलेलो नाही पण तो जसा वागतो अगदी तसेच माझे बाबा सुध्दा वागतात, मग माझे बाबाच देव आहेत का?’ – इयत्ता तिसरीमधील एका मुलाने विचारलेला एक प्रश्न. काय उत्तर देणार? तुम्ही देव माना अथवा मानू नका, पण प्रत्येकाचे देवाबद्दल काही ना काहीतरी मत हे असतेच, मग ते अगदी देवाला कधी रिटायर करायचे, याबद्दल का असेना.

जैतापूर प्रकल्प

लेखक चन्द्रशेखर सातव यांनी गुरुवार, 03/02/2011 03:26 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच लोकसत्ता मध्ये जैतापूर प्रकल्पाच्या अनुषंगाने श्री गिरीश कुबेर यांचा लेख वाचनात आला त्यात त्यांनी अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांच्यावर शरसंधान केले आहे.या लेखातील मुद्द्यांचा प्रतिवाद करणारा श्री राणे यांचा आणि त्याच अंकात कुबेर यांचा

तारका-पुष्प

लेखक मराठे यांनी गुरुवार, 03/02/2011 03:03 या दिवशी प्रकाशित केले.
माझं नाव डॉ. सुधा देशपांडे. मी एक वनस्पती शास्त्रज्ञ आहे. मी आज इथे हे लिहून ठेवतेय.. कदाचित कोणालातरी आमची परिस्थिती कळेल.. कदाचित त्यांना आमची दया येईल आणि आमचं दुसर्‍या कुठल्यातरी ग्रहावर पुनर्वसन करतील... अर्थात याची शाश्वती नक्कीच नाही. सत्तावीस वर्ष झाली त्या गोष्टीला... आकाशातून पाउस पडावा तशी पुष्प-वृष्टी होउ लागली होती. सगळा फुलांचा पाउस त्यांनीच पाठवला होता. चिटुकली चंदेरी, सोनेरी रंगांची फुलं... सगळ्या जगभर त्यांची बरसात झाली होती. एकही देश एकही गाव सुटलं नव्हतं.

निकोल किडमन दुसर्‍या ऑस्करकडे ~ मुलासाठी व्याकुळ झालेली बेक्का कॉर्बेट...!

लेखक इन्द्र्राज पवार यांनी गुरुवार, 03/02/2011 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
हॉलीवूडमध्ये फारच थोड्या अभिनेत्रींचा प्रवास "ग्लॅमर गर्ल" ते "सीरिअस अ‍ॅक्ट्रेस" असा झाला आहे (आपल्याकडील 'रेखा' या अभिनेत्रीने असा प्रवास केला होता असे म्हणता येईल). अलिकडील काही वर्षात प्रामुख्याने नाव समोर येत आहे ते आहे "निकोल किडमन" हिचे.