Skip to main content

झेंडा मराठीचा

लेखक गणेशा यांनी बुधवार, 02/02/2011 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो मराठीचा सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य उगवतो मराठीचा कीतीही डोंगर पोखरले परक्यांनी तरीही सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा कण्हत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये घुमतो आवाज मराठीचा एकतेची साद घेवुनी संवाद मराठीचा शब्द चिंगार आवाज मराठीचा संस्कार दिसे खुलुनी साजशृंगार माय मराठीचा हाती तेजोमय तलवार तळपते रणांगणात गर्जतो यलगार मराठीचा गरजले परके सारे जरी घरात आपापल्या नभी उठतो बुलंद आवाज हा ललकार मराठीचा शिवबाची ज्योत ह्रदयी ठेवतो तेवत, बाणा मराठीचा . . . . . . . . . . .
गणपा यांच्या विशेष सहाय्याने

कविता का सुचली ...

लेखक अभिषेक९ यांनी बुधवार, 02/02/2011 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
कोणास ठाऊक कविता का सुचली ... उत्कटतेत कदाचित निर्मिली उदात्ततेत कदाचित उमटली सौंदर्य अविष्कारात कदाचित रेखाटली.. कविता, नक्की घडते कशी?? भावनांची उत्कटता उमटली असावी पण मला कशी जमली नियतीने शिकवली तिने रंगविली बाहेर पडली ती उत्कटता बाहेर पडली ती उग्रता बाहेर पडली ती भेसूरता भाव-भावनांची... कदाचित, नियतीचा हा खेळ नसता, तर नसती 'ती' पण कदाचित, अनभिज्ञच असतो मलाच मी, स्व-अर्थाचा हा आविष्कारच झाला नसता म्हणून का नियतीने हा रंग दाखविला? माझ्यातल्या मी ला 'मी' दाखवायला...

पाव भाजी

लेखक गणपा यांनी बुधवार, 02/02/2011 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या कडे पाव-भाजी न आवडणारा विरळाच असावा. भाज्यांच्या नावे बोटं मोडणारी चिल्ली-पिल्ली पाव भाजीचं ताट समोर आल तर यथेच्छ ताव मारतात असा आज वरचा अनुभव आहे. सध्या इथे केक खाउन-खाउन तोंड आल असेल म्हणुन पाव भाजी टाकायची गुस्ताखी करतोय. साहित्यः २-३ मध्यम आकाराचे कांदे. (बारीक चिरुन.) २ मध्यम आकाराच्या भोपळी/सिमला मिरच्या (बारीक चिरुन.) २-४ टॉमेटो.

माझे लेख चोरले गेलेत !

लेखक मितान यांनी बुधवार, 02/02/2011 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच एका मित्राने सांगितले की माझे लेख चोरले गेलेत. http://www.marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:335404 ही लिंक पण दिली. या पल्लवी शेलार कोण बाई आहेत ते मला माहीत नाही. इथे जाऊन बघितले तर माझ्या दोन बालकथा माझ्या परवानगीशिवाय स्वतःच्या नावावर टाकल्या आहेत. ब्लॉगवर कॉपीराईट्स चे चिन्ह असतानाही ! मित्र सांगत होता या साईटवरचे जवळजवळ सगळे लेखन चोरलेले आहे ! कोणती कारवाई करावी ? कशी ? कृपया आपणही आपले लेख इथे आहेत का ते बघावे.

गोष्ट माझ्या भावाची

लेखक कच्ची कैरी यांनी बुधवार, 02/02/2011 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशा यांनी लिहायला प्रोत्साहन दिल्यामुळे ह्या सदरात लेख लिहिण्याचा श्रीगणेशा करीत आहे माझा पहिलाच लेख असल्याने काही चुकल-माकलं तर आपल म्हणून तुम्ही समजून घ्यालच (अपवाद-टारझण ) याची खात्री वाटते . तर खालील कथा ही माझ्या लहान भावाची आमच्या लहान पणीची असून ती रंगविण्यासाठी अजिबात माल-मसाला वापरला नाहीये जसे आठवले तसेच्या तासे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे . माझा भाऊ पप्पू माझ्यापेक्षा २ वर्षांनी लहान ,एकुलता एक असल्यामुळे घरात सर्वांचा लाडका,(आईचा नाही ) म्हणून त्याला जराही खरचटले तर सगळ्या घरालाच ताप यायचा आणि त्यामुळेच मी आणि माझा लहान मामा (नानामामा) नेहमीच त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत

नवी पहाट ...

लेखक स्पा यांनी बुधवार, 02/02/2011 06:58 या दिवशी प्रकाशित केले.
PHOTOSHOP च्या बेसिक ब्रश चा वापर करून, एक उगवती सकाळ रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक बाप आपल्या मुलाला उगवत्या सूर्याचं रूपड दाखवतोय

नेवाळी ?

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 02/02/2011 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
ही वेल गेली अनेक वर्षे आहे. छाटणीमुळे विस्तार मर्यादीत असला तरी खोड बोटभर जाड झालेल. रोप आणल्यावरच काय जी फुले आली असतील ती. त्या नंतर मात्र जवळपास ५ वर्षांत फुले आली नाहीत; किंबहुना या वेलीली फुले येतात याचा विसर पडला. आणि अचानक गेल्या आठवड्यापासुन वेल बहरली. हा वेल कुंदाचा नक्कीच नाही. बहुधा नेवाळीचा असावा. कुठलाका असेना? त्यावर फुललेल्या फुलांनी खुश करुन टाकले. सकाळी जग आल्यावर प्रथम त्या फुलांवरच नजर जाते आणि मग दिवस सुरू होतो. आपल्याला आनंद देणार्‍या या छोट्या गोष्टी. बहर संपायच्या आत फुले चित्रबद्ध केली.

इजिप्त कैरो आणि हुस्नै मुबारक

लेखक कापूसकोन्ड्या यांनी मंगळवार, 01/02/2011 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे बाण्णव (का ब्याऐंशी ) वर्षांचे हुस्न मुबारक सत्ता सोडत नाहीतच पण तिथली जनता विषेशतः तरूण आणि स्त्रीया यांनी मनावरच घेतले आहे की त्यांना सत्तेवरून खाली खेचायचेच आणि ते रस्त्यावर उतरले आहेत. इन्टरनेट आणि टिव्ही चॅनेल्स या बातम्यांनी ओसंडून वहात आहेत. अपेक्षा आहे की याविषयावरची चर्चा रोचक आणि मनिरंजक ठरेल. ( युद्धस्यः कथा रम्या: ) मिपावर खूप चांगली आणि महत्वाची माहिती नेहमीच मिळते. एक सामान्य वाचक आणि उत्सुक मिपा सदस्य म्हणून खालील काही प्रश्न पडतात. १) या गोष्टीना असलेली पार्श्वभूमी काय?