मंडळी कालच्या प्रयत्नाला मिळालेल्या प्रतिसादाला जागून आज एक नवा प्रयत्न.
ह्या प्रयत्नाला आज घरी आलेले पाहुणेही कारणीभूत आहेत.
माझी सहचारिणी चक्रधर पंथी कुटुंबातून आलेली असल्यामुळे सामिष भोजन तिला चालत नाही आणि माझ्याकडील सगळे नातेवाईक कट्टर मांसाहारी असल्यामुळे जेव्हा कोणी येते तेव्हा असले पदार्थ बनवायची जबाबदारी हि माझी असते.
तर सादर आहे खानदेशी चिकन करी ........................
जरा आटोपशीर आहे म्हणून आणि सगळ्या पायऱ्यांचे प्रकाशचित्र घेवू शकलो नाही.
अर्धा/पावून किलो कोंबडी, पाव वाटी खोबरे,२ मोठे कांदे, हळद, मीठ, जिरे , मोहरी, लसून , आले, तेजपत्ता, कोकणी मसाला , तेजपत्ता, गरम मसाला, थोडा