नागपुरी सावजी मटण - मदत हवी आहे.
मंडळी फिरण्याची हौस असल्याने आम्ही वेळ मिळेल तसे राज्यभर फिरत असतो. ठिकठिकाणी जाउन तिथल्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेणे हा तर आमचा सर्वात लाडका म्हणावा असा छंद!
काही कारणाने २००९ मध्ये नागपुरला जाणे झाले, आणि तिथल्या सावजी मटण याची चव तर अप्रतिम, अजुन जिभेवर रेंगाळते आहे! पण आमच्या मातोश्री पडल्या कोकणी, त्यामुळे त्याची रेसेपी काय असेल याचा अंदाज त्यांना बांधता आला नाही.. बरं मुंबई - नागपुर हे अंतर म्हणजे मुंबई - पुणे एवढे नाही, की आले मनात तर खास तिकडचे जेवण जेवुन येउ म्हणुन वाटेला लागायला! (होय, आम्ही पुण्याच्या खाद्यसंस्कॄतीचा आस्वाद घेण्यासाठी अधी मधी वाट वाकडी करुन पुण्याला येतो!)
तर आमची मिपावरील सर्व तंत्रकुशल खानसाम्यांना याद्वारे विनंती आहे की त्यांनी नागपुरी सावजी मटणाची पाककृती इथे द्यावी, मी त्यांचा व्यक्तिश: ॠणी राहीन, तसेच सावजी या नावाबद्दल अधिक खुलासा केल्यास उत्तम!
वाचने
7717
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
माझ्याकडील एका पुस्तकात
In reply to माझ्याकडील एका पुस्तकात by रेवती
रेवती ताइधन्यवाद.ह्या
सावजीत खोबरेल तेल??????????????
In reply to सावजीत खोबरेल तेल?????????????? by रश्मि दाते
घ्या रेसिपी
सावजी...