Skip to main content

गणपास समर्पित

लेखक इरसाल यांनी शनिवार, 05/02/2011 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
तसा मी कधी कधी जेवण बनवतो. पण आज म्हटलं कि गणपाने दिलेली पाकृ वापरून पाव भाजी बनवून बघावी म्हणून हा प्रपंच. तर मंडळी गणपा वंदन करून केलेली पावभाजी गणपाने सांगितल्याप्रमाणे अपूर्व तयारी म्हणजे ३ बटाटे थोडे मटार थोडी फुल कोबी आणि मग पूर्व तयारी २/३ कांदे बारीक चिरून घेतले लगेहाथ टोम्यातोलाही (इची भैना ह्यो तो काय ठीक नाय होवून ऱ्हायला भाऊ ) सुरीचा इंगा दाखवला. लसून आणि आले मिक्सर मधून काढले आणि त्यात २ हिरव्या मिरच्या पण टाकल्या. खानदेशी माणूस म्हटलं कि .................

दिलखुलास आकाशवाणी

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 05/02/2011 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारी आकाशवाणी मुंबई केंद्रावर सकाळी ७:१५ वाजता 'दिलखुलास' हा जवळपास ३० मिनिटांचा कार्यक्रम प्रसारीत होतो. राज्यातली सगळी आकाशवाणी केंद्रे त्याचे प्रसारण करतात. निरनिराळी सरकारी खाती अन त्यातील प्रमुख अधिकारी यांची एखादी मुलाखत किंवा त्या खात्याचे हाती घेतलेले कार्यक्रम असा त्या कार्यक्रमाचे स्वरूप असते. थोडक्यात सरकारी योजना कशा प्रकारे आहेत अन त्यांची अंमलबजावणी कशी केली जाते किंवा त्या त्या अधिकार्‍यांनी कसे काम केले याची जंत्री यात सादर केली जाते. सरकारी आकडेवारीही त्यात असते. तरीपण एकप्रकारचा रटाळवाणा कार्यक्रम असतो हे नक्की.

मेला मैदा

लेखक खादाड अमिता यांनी शनिवार, 05/02/2011 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
'आईईई.... प्लीईज्ज्ज... पिझ्झा कर न...किंवा नूडल्स .. पास्ता? तो पण नाही? मग नुसतं sandwich तरी कर न मग? असं काय? आम्ही काही पण करायला सांगितलं की तू नाहीच म्हणते! maggi पण नाही खाऊ देत. पिंकी ची आई तिला दररोज maggi किंवा ब्रेड बटर देते.' आमची आई: काय ते सगळे नुसते मेले मैदे खायचे असतात तुम्हाला! दूध पोळी खा पाहू मुकाट्याने! हा आमच्या लहानपणचा कायमचा संवाद. आमच्या आई ला हे माहित होतं की मैदा खाल्लेला चांगला नाही, त्यात काहीच जीवन सत्व नसतात असं ती आम्हाला सांगायची. पण जीवन सत्व म्हणजे काय? मैद्यात ती नसतात तर त्यात एवढा काय बिघडलं? किंवा मैद्यात ती का नसतात?

सल्ला हवाय .....

लेखक चिप्लुन्कर यांनी शनिवार, 05/02/2011 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
सल्ला हवाय ..... मी डोंबिवलीत मध्ये जागेचा एक सौदा दलाला मार्फत केला होता. त्या सौद्यात मी माझे काही पैसे जागा मालकाला देऊन झाले होते परंतु जागा मालकाच्या काही कौटुंबिक कारणाने त्याने तो सौदा मोडला आणि त्याने मला मी देलेल्या रकमेचे धनादेश दिले , दुर्दैवाने ते धनादेश वटले नाहीत. यावेळी तो मालक म्हणतो आहे कि तो पैसे रोखीने देईल , पण असे सांगत सांगत ८ दिवस उलटून गेले आहेत आता तो फोन उचलत नाही आणि मला आणि ब्रोकर दोघानाही भेटण्यास टाळाटाळ करत आहे . त्या संबंधी मी आणि ब्रोकर दोघेही पोलिसांकडे गेलो असता मला कोर्टात केस करा असा सल्ला देण्यात आला आहे .

पुस्तकं हवीत

लेखक मुलूखावेगळी यांनी शनिवार, 05/02/2011 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
बर्याच दिवसान्पासुन मला माझ्या आइसाठी खालील पुस्तकं हवी होती. मी दगडुशेठ च्या समोरच्या आनि A.B.C. चौकात बर्याच दुकानात पाहिली पन नाही मिळाली. १.विष्नुसहस्त्रनाम स्तोत्र ( व्याधी विनाशन प्रयोग ) लेखक- ज्योतिष मार्तंड, नं. द. वांगीकर २.तिरुमलैचा क्रुष्नमेघ - हेमलता धारवाडकर ( हे पुस्तक आउट ओफ स्टोक होते तेव्हा) ३. व्यन्कटेश स्तोत्र - निरंजन माधव ४. स्तोत्र परिमल - स.क्रु. देवधर कोनाला अधिक माहिती असल्यास प्लीज कळ्वा किन्वा कोनाकडे हे पुस्तके असल्यास म्ला क्रुपया कळवा मी त्याची झेरॉक्स करुन घेइल.

अंतर्नाद

लेखक दत्ता काळे यांनी शनिवार, 05/02/2011 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
कामाच्या ढिगार्‍यातून मी बाहेर येऊ पहातो. टेबलवरचे असंख्य विखुरलेले कागद जरा बाजूला सारून मी कॉफी तयार करायला ठेवतो. नेहमीप्रमाणे. अगदी यांत्रिकपणे. सहज खिडकीबाहेर लक्ष जातं बाहेरच्या निर्मनुष्य मैदानाकडे, शुष्कपणे पानं ढाळणार्‍या कडुलिंबाकडे आणि उंच फांदीवर बसलेल्या पांढर्‍या-गुलाबी पक्ष्याकडेही परत निघतो कामासाठी तोच ऐकू येते एक लांब, सुरेल शीळ. कदाचित त्याच पक्ष्याची. कॉफीचा कप घेऊन मी खिडकीत जातो त्या पक्ष्याला पहायला. पण ओळखू येत नाही. कुठल्या कुळातला आहे तो. परत तशीच शीळ सुंदर लयदार तान घेतल्यासारखी मग एकापाठोपाठ एक..

माझे अस्वस्थ मन व टेबलावरच्या गोष्टींतला अर्थ.

लेखक शानबा५१२ यांनी शनिवार, 05/02/2011 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
सुचना:लेखामधे नाईलाजाने काही अपशब्द टाकावे लागलेत्,लेख स्वःताच्या जबाबदारीवर वाचावा. "भे**** पुरता फसलोय रे!" मी ग्लास टॉप टु बॉटम उतरवुन बोललो. "का? आता काय झाल?

डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग १

लेखक अवलिया यांनी शनिवार, 05/02/2011 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
आपण अनेक लेख कविता वाचत असतो. त्यातील व्यक्तीरेखा आपल्या मनात घर करुन बसलेल्या असतात. कित्येकदा बोलता बोलता समोरच्या व्यक्तीचे बोलणे किंवा लेखन वाचून आपण आधी कधी वाचलेल्या कथेतील व्यक्तिरेखेशी असलेले साम्य शोधतो. कित्येकदा तसे बोलुनही दाखवतो. पण जर आपल्याला असे सांगितले की ती व्यक्तीरेखाच तुम्ही आहात असे कल्पुन त्या व्यक्तिरेखेचे मनोगत किंवा मनोव्यापार लिहा तर आपल्यापैकी किती जणांना ते जमेल? मला नाही फार हात वर होतील. एखादी व्यक्तीरेखा आपण तयार करुन उतरवणे वेगळे आणि दुसर्‍याने तयार केलेली व्यक्तीरेखा आपण पुन्हा लिहिणे वेगळे. हे येरागबाळ्याचे काम नोहे.. तेथे पाहिजे जातीचे !

सशांचे वर्ष

लेखक प्रदीप यांनी शनिवार, 05/02/2011 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या महिन्याच्या तीन तारखेपासून चिनी नववर्ष सुरू झाले. हे वर्ष सशाचे आहे. ससा भित्रा असतो, सावध असतो. त्यामुळे इतर बलवान जनावरांप्रमाणे तो मार्गक्रमणा करीत नाही. थोडे पुढे जाणे, मागे वळून पहाणे, असे त्याचे चालते. ह्याचा हवाला देऊन चिनी भविष्यवेत्ते म्हणतात की ह्या वर्षी जगातील स्टॉक मार्केट्स, प्रॉपर्टी मार्केट्स इ. 'रोलर-कोस्टर' वर राहतील. हे असे होईल किंवा नाही, हे पुढे दिसेलच. मिपापुरते सांगायचे झाल्यास ह्यावर्षी ज्यांना स्वतःच्या एका आय. डी.