Skip to main content

इंग्लिश-मराठी अनुवादक software साठी हवा आहे

लेखक मनिष यांनी शुक्रवार, 04/03/2011 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
इथल्या धोरणात हे चालेल ह्या समजुतीने देत आहे. जर आक्षेपार्ह वाटले तर उडवले तरी चालेल - इंग्लिश-मराठी अनुवादक software साठी हवा आहे. साधारण ४-५ दिवसांचे (रोज ३-४ तास ह्या प्रमाणे) काम आहे. येत्या सोमवारी सुरु केल्यास (७ मार्च), रविवार पर्यंत (१३ मार्च) पुर्ण करणे अपेक्षित आहे. काम वेळेत पुर्ण करणे ही एक महत्वाची अट आहे.
  1. घरी computer व Internet Connection असावे
  2. बारहा वापरता आली पाहिजे - http://www.baraha.com/
  3. अनुवाद करण्याचा अनुभव असल्यास उत्तम, नसला तरी चालेल.

स्वादिष्ट टोमॅटो सूप

लेखक Pearl यांनी शुक्रवार, 04/03/2011 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः ५/६ टोमॅटो, २ छोटे कांदे, मीठ, साखर, थोडीशी मिरपूड, लोणी क्रुती: प्रथम टोमॅटो आणि कांद्यांचे अर्धे अर्धे तुकडे करून घ्या. (Cut Onion and tomatos into halves.) आणि ते कुकरला लावून ३/४ शिट्या होउ द्या. मग थोड्या वेळाने कांदे-टोमॅटो कुकरमधून काढा. आता टोमॅटोची सालं काढा. मग हे कांदे-टोमॅटो मिक्सरमधून काढा. मोठ्या चाळणीने गाळून घ्या. हे गाळलेले सूप गरम करायला गॅसवर ठेवा. पाणी नाही घातलं तरी चालेल. ज्यांना पातळ सूप आवडतं त्यानी या सूपात थोडं पाणी घालावं. मग त्यात चवीपुरते मीठ, बर्‍यापैकी साखर आणि किंचित मिरपूड घाला. छान ढवळून घ्या.

५० फक्त

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 04/03/2011 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात मी माझं मिपावरचं नाव बदललं charshad चं ५० फक्त केलं. त्या संदर्भात मला विचारलेले प्रश्न १. हे का केलं ? - ब-याच दिवसापासुन होतं मनात हा बदल करायचा पण १३ फेब्रु. च्या कट्ट्यात श्री. निलकांत यांच्याबरोबर चर्चा केल्यावर यावर अंमल झाला. २. हेच का ? - आता हा दिर्घ उत्तरी प्रश्न आहे. नाही वर्ल्ड कप चालु झाला म्हणुन नाही, पण याला थोडा क्रिकेटचा संदर्भ आहे. ४ वर्षापुर्वी पर्यंत क्रिकेटचे दोनच प्रकार होते १. कसोटी आणि २.

कांद्याची चटणी------

लेखक निवेदिता-ताई यांनी शुक्रवार, 04/03/2011 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य--चिरलेले कांदा एक वाटी, चिंचेचा कोळ एक चमचा व गुळ चवीनुसार, किसलेले सुके खोबरे अर्धी वाटी, लाल तिखट, मीठ.फ़ोडणीचे साहित्य.शेंगदाणा कुट दोन चमचे. कृती-- कांदा मिक्सरमधुन काढावा , चिंचेचा कोळ व गुळ, किसलेले सुके खोबरे ,शेंगदाणा कुट, लाल तिखट, मीठ चवीनुसार.सर्व एक्त्र मिसळून वरुन खमंग फ़ोडणी द्यावी.

तेलाचा उठला बाजार

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 04/03/2011 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
इराक झाला, पाठोपाठ इराण, मग इजीप्त, बाहरीन, आता लिबीया.... हे सगळे तेलाचे राजकारण चालू आहे का? काही देशातले काही राज्यकर्ते हुकुमशहा असतील, अगदी कृरकर्मा देखील असतील. पुर्वीसारखी युद्धे खेळून जग जिंकणे आता कालबाह्य झाले. सध्याचे तंत्र म्हणजे लोकशाहीचा खून होत आहे असा ओरडा करून आपले दूरचे लक्ष्य साधायचे. तुमचे काय मत आहे? बाकी आपल्या हातात फक्त हलक्याने घ्या येवढेच असते. आहे त्या परिस्थितीत विनोद शोधायचा. म्हणून हे विडंबन- http://www.misalpav.com/node/17092

मुन्ना बदनाम हुआ..

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 04/03/2011 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
गडाफी आता असे म्हणत असेल का? मुन्ना बदनाम हुआ सॅम अंकल तेरे लिये (३ बार) मुन्ने का क्रूड नशीला, गॅस सुनहरा, करम फ़ुटेला रे क्रुड का बाम्ब हुआ, सॅम अंकल तेरे लिये मुन्ना बदनाम हुआ सॅम अंकल तेरे लिये मुन्ने का क्रूड नशीला, गॅस सुनहरा, करम फ़ुटेला रे क्रुड का बाम्ब हुआ, सॅम अंकल तेरे लिये (२ बार) मुन्ना बदनाम हुआ सॅम अंकल तेरे लिये (२ बार) सद्दाम को काटा, हुस्नी को पिटा, हुस्नी को पिटा सद्दाम को काटा, हुस्नी को पिटा, हुस्नी को पिटा है तेरे साजीश में व्हिलनी अदा रे व्हिलनी अदा हाय तुने लादीन को हव्वा बनाने मे हाय तुने लादीन को हव्वा बनाने लाखो डालर दिया लेकीन मुझको मरवाया, ड
काव्यरस

गोपे घाट आणि शिवथर घळ

लेखक केदार बर्वे यांनी शुक्रवार, 04/03/2011 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व भटक्यांना नमस्कार, पुणे आणि परिसरातील जवळ जवळ बहुतेक किल्ले बघून झाल्या मुळे २ दिवसात छोटा असा कुठला ट्रेक करता येईल असा विचार करत होतो, मध्यंतरी आनंद पाळंदे यांचे चढाई आणि उतराई हे पुस्तक वाचनात आले होते आणि त्यामुळे जुन्या घाट वाटांची पुस्तकी माहिती झाली होती, त्यातलाच एक घाट म्हणजे गोपे घाट. गोपे घाट आणि शिवथर घळ असा ट्रेक करायचा असे ठरवले, २०१० च्या पावसाळ्यातच उपांडे घाट आणि शिवथर घळ असा ट्रेक एका खासगी संस्थे बरोबर केल्याने थोडी माहिती होती तरी पण गुगल च्या मदतीने नकाशा नजरे खालून घातला, आनंद पाळंदे यांचे चढाई आणि उतराई हे पुस्तक मदतीला होतेच पण पाळंदे यांनी हे

अमेरिका

लेखक साबुदाणा खिचडी यांनी शुक्रवार, 04/03/2011 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिका अमेरिका पहाण्याची संधी आली तर नाही म्हणू नका कचर्‍याचे ढीग नाहीत झोपड्यांचे दृष्य नाही छोट्या छोट्या टपर्‍या नाहीत थुंकीभरले रस्ते नाहीत रिक्षा-स्कूटरचा किरकिराट नाही ट्रेनबाहेर प्रवासी लोंबकळत नाहीत मोटरगाड्यांची रेलचेल आहे पण ट्राफीक जॅम होत नाही येथे थंडी गुलाबी नसते अंगामासात कापरं भरते जॅकेट-कोट घातले तरी कशाकशालाच दाद देत नसते एसी शिवाय घर नाही कर्पेट शिवाय फ्लोअर नाही मोकळी जागा भरपूर आहे पण मुलांना खेळायला वाव नाही लोकांमध्ये शिस्त आहे थोडीबहुत नम्रताही आहे नाहीतरी आपण परकेच आहोत तेव्हा जुळवून घेणे भागच आहे आपली मुले मेहनत करतात खडतर मार्ग पारही करतात आधुनिक जग जाणून घेता