दहशतवाद्यांनी नेहमीप्रमाणे संवेदनशील भागांना लक्ष्य करून आपले काम साधले(?). आता पुन्हा एकदा निषेध, मेणबत्त्या, संरक्षण, हे सर्व शब्द पुढची पंधरा दिवस ऐकायला मिळेल. नेहमीप्रमाणे आपले माननीय पंतप्रधान चिंता व्यक्त करून कठोर कारवाई करण्याचे आदेश देतील. दहशतवादी काही पकडले जाणार नाहीत आणि (आपलेच काही हिरे गमावून) पकडले गेलेच तरी २०/२५ वर्षे आरामात तुरुंगात खातपीत आयुष्य काढतील. नेहमीप्रमाणे लवकरच जनता सगळे विसरून पुढच्या स्फोटाची वाट बघण्यास सज्ज होईल. तो स्फोट लोकल मध्ये, रेल्वे स्टेशनावर, बागेत, उपहारगृहात, गर्दीत, शाळेत, कि एखाद्या धार्मिक स्थळावर होईल ते सांगता येत नाही.
एव्हाना 'प्रत्येक स्फोटात १००-२०० जरी गेले तरी ह्या महान भारताला काही फरक पडत नाही', हे 'त्या' दहशतवाद्यांना समजायला हवे होते. १०/१२ हजार लोक जो पर्यंत मरत नाहीत तो पर्यंत त्यांना काय कोण गंभीर घेत नाही. त्यात कोणाचा नंबर लागणार हे मात्र देवालाच आणि त्या दहशतवाद्यांनाच ठाऊक. 'काहीही झाले तरी माझा नंबर न लागो' हाच प्रत्येक व्यक्ती आपापल्या जागी बसून विचार करत असेल. आणि नंतर ज्यांचे आप्त स्वकीय गेले कि त्यानां थोडीफार आर्थिक मदत करून आणि श्रद्धांजली वाहून आम्हाला आमचे 'कर्तव्य पार पडल्याचे' समाधान होते.
धन्य तो देश. आणि धन्य त्या देशाचे राज्यकर्ते.
'पुढच्या स्फोटात आपला नंबर लागला तर आपल्या मुलाबाळांचे कसे होईल ?' हा विचार करून त्याच्या भविष्याची चिंता करत असलेला, किंवा 'मुलाबाळांचेच काही बरेवाईट झाले तर आपला पुढे जगण्याचा आधार काय ?' हा विचार करत बसलेला 'मी'(एक सामान्य व्यक्ती).
मिसळपाव
२६/११ साठी हा स्फोट नव्हता.
भगवा दहशतवाद (काहींच्या मते)
In reply to भगवा दहशतवाद (काहींच्या मते) by अवलिया
भगवा दहशतवाद (काहींच्या मते)
हो ना आता
In reply to हो ना आता by वेताळ
आणि त्याचे भांडवल करुन मुळचा
खरतर नाना
In reply to खरतर नाना by वेताळ
खरं आहे.. काय करता येईल यावर
नुकतेच माननीय केंद्रीय
In reply to नुकतेच माननीय केंद्रीय by गांधीवादी
वा 'गांधीवादी'! लेखही छान आणि प्रतिसादही छान.
पुढचा अध्याय सुरू झाला.