Skip to main content

एकास तीन

लेखक अवलिया यांनी बुधवार, 08/12/2010 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
आमची कंपनी पर्यावरणाविषयी अत्यंत जागरुक असल्याने प्रत्येक तोडलेल्या झाडाच्या बदल्यात तीन तीन झाडे आम्ही लावली असुन कायद्याचे पालन करण्यात कोणतीही कसुर केलेली नाही आणि पर्यावरणाचे नुकसान होऊ नये याची आम्ही दक्षता घेत आहोत पावडरचे थर थापलेली हसतमुख तोकड्या स्कर्ट बाह्या घातलेली बाहुली मान वेळावुन वेळावुन पत्रकार परिषदेत सांगत होती आणि एलसीडी प्रोजेक्टरवर दाखवत होती कंपनीच्या एमडीच्या हस्ते केलेल्या वृक्षारोपणाचे फोटो केलेल्या खर्चाचा हिशोब एकाला तीन झाडे घातलेले किलोलीटर पाणी इतके टन शेणखत वगैरे.. निर्विकार मनाने पत्रकार उतरवुन घेत होते कागदावर किंवा रेकॉर्ड करत होते मोबाईलवर दुसर्‍या दिवशी छापुन आणण्यासाठी वगैरे इत्यादी हीच पीआर अशाच पद्धतीने एक दिवस हसतमुखाने सांगेल.... विस्थापित करावी लागु नये म्हणुन काही माणसे मारली पण काळजी नको एकास तीन याच प्रमाणात जन्मास घातली आहेत !
लेखनविषय:

वाचने 1992
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

ह्म्म्म... कितीही माणसे मेली तरी गंगा आरती करत राहु... बॉम्ब स्फोट कितीही झाले तरी असेच पोटार्थी जगतं राहु...

:) - छोटा डॉन

@विस्थापित करावी लागु नये म्हणुन काही माणसे मारली पण काळजी नको एकास तीन याच प्रमाणात जन्मास घातली आहेत ! क्या बात हे काळजाला चटका लावणारे वाक्य आहे

शेवट भेदक! (वाचक)बेसनलाडू

हीच पीआर अशाच पद्धतीने एक दिवस हसतमुखाने सांगेल.... विस्थापित करावी लागु नये म्हणुन काही माणसे मारली पण काळजी नको एकास तीन याच प्रमाणात जन्मास घातली आहेत !
आणि त्यावर टाळ्याही पडतील. बोचरे वास्तव.