रेखाटन - पंडित भीमसेन जोशी
पंडित जी जाऊन आता जवळ जवळ महिना झाला.... तरी त्यांचा आवाज अजून आपल्यात आहे ...असणारच आहे.
पंडितजींना भावपूर्ण आदरांजली .
( त्यांच्या एका फोटो वरून केलेले स्केच )

मीटींगमदी ठरला क ह्ये गनपती उत्सवान गावचा नाटक बसवाचा. पन ईशय कोन्ता ? कूनी म्हनालं सामाजीक ठीवा, त कुनी म्हनल सांस्क्रुतीक , त कुनी आनकी कसला चीक्कार भांडना झायली पन कुन्याव कई बी आयकना. तवा काश्या (माजा बा मंडली, काशिनाथ भोईर, पन तेला सगलीजना काश्या म्हनुनच वलीकतान. आवराच नाय तो सोता पन काशिनाथ म्हुन हाक दील्ली क पाच मिन्ट ईचार करुन ओ देतं) उबा राह्यला न म्हनला "यंदा आपून ऐतीहाशीक नाटकच कराचा. क र मास्तर ?" मास्तर कमीटीचा आद्यक्श. पन त्याचे डोल्यासमोर बांबू फिरलं. "व्हय व्हय !