चिकन पॉट पाय
दोन दिवसांपूर्वी ड्राइववे जवळ्च्या वाफयातून डॅफोडिल्सचे कोवळे कोंब डोकावताना दिसले. 'चला थंडी लवकरच पळणार तर' अस म्हणत मी उत्साहाने बियाणांचे कॅट्लॉग उघडले. पण मिडवेस्टची थंडी अशी सुखसुखी थोडीच जाणार? काल पुन्हा एकदा रेन, स्लीट, स्नोचे नाटक झाले. दोन तास उशीरा भरणार्या शाळेनेही 'विंटर वेदर वॉच' वर शिक्कामोर्तब केले.
'मॉम, वुई नीड सम कंफर्ट फूड.' लेकाची भूणभूण. कंफर्ट फूड म्हटले की माझ्या डोळ्यासमोर येतो गरम गरम मऊ भात, साजूक तूप, मेतकुट, पोह्याचा भाजलेला पापड. पण लेक पक्का हुझिअर. त्यामुळे फर्माइश झाली चिकन पॉट पायची. जोडीला मदतीचे आश्वासनही होते.
मिसळपाव
मुंब्रा देवी मंदिर
पायर्या चढताना डोंगरावर मर्कट लिला चाललेल्या दिसल्या, या नमुन्याला पटकन टिपला.