स्पायडरमॅन, सुपरमॅन अगदी गेला बाजार शक्तिमान देखील आपल्याला भुरळ पाडून गेले. जादुई, साहसी जगातल्या ह्यांच्या पराक्रमाने, साहसाने आपण थक्क होत आलो आहोत. पण ह्या नायकांच्या साहस जगात नायिका तशा दुर्मिळच आणि त्यामुळेच कॅटवूमन अनेकांना भुरळ घालते ह्यात नवल नाही. कॉमिक्स मधून भेटिला येणारी कमनीय, देखणी मांजराप्रमाणेच धूर्त असलेली कॅटवूमन थेट पडद्यावर अवतरली ती २००४ साली वॉर्नर ब्रदर्सच्या 'कॅटवूमन' चित्रपटातून. कॅटवूमनच्या जन्माची कहाणी सांगणारा हा एक सुंदर चित्रपट. टायटल्स पासून बघण्यालायक जे काही मोजके चित्रपट असतात त्यातलाच हा एक चित्रपट.
चित्रपट काही फार भव्य, साहसाने ठासून भरलेला असा नाही, पण एका सामान्य तरुणीचा कॅटवूमन पर्यंत होणारा प्रवास अतिशय छान चित्रित केलेला आहे. हेली बेरी, शेरॉन स्टोन, बेंजामिन ब्रॅट ह्या सारख्या कलाकारांनी अभिनयाची बाजू अतिशय सुंदर सांभाळलेली आहे. पेशन्स फिलिप्स (हेली बेरी) हि सौंदर्य प्रसाधने बनवणाऱ्या एका कंपनीत ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत असते. लाजऱ्या बुजऱ्या पेशन्स फिलिप्सवर ह्यावेळी पहिल्यांदाच त्यांच्या कंपनीच्या नवीन लाँच होणाऱ्या प्रॉडक्टची जबाबदारी सोपवण्यात आलेली असते. पेशन्स देखील ह्या संधीचे सोने करण्याचा तयारीने काम करत असते.
अशाच एका रात्री पेशन्सला आपल्या खिडकीखाली पहिल्यांदाच एका मांजरीचे दर्शन होते. सकाळी पुन्हा ती मांजर पेशन्सच्या खिडकीत हजर होते, ह्यावेळी मात्र ती खिडकीतून दर्शन देऊन सरळ वरच्या कठड्यावर चढते. इकडे मांजर बहुदा त्या उंच ठिकाणी अडकली असावी असे समजून पेशन्स तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करते आणि त्या प्रयत्नात स्वतःचा जीव धोक्यात घालते. खिडकीच्या कडेला लटकलेल्या पेशन्सला बघून रस्त्यावरून जाणाऱ्या डीटेक्टिव टॉम लोनचा (बेंजामिन ब्रॅट) ती आत्महत्या करत आहे असा गैरसमज होतो. मात्र शेवटी तो तिला वाचवतो आणि त्याला सत्य देखील उमगते. पहिल्याच भेटीत तो ह्या साध्या सरळ मुलीकडे आकर्षित होतो.
एके रात्री उशीरापर्यंत काम पूर्णं केल्यावर पेशन्स स्वतःच आपली डिझाइन्स पोचवण्यासाठी गेलेली असताना तिला कंपनीच्या मालकाचे व इतर लोकांचे बोलणे कानावर पडते. नवीन लाँच होणाऱ्या प्रॉडक्ट मध्ये विषारी द्रव्ये असून ते त्वचेला हानिकारक व प्रचंड घातक असल्याचे तिला समजते. आता हे बोलणे कानावर पडलेली पेशन्स जिवंत राहणे हे कंपनीच्या फायद्यासाठी नुकसानकारक आहे हे ओघाने आलेच. त्यामुळे मालकाचे हस्तक कंपनीतून थेट समुद्रात सोडल्या जाणाऱ्या पाण्याच्या पाइपमध्ये अडकवून पेशन्सचा जीव घेतात.
पेशन्सचे प्रेत वाहत वाहत समुद्राच्या कडेच्या गाळात येऊन अडकते आणि इथेच चित्रपटाला वेगळे वळण लागते. पेशन्सच्या घराभोवती घुटमळणारे मांजर आता आपल्या बरोबर अजून काही मांजरे घेऊन तिथे हजर होते. सर्व मांजरे पेशन्सच्या प्रेताला घेरतात. पेशन्सच्या शरीरावर उभे राहून ते मांजर जणू पेशन्सच्या शरीरात पुन्हा प्राणच फुंकते... आणि खरंच पेशन्स पुन्हा जिवंत होते. हा पेशन्सचा कॅटवूमनच्या रूपातला पुनर्जन्म होतो. जिवंत झालेली पेशन्स डोळे उघडून आजूबाजूला पाहते आणि आपल्याबरोबर नक्की काय घडले होते ते आठवण्याचा प्रयत्न करू लागते, मात्र तिला काहीच आठवत नाही. जिवंत झाल्यानंतरची पेशन्सची पहिली हालचाल हि अगदी मांजरीसारखीचं दाखवली आहे, तर तिला दिसणारी आजूबाजुची दृश्ये, जमिनीखालील जाणवणारी हालचाल हे दृश्य अतिशय सुंदररीत्या पडद्यावर दाखवले आहे.
आपल्यात काहीतरी बदल घडला आहे हे पेशन्सला जाणवत असते, मात्र तो नक्की काय आहे हे तिच्या लक्षात येत नाही. सकाळी पुन्हा एकदा त्या रहस्यमय मांजरीचे पेशन्सकडे आगमन होते. आता मात्र पेशन्स तिच्या गळ्यातील बेल्ट मधून तीच्या मालकाचा पत्ता शोधून काढते व मांजर परत देण्यासाठी निघते. मिळालेल्या पत्त्यावर तिची भेट एका खूपश्या मांजरी पाळणाऱ्या आणि जुन्या इतिहासाच्या अभ्यासाचे वेड असणाऱ्या प्राध्यापिकेशी होते. तिच्याकडूनच ह्या रहस्यमय मांजराचे नाव 'मिडनाईट' असल्याचे समजते. प्राध्यापिका पेशन्सला मांजरांची इजिप्तमधील दैवत असलेली गॉडेस, तिची प्रतिरुपे आणि कॅटवूमन ह्या सर्वाबद्दल माहिती देते. ति पेशन्सला तिचा एक कॅटवूमन म्हणून पुनर्जन्म झाल्याचे सांगते आणि त्या रात्री घडलेल्या घटनांची आठवण करून देते. पेशन्स मात्र हे सत्य स्वीकारायला नकार देते.
साधी सरळ पेशन्स आणि कावेबाज कॅटवूमन ह्या दोन रूपांचे द्वंद आता पेशन्समध्ये सुरू होते. साहसाची, मुक्ततेची आवड असणारी कॅटवूमन पेशन्सला बेधुंद आयुष्याकडे ओढत असते तर दुसऱ्या बाजूला अल्लड पेशन्स डिटेक्टिव टॉम लोनकडे आकर्षली जात असते. कॅटवूमन ह्या प्रकाराबद्दल आता पेशन्स इंटरनेटवरून शक्य ती सर्व माहिती गोळा करते आणि वाचते. हळूहळू आता कॅटवूमन म्हणूनच जगण्याचे तिचे आकर्षण वाढत जाते. त्यातच एका रात्री बेदरकारपणे हिंडताना ते कॅटवूमनच्या रूपात एका सोन्याचे दुकान लुटणाऱ्या टोळीला बुकलून काढते. आता तर तिच्या आत्मविश्वासात दुपटीने वाढ होते. आपल्या खुनाचा बदला घेण्याचा निश्चय आता कॅटवूमन करते आणि एकेका खलनायकाच्या मागावर निघते.
शेवटी शेवटी ह्या सर्व प्रकरणामागे तिच्या कंपनीच्या मालकाच्या बायकोचा लॉरेलचा (शेरॉन स्टोन) हात असल्याचे उघड होते. मात्र कावेबाज लॉरेल स्वतः आपल्या पतीचा खून करते व त्याचा आळ कॅटवूमनवर आणते. इकडे पेशन्सची एकूण वागणूक, तिच्या स्वभावात होणारे बदल ह्यांनी अस्वस्थ असलेल्या टॉम लोनच्या त्रासात ह्यामुळे वाढच होते. आणि एका अनपेक्षित क्षणी तो पुराव्यानिशी पेशन्सला कॅटवूमन म्हणून अटक करतो. पुढे काय होते हे पडद्यावरच बघण्यात खरी गंमत आहे.
हेली बेरीच्या सुंदर अभिनयाने आणि शेरॉन स्टोनच्या सौंदर्याने लक्षात राहणारा हा चित्रपट. अल्लड, थोडा आत्मविश्वासाचा अभाव असणारी पेशन्स ते बेदरकार, रंगेल कॅटवूमन हा विविध शेडने रंगलेला प्रवास हेली बेरी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने मोठा छान पार पाडते. कपटी आणि कावेबाज लॉरेलच्या भूमिकेत शेरॉन स्टोन भाव खाऊनं गेली आहे हे सांगायला नकोच. एकूण काय तर वयाचा विसर पाडून मनमुराद आनंद लुटावा असा हा चित्रपट तुम्ही पाहायलाच हवा.
वाचने
8125
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्याफेत सौंदर्य फुफाटा कमी
मस्त परिक्षण !!
In reply to क्याफेत सौंदर्य फुफाटा कमी by अवलिया
+१
In reply to मस्त परिक्षण !! by अवलिया
+२
In reply to +१ by टारझन
+३ +४
In reply to +२ by राजेश घासकडवी
+१
In reply to मस्त परिक्षण !! by अवलिया
+२
In reply to +१ by टारझन
सुंदर परीक्षण.... बघेन
हेली बेरी खरेच देखणी दिसते
मस्त
मराठी संस्थळावर ईंग्लिश
मराठी संस्थळावर ईंग्लिश
In reply to मराठी संस्थळावर ईंग्लिश by pramanik
+१
In reply to मराठी संस्थळावर ईंग्लिश by परिकथेतील राजकुमार
उच्चभ्रु? म्हणजे ते सर्व
In reply to मराठी संस्थळावर ईंग्लिश by परिकथेतील राजकुमार
उच्चभ्रु? म्हणजे ते सर्व
In reply to उच्चभ्रु? म्हणजे ते सर्व by pramanik
भूक्कड चीत्रपट आहे...
१) पण तूम्हाला स्त्री
In reply to भूक्कड चीत्रपट आहे... by आत्मशून्य
तम्ही तद्दन फेमीनीस्ट
In reply to १) पण तूम्हाला स्त्री by परिकथेतील राजकुमार
त्यांना मेल शॉविनिस्ट
In reply to तम्ही तद्दन फेमीनीस्ट by गवि
होय... फेमिनिस्ट त्यांनाच म्हणतात
In reply to तम्ही तद्दन फेमीनीस्ट by गवि
:)
In reply to १) पण तूम्हाला स्त्री by परिकथेतील राजकुमार
उत्तम प्रतिसाद.
In reply to :) by आत्मशून्य
पराभाऊ, आहे का यावर काही
In reply to उत्तम प्रतिसाद. by राजेश घासकडवी
आत्मुत्सु ह्यांच्याशी वाद न घालण्यात शहाणपणा आहे हे आम्हाला ....
In reply to पराभाऊ, आहे का यावर काही by परिकथेतील राजकुमार
आहो नावच त्यानी परिकथेशी संबधीत ठेवले आहे तर....
In reply to उत्तम प्रतिसाद. by राजेश घासकडवी
त्यांच्या कडून कसल्या
In reply to आहो नावच त्यानी परिकथेशी संबधीत ठेवले आहे तर.... by आत्मशून्य
लीहूकी पण तो समजण्यासाठी
In reply to त्यांच्या कडून कसल्या by परिकथेतील राजकुमार
त्यासाठी परीकथांचा त्याग
In reply to लीहूकी पण तो समजण्यासाठी by आत्मशून्य
खि:खि:खि:खि:
In reply to त्यासाठी परीकथांचा त्याग by परिकथेतील राजकुमार
मस्तं परिक्षण .....
(सौदर्य का मादकता)
कोण?
In reply to (सौदर्य का मादकता) by निनाद मुक्काम …
हा हा हा
In reply to कोण? by प्रियाली
नेहमीप्रमाणेच झकास
नेहमीप्रमाणेच झकास
In reply to नेहमीप्रमाणेच झकास by स्वानन्द
@ब्रूस विलिस आणि शेरॉन स्टोन
पण कोण?
In reply to @ब्रूस विलिस आणि शेरॉन स्टोन by निनाद मुक्काम …
काय हा ब्रूस विलीस माणूस
In reply to @ब्रूस विलिस आणि शेरॉन स्टोन by निनाद मुक्काम …
http://en.wikipedia.org/wiki/
In reply to @ब्रूस विलिस आणि शेरॉन स्टोन by निनाद मुक्काम …
ब्रूस विलिस आणि शेरॉन स्टोन
In reply to http://en.wikipedia.org/wiki/ by सविता
रुमर विलीस
In reply to http://en.wikipedia.org/wiki/ by सविता
चूक झाली खरे माझ्या पहिल्या
In reply to रुमर विलीस by प्रियाली
अरे वा..
स्वगत- हा परा हल्ली फार
In reply to अरे वा.. by स्वाती दिनेश
कुणीतरी???
In reply to स्वगत- हा परा हल्ली फार by Nile
वुई डोंट टेक नेम्स. इथे मस्त
In reply to कुणीतरी??? by मस्त कलंदर
अरेरे...
In reply to वुई डोंट टेक नेम्स. इथे मस्त by Nile
अरे नावातच 'कलंदर' आहे.
In reply to अरेरे... by मस्त कलंदर
चांगले चित्रपट परीक्षण.
परीक्षण आवडले
उत्तम
पुर्ण बघता आला नाही...