पुर्वांचल - उपेक्षीत आणि अपिरीचीत भाग. (भाग- २)
पुर्वांचल - उपेक्षीत आणि अपिरीचीत भाग.
(भाग- १)
दुसरे कोकण...पण अशांत!
आसामात मोरीगावातल्या मिंटुरंजन डेका या मित्राच्या घरी जाण्याचा योग काही वर्षांपूवीर् आला. मुख्यत: बांबूचा वापर केलेलं दुमजली घर. गंमत म्हणून घराच्या वरच्या मजल्यावर गेलो. तिथे बरीचशी अडगळ व एक छोटेखानी बोट दिसली. ब्रह्मापुत्रा सहा किलोमीटर अंतरावर असताना घरात ही नौका कशाला, असा प्रश्न मला पडला. मित्रानं त्याचं उत्तर दिलं. पावसाळ्यात पूर आला की ब्रह्मापुत्रा नदी सैरभैर होते. तळमजला पाण्याखाली जातो, मग मुक्काम पहिल्या मजल्यावर.
मिसळपाव