Skip to main content

सांदण दरी - एक प्रवास वेगळाच.

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 17/03/2011 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
भुमाता अजुन वाट पाहते आहे आपल्या लेकीची, तिच्यावर झालेला अक्षम्य अन्याय पाहिलाय तिनं, त्या कष्टांना दुर करुन त्या लाडाच्या लेकीला पुन्हा एकदा काळजाशी लावुन घेउन झोपवायचं आहे तिला. त्या पराक्रमी राजाच्या वंशाच्या दिव्यांना जोजवुन निजवताना तो प्रचंड पाळणा हलवुन हलवुन थकलेले हात आपल्या हातात घेउन काळजातुन वाहणा-या गार पाण्यात त्या हातांच्या जखमा थोड्या शांत करायच्या आहेत. या साठी त्या आईनं आपल्या काळजाची वाट उघडुन ठेवली आहे, आता फक्त वाट आहे ती लाडकी लेक येण्याची.

माझा महाराष्ट्र

लेखक श्री गावसेना प्रमुख यांनी बुधवार, 16/03/2011 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
aapla maharashtra १)आता कोठे राहीली सच्चाइ अन ईमानदारी नोकरी साठी हिडंतोय मी दारोदारी, डोके घालायला घर अन दोन वेळेची भाकरी, झेरॉक्स च्या दुकानात उधारी अन फॉर्म विक्रेत्या पुढे लाचारी, याच्याच साठी करावी लागते का ही नोकरी? २)म्यानेतुन तलवार काढल्यावर तीला चटक लागते रक्ताची, नेत्यांनाही निवडनुकीनंतर भुक लागते सत्तेची, रक्ताचाच अभिषेक द्यावा लागतो तलवारीच्या पातीला, अन मग विकतात हेच नेते महाराष्ट्राच्या मातीला.

निसर्गवेड्यांसाठी नवी भेट - पुण्याचे पक्षीवैभव

लेखक प्रसन्न केसकर यांनी बुधवार, 16/03/2011 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
एनआरसीओतर्फे `पुण्याचे पक्षीवैभव’ फील्ड गाईडचे प्रकाशन २० मार्च रोजी नॅचरल रिसोर्सेस कॉन्झर्वेटर्स ऑर्गनायझेशन (एनआरसीओ) या पुण्यातील संस्थेच्या वतीने जागतिक वनदिनाचे औचित्य साधून दिनांक २० मार्च रोजी वनाधिकारी व वन्यजीव तज्ञ श्री. प्रभाकर कुकडोलकर यांनी लिहिलेल्या `पुण्याचे पक्षीवैभव’ या पक्षीनिरीक्षकांसाठीच्या फील्ड गाईडचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

सासुबाई एक्सचेंज

लेखक जागु यांनी बुधवार, 16/03/2011 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
अँकर - नमस्कार सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही आज तुमच्यासमोर नविन कार्यक्रम घेउन आलो आहोत ज्याचे नाव आहे सासुबाई एक्सचेंज. त्यासाठी आम्ही आज आलो आहे आदर्श सोसायटी मध्ये. येथिल दोन कुटुंबांची आम्ही पाहणी करुन निवड करणार आहोत व त्या दोन कुटुंबातील सासु-सुनांची आदला बदल करुन त्या कशा तर्‍हेने एकमेकिंना मॅनेज करतात हे एक महिना पाहुन त्यातील विजेत्या जोडीला आम्ही एक लाखाच बक्षिस देणार आहोत.

मासे २२) काटी/कर्ली

लेखक जागु यांनी बुधवार, 16/03/2011 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
काटी/करली नावावरुनच ह्याचा बोध होतो की ही काटेरी मच्छी आहे. छोटी करली दिसायला सुंदर असते. शेपुट व पर सोनेरी असतात. भरपुर काटे असतात ह्यात. त्यामुळे लहान मुलांच्या हातात देउच नका. त्यांना मांस काढून द्या. काटे भरपुर असल्याने अगदी हळू चविचविने खाण्याचा आनंद मिळतो. ही करली खुपच चविष्ट असते म्हणूनतर काटे काढण्याचा त्रास सहन करुनही आवडीने लोक खातात. करलीचे कालवणही छान लागते. इतर कालवणांप्रमाणेच हिचे कालवण करतात. करली/काटी जर छोटी असतील तर त्यांची डोके, शेपुट काढुन, पोटातील घाण काढून तिन पाण्यांतुन धुवुन घ्यावीत.

आंब्याच गाणं..

लेखक ओंकार देशमुख यांनी बुधवार, 16/03/2011 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
आता आंब्याचा सीज़न सुरु होईल. म्हणुनच हे ख़ास हे आंब्याच गाण आज लिहित आहे. हे मला माझ्या आजीच्या वहीतून मिळाल.
काव्यरस