Skip to main content

खरे काय नी खोटे काय ?

लेखक दत्ता काळे यांनी गुरुवार, 30/12/2010 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
टिव्ही बघतो, बातम्या वाचतो येताजाता चर्चाही ऐकतो कोण बरोबर, चूक कोण कधीच मला कळंत नाय खरे काय नी खोटे काय आदीवासींच्या जमिनी गेल्या .. सरकार म्हणते योजना दिल्या खाणी गेल्या, भाकरी गेली .. सरकार म्हणते नोकरी दिली पोटापाण्यासाठी तरीही दादा शस्रे होती हातपाय खरे काय नी खोटे काय नितिमत्तेचा कहर झाला एक हाकलला, दुसरा आणला राष्ट्रापुढे 'आदर्श' ठेवला त्यांचा पक्ष, त्यांचीच माणसे तरीही खेचती त्यांचेच पाय खरे काय नी खोटे काय प्रकल्प आले, शेती गायब पैसा आला, नाती गायब काळ्या आईनं धन दिलं स्कॉर्पिओ आणली, दागिनं केलं रेबॅनशिवाय तर दिसतच नाय खरे काय नी खोटे काय कोण बरोबर, चूक कोण कधीच मला कळंत नाय खरे काय नी खोटे काय
लेखनविषय:

वाचने 1191
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

खरं आहे. होतं असं अनेकदा. दत्ता काळे म्हणून वाचली तर रचना बरी. तुमच्याकडून अजून भावगर्भ झाली असती खचितच.