मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक suggestion : "मदत हवी आहे" नावाची लिन्क

Pearl · · काथ्याकूट
संपादक मंडळाला एक suggestion द्यावेसे वाटत आहे. १ कल्पना सुचवावी असे वाटत आहे. पहा बर कशी वाटते कल्पना. स्वगृहावर खालील लिन्क्स आहेत. त्यामध्ये "मदत हवी आहे" किंवा "मदत" नावाची लिन्क add करावी असं मला वाटतं. स्वगृह चर्चा काव्य साहित्य छंदशास्त्र पाककृती कलादालन कौल संपादकीय नवे लेखन कारण बरेच जणांना मदत लागते किंवा माहितीची देवाण-घेवाण करायची असते, त्यावर काथ्याकूटच झाल्या पाहिजेत असे काही धागाकर्त्याचे प्रयोजन नसते. पण अशा वेळी तो विषय वरीलपैकी कोणत्या विभागामध्ये टाकावा असा प्रश्न पडतो. तेव्हा धागाकर्ता 'काथ्याकूट' किंवा 'खरडायचा फळा' विभागाची निवड करतो. याखेरीज दुसरा जास्त जवळचा पर्याय सध्या तरी उपलब्ध नाही. १. 'काथ्याकूट' मध्ये टाकले तर कधी कधी त्यावर unnecessarily चर्चा अनावधानाने होते आणि २.'खरडायचा फळा' मध्ये टाकले तर तिथे comparitively कमी लोक भेट देतात म्हणून तिथे टाकलेल्या प्रश्नाला जास्त मदत मिळू शकत नाही. म्हणून मला असे वाटते की "मदत हवी आहे" किंवा "मदत" नावाची लिन्क स्वगृहावर असावी. आणि त्यावर शक्यतो त्या त्या विषयाला अनुसरूनच रिप्लाय दिले जावेत :-) [Disclaimer: हे एक मला द्यावेसे वाटलेले suggestion आहे. त्याचा सर्वांना उपयोग व्हावा आणि होईल असे वाटते. म्हणून हे suggestion कोणालाही उद्देशून नाही तसेच कोणत्याही अन्य धाग्याशी संबंधित नाही याची क्रुपया नोंद घ्यावी. ] टीपः ह्या धाग्याने फारशी value addition होत नसेल किंवा संपादक मंडळाला तो निरर्थक वाटला तर धागा उडवावा ही विनंती.

वाचने 4083 वाचनखूण प्रतिक्रिया 19

५० फक्त 30/12/2010 - 17:06
मा. संपादक मंडळ, या सुचनेचा जरुर आदर करा आणि असा विभाग उघडा. "ह्या धाग्याने फारशी value addition होत नसेल किंवा संपादक मंडळाला तो निरर्थक वाटला तर धागा उडवावा ही विनंती." ह्या ध्याग्याने व्हॅल्यु अ‍ॅडिशन तर होईलच पण गेले काही दिवस जे व्हॅल्यु रिडकशन चाललंय ना ते पण थांबेल. गेले काही दिवस मला तर एस टि स्टँड / स्टेशन वरच्या ' मदत पाहिजे काय' या बुथ वर मिसळ्पाव चे पोस्टर लावल्याचे भास होत होत आणि मिसळपाव वर आल्यावर ते बुथ दिसायला लागायचे. हर्षद.

In reply to by ५० फक्त

काही महिन्यांपूर्वी मी हीच सूचना असणारा धागा टाकला होता... पण संपादक मंडळाने तो ५ मिनिटात उडवून लावला..

In reply to by स्पा

परिकथेतील राजकुमार 30/12/2010 - 18:47
काही महिन्यांपूर्वी मी हीच सूचना असणारा धागा टाकला होता... पण संपादक मंडळाने तो ५ मिनिटात उडवून लावला..
हॅ हॅ हॅ तुझ्यासाठी आजचा गृहपाठ :- बाळ्या आणि कार्टे हे शब्द ५०/५० वेळा लिहुन आणा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

स्पा 30/12/2010 - 18:54
तुझ्यासाठी आजचा गृहपाठ :- बाळ्या आणि कार्टे हे शब्द ५०/५० वेळा लिहुन आणा म्हन्जे काय? big bouncer

In reply to by स्पा

llपुण्याचे पेशवेll 31/12/2010 - 08:28
साल्याहो, लाज वाटते का! इतक्या माहीतीपूर्ण धाग्यावर एकतर अवांतर करता आहात आणि तेही एकही इंग्रजी शब्द न वापरता. तुम्हाला कोण हुच्चभ्रु म्हणेल? चला तुम्हाला Homework- Our's तो बाळ्या, Other's ते कार्टं ही म्हण १००० वेळा लिहून आणा.

मी_ओंकार 30/12/2010 - 19:10
पण या विभागातले लेख पण 'नवे लेखन' मध्ये दिसणार असतील तर काहीच फरक पडणार नाही. सगळ्यात डावीकडचा स्तंभ फारच कमी वेळा पाहिला जातो. (कविता नाही ना हे पहायला फक्त :ड) अर्थात लोक फक्त काथ्याकुटातच चर्चा करतात असा समज असेल तर ... - ओंकार.

पक्या 31/12/2010 - 05:23
धागाकर्तीशी सहमत आहे. मदत मागण्यासाठी असा वेगळा विभाग हवाच. आताच पाहिले मृत्यूपत्राच्या धाग्यावर अनावश्यक प्रतिक्रिया आलेल्या.

स्मिता. 31/12/2010 - 11:09
सूचना खरंच चांगली आहे. 'मदत हवी आहे' असा वेगळा विभाग केल्यास मदत हवी असणार्‍यासाठी तसेच चर्चा करणार्‍यांसाठी सोयीचे होईल.