मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उपवासाचे पदार्थ १) सुरणाचे काप

जागु · · पाककृती
लागणारे साहित्य: सुरण मिठ तुप चिंच कोळ पाककृती: सुरणाच्या चकत्या पाडून साल काढा म्हणजे साल काढायला सोप्पे जाते. सुरणाची पातळ चकती काढून घ्या. चकतीचे कापुन त्रिकोण करा. तुम्हाला डिझाईन येत असतील दुसर्‍या त्या काढल्यात तरी चव एकच राहणार आहे. ह्या त्रिकोणांना चिंचेचा कोळ करुन त्यात पाणी घालुन सुरण उकडून घ्या. उकडल्यावर भांड्यातले पाणी काढून सुरणाच्या फोडी ताटात काढा. त्याला मिठ चोळा जखमेवर चोळतात तसे. पॅनवर तुप किंवा तेल टाकुन खरपुस तळून घ्या. पाहीजे असल्यास्/वेळ असल्यास्/आवड असल्यास सजावट करा. अधिक टिपा: तुम्ही मिठाबरोबर मिरचीपुडही घालु शकता. उपवास नसेल तर मिरपुडही लावता येते. मिरपुडचे काप खुप छान लागतात. उपवासासाठी करताना जर शिंगाडापिठ असेल तर भजी करु शकता. वरीच्या तांदळात काप घोळवुन शॅलोफ्राय करु शकता. तेल टाकुनही करु शकता.

वाचने 8336 वाचनखूण प्रतिक्रिया 16

In reply to by परिकथेतील राजकुमार

सुहास.. गुरुवार, 12/30/2010 - 23:21
तुला ग फार अनुभव >> नाही तर काय रे पर्‍या ? तो गणपा जखमा करतो आणि ही जखमावर मीठ !! कधी एकदा या इडली-डोसातन बाहेर येतो काय माहीत ?

जागु गुरुवार, 12/30/2010 - 15:53
वांग्याचे काप मला दर आठवड्याला करायला लागतात. लेकीला डब्यात देण्यासाठी करते. तिचाही खुप आवडता प्रकार आहे. पुढच्या आठवड्यात टाकतेच.

In reply to by जागु

परिकथेतील राजकुमार गुरुवार, 12/30/2010 - 17:07
वांग्याचे काप मला दर आठवड्याला करायला लागतात. लेकीला डब्यात देण्यासाठी करते. तिचाही खुप आवडता प्रकार आहे. पुढच्या आठवड्यात टाकतेच.
नाही नाही ! आज उद्यात टाक प्लिइइइइइइइइइइइइइइइइइइज. म्हणजे रविवारी करता येतील ;)

सुहास.. गुरुवार, 12/30/2010 - 23:17
जागु ताई , ज ह ब ह रा !! अवांतर : तुझा आणि त्या गणपाचा पाकृ-मेंदु हायजॅक करावा म्हणतो