Skip to main content

आपण नक्की 'कोण'?

लेखक प्यारे१ यांनी मंगळवार, 24/05/2011 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
डोक्यात नेहमीप्रमाणेच गोंधळ झालाय. पूर्वीची वर्णाश्रम पद्धती म्हणे आपण मोडीत काढलीये. वर्ण - ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आता नाहीत. आश्रम - ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास हे देखील मोडीत. ज्यावेळी ही पद्धत अस्तित्वात आली तेव्हा इतर पंथ अथवा प्रार्थना पद्धती नव्हत्या अथवा त्यांना तशी नावे नव्हती. इस्लाम, ख्रिस्ती इ.इ. वेगळे म्हणवणारे आणि बौद्ध, जैन इ. बंडखोर धर्म तेव्हा नव्हतेच. (मी धर्म म्हणत नाहीये कारण धर्म म्हणजे माझ्यामते वस्तूचा स्वभाव असतो.

नियतीचा क्रूर खेळ

लेखक स्वर भायदे यांनी मंगळवार, 24/05/2011 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
धो धो बरसणाऱ्या पावसातही मन माझं भिझत नाही... तुझ्या विरहाने मनात लागलेली आग काही केल्या विझत नाही ।। तुझ्या सहवासातील प्रत्येक क्षण... मन अजून जगतय तु आता नाहीस तरी वेड्या सारखं वागतय ।। अनेक वेळा प्रश्न विचारला मी मनाला... का विसरू शकत नाही मी तुला ? मन म्हणाल वेड्या विसरत का कुणी स्वतःला ।। प्रेमा मध्ये आपली का स्वतंत्र अस्तित्व उरली नाही ... आणि तुझी साथ मला जन्मभर का पुरली नाही ।। नियतीनी रचलेल्या चितेवर संपल का आपलं नातं मग तरीही का उरलय मनात प्रेम... कधी संपणार हा नियतीचा क्रूर खेळ ।।
काव्यरस

मराठी चित्रपटांचे कसे होणार

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 24/05/2011 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी चित्रपटाची चिंता करावी अशी स्थिती आहे का आणि आपण हिंदीशी तुलना करीत असाल तर... हे पहा https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B5Rz… तुम्हाला काय वाटते ?

मुखपृष्ठाची निवड करा !!!!

लेखक रामदास यांनी सोमवार, 23/05/2011 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
माझा काटेकोरांटीची फुलं हा कथासंग्रह नवता प्रकाशन या अग्रगण्य प्रकाशन संस्थेतर्फे पुढच्या महीन्यात प्रकाशीत होणार आहे. या कथासंग्रहातील कथा मिसळपाव वर गेल्या काही वर्षात आपण वाचल्या आहेतच. पुस्तकाचं मुखपृष्ठ बनवताना मुखपृष्ठकार किती मेहनत घेतात, त्याच्या मागे त्यांच्या काय संकल्पना असतात याचं दर्शन वाचकांना घडवण्यासाठी नवताच्यावतीने "काटेकोरांटीची फुलं" या कथासंग्रहासाठी बनवण्यात आलेली सर्व मुखपृष्ठ डिझाईन्स खास मिसळपावच्या सदस्यांना पहायला मिळणार आहेत. या मुखपृष्ठांमध्ये मिसळपावच्या वाचकांना जे डिझाईन सर्वाधिक भावेल तेच डिझाईन पुस्तकाचं मुखपृष्ठ म्हणून वापरण्यात येईल.

संपत्या सुटीचे पूर्वरंग

लेखक बहुगुणी यांनी सोमवार, 23/05/2011 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
या विडंबनाची स्फूर्ती आहे अरूण मनोहरांची ही सुंदर गझल, त्या चांगल्या शब्दांचा 'कच्चा माल' म्हणून वापर केल्याबद्दल क्षमस्व! अताशा असे हे मला काय होते जराशा श्रीखंडाने पँट तंग होते रिचवित आलो सागर आमरसाचे आता पाहून थेंबही मन हे दुभंग होते खूर्चीस पाठी लोटू, चक्क टेबल की हलावे भलतेच जडभारी झाले ते माझेच अंग होते टेकून पाठ थोडी पंखा वरी फिरावा निद्रेत माझिया झणी नुसते तरंग होते स्वप्नात पाहिले, कळले माझे मला की संपत्या सुटीचे ते पूर्वरंग होते
काव्यरस

वीकेंडचा मेनू

लेखक पियुशा यांनी सोमवार, 23/05/2011 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
वीकेंडचा मेनू
सध्या आमरसाचा सिझन आहे , म्हटल चला ट्रायच करुया म्हणून आमरस ,पुरणपोळी ,भात आणि आमटी अन कांदा भाजी ,बटाटा भजी, याचा घाट घातला होता .(आणि इथे देण्याचा मोह अनावर झाला म्हणुनच देत आहे ) पुरण पोळी :-अर्धा कि.