Skip to main content

शाळाचे शुल्क ..

लेखक शाहिर यांनी सोमवार, 13/06/2011 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या काळात (१२-१५) वर्षापूर्वी बालवाडी- प्राथमिक शाळाचे शुल्क २००-३०० रुपये प्रती वर्ष असायचे ...आता पुन्या मधे ते ३००००-६०००० आहे ..(बाणेर परिसरा मधे व सिन्हगड रस्ता ).. एवढे शुल्क पाहता काहि प्रश्न पडतात.. १. या शाळा मधे असे काय शिकवतात? २. महागडे म्हाणजे चान्गले का?? ३.बालवाडी पुर्व गटा चे शुल्क देखील २०,००० आहे.. एवढे देण्यचा पाल्यास काहि फाय्दा होतो का? ४. हे शुल्क वाजवी आहे कि लूट ??

वाचने 2534
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

(१२-१५) वर्षापूर्वी आपण बालवाडी- प्राथमिक शाळेत होतात हे ऐकुन कंठ दाटून आला. आपली प्रगती थक्क करणारी आहे.

शुल्क जास्त असणार्‍या शाळांचे मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठी काही सामाजिक फायदे असतात.

In reply to by नितिन थत्ते

>>शुल्क जास्त असणार्‍या शाळांचे मुलांसाठी व त्यांच्या पालकांसाठी काही सामाजिक फायदे असतात. हे खोचकपणे शाळांना-पालकांना टोमणा होता की खरंच काही मुद्दा आहे ते कळालं नाही. मुद्दा असल्यास सविस्तर सांगाल काय? (थत्तेचाचांचा प्रतिसाद असल्यानं द्विधा झाली. नाहीतर सरळ तो टोमणा आहे असं समजून गेलो असतो. :) )

In reply to by धमाल मुलगा

नाही हो .... खवचट नाही वास्तविकच आहे. जास्त शुल्क असलेल्या शाळा या सहसा विना अनुदानित असतात. त्यामुळे त्यांचे पालकांसाठी काही फायदे होतात. १. या शाळा बहुधा 'फडतूस' एस एस सी बोर्डाशी संलग्न नसतात. त्या हुच्चभ्रू आयसीएससी/सीबीएसई वगैरे बोर्डाशी संलग्न असतात. २. या विना अनुदानित असल्याने सरकारी नियम लागू नसतात. तसेच फी जास्त असल्यानेही फक्त हुच्चभ्रू लोकांचीच मुले शाळेत येतात. त्यामुळे "आपल्या" मुलांना "त्या तसल्या" मुलांबरोबर शिकावे/रहावे/खेळावे लागत नाही. ३. भरपूर फी घेत असल्याने स्पोर्ट्स वगैरे अवांतर गोष्टी मुलांना उपलब्ध होतात. यामुळे मुलांचा फायदा होतो.

In reply to by नितिन थत्ते

हे सरळ? मग खोचक कसं असेल? ;) बाकी, तुमच्या मुद्द्यांशी सहमतच. त्या भिक्कारड्या 'एशेशी'नं कुणाचं भलं झालंय? चांगलं आय.सी.एस.ई./सी.बी.एस.ई. वगैरे बोर्डात पोरांना शिकवायचं, तेव्हढाच आपल्याला मान वर करुन सांगायला मुद्दा मिळतो. आणि 'त्या तसल्या' मुलांची संगत नाही हे तर उत्तमच. अगदी संस्कारक्षम वयापासून क्षितिजापलिकडचे पाहणारे वगैरे उदात्त विचार पेरुन पुढची 'सभ्य' फळी उभी राहिलीच पाहिजे...

तुमचा लेख वाचुन मला व्यक्तीशः म्हतारा असल्यासारखे वाटले . - (सुमारे खुप खुप वर्षांपुर्वी फुकाट अंगणवाडीत बसलेला) शमुर

काही विचारू नका लुटीबद्दल! माझी मामेबहिण चार महिन्यांसाठी भारतवारीला गेलेली असताना तिच्या मुलाच्या केजीच्या ४ महिन्यांसाठी २५ हजार घेतले. आजकाल बालवाडी नाही तर बापवाडी झालिये. तुम्ही हिरव्या देशातून गेलेले असलात तर 'देव तुमचं भलं करो'. दुसर्‍या एका बहिणीच्या मुलांना जवळच्या शाळेत अ‍ॅडमिशन नाही दिली. कारण काय तर आजीआजोबा फक्त ग्रॅजुएट आहेत. दुसर्‍या बालकांचे आजीआजोबा पोस्ट ग्रॅ किंवा पिएचडी असल्याने त्यांना मिळाली. आम्ही अजूनही माझ्या आईला गमतिनं पुढचं शिकायला सांगतो.

In reply to by रेवती

जवळच्या शाळेत अ‍ॅडमिशन नाही दिली. कारण काय तर आजीआजोबा फक्त ग्रॅजुएट आहेत. हे नविनच!! आजी आजोबांच्या शिक्षणाचा इथे काय संबंध? कै च्या कै!! भारतात आजकाल काय वाट्टेल ते चालवुन घेताहेत लोकं.

In reply to by रेवती

बहिणीच्या मुलांना जवळच्या शाळेत अ‍ॅडमिशन नाही दिली. कारण काय तर आजीआजोबा फक्त ग्रॅजुएट आहेत. हे तर अतिच आहे. त्या काळात ग्रॅजुएट असणं सुद्धा उच्च शिक्षणात गणलं जायचं. त्याहून महत्त्वाचं म्हणजे आजीआजोबा अगदी अडाणि असले तरी त्याचा आणि अ‍ॅडमिशनचा काय संबंध?? यासंबंधी कुठे तक्रार करण्याची सोय आहे का?

"बै बै बै काय फी वाढ्लीय नै हल्ली?" अस्ल्या चर्चेत भाग घ्यायचा कंटाळा येतो....... जशी काही सक्तीच केलेली आहे अशा शाळेत घालायची,... साध्या शाळा काय बंद झाल्यात की काय? सरकारी अनुदानित शाळा आहेत, झालंच तर महापालिकेच्या शाळा आहेत .... तिथे अशी फी घेत नाहीत असे ऐकले.... पोरांना साध्या शाळेत घाला आणि कमी फी द्या... किंवा बड्या शाळेत घाला आणि जास्त फी द्या... सुविधा हव्यात आणि जास्त फी नको असे कसे काय चालेल? बाकी चालूद्या

आमच्या शाळेत इयत्तांनुसार शुल्क होते. पाचवीला पाच रुपये, सहावीला सहा रुपये, एस. एस. सी. ला प्रथमच जादा परीक्षाशुल्क भरावे लागले. आयुष्यभर जे शिकलो त्यासाठी दहा हजार रुपयेपण शुल्क भरले नसेल आजवर तेच मुलीसाठी सध्या वर्षाला २० हजार रुपये नुसती फी भरतो आहे. बाकी खर्च वेगळेच. एकप्रकारे उंटाचा मुका घेतलाय. :) शाळा छान आहे. माध्यम इंग्रजी असले तरी मराठी वळणाची आहे. दोन्ही भाषांची आबाळ होत नाही आणि मुलं चांगली फुलताहेत. या समाधानासाठी जास्त पैसे मोजावे लागताहेत खरे, पण 'ऑल इज वेल' म्हणून विचार करणे सोडून दिले.