Skip to main content

हत्या करायला शीक

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 29/05/2011 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
हत्या करायला शीक विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली, नितीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, असे महात्मा जोतीबा फुले म्हणायचे. शेतकर्‍यांची मुलं शाळा-कॉलेजात शिकायला गेली की शिकून-सवरून शहाणी होतील आणि मग शिकून-सवरून शहाणी झालेली शेतकर्‍यांची मुले आपल्या घरातल्या, गावातल्या म्हणजे पर्यायाने शेतकरी समाजातल्या दारिद्र्याचा समूळ नायनाट करतील, असे महात्मा जोतीबा फ़ुलेंना वाटायचे.

डॉ. जी. जॉन सॅम्युएल - द्राविड भाषाभ्यासक पंडित यांची भेट .

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 29/05/2011 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. जी. जॉन सॅम्युएल - द्राविड भाषाभ्यासक पंडित यांची भेट ....
"सध्या सर तमिळभाषेला जागतिक पातळीवर अभिजात भाषेचा मान मिळवून देण्यासाठी संशोधन कार्य करतायत, त्यात अत्यंत व्यस्त आहेत. तुमची अपॉईंटमेंट आहे का? काहीही झाले तरी १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ काही मिळणार नाहीए." आम्हाला रिसेप्शनवरच कडकडत्या तमिळमिश्रीत इंग्रजी उच्चारांमधून समज दिली जाते.

कच्चे मुर्ग की बिर्याणी

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 28/05/2011 04:51 या दिवशी प्रकाशित केले.
मास्टरशेफ संजीव कपूर ह्यांच्या खाना खजाना मध्ये ही पा़कृ पाहीली होती , तीच करुन बघीतली आणी इथे देत आहे :) साहित्य चिकन मुरवण्यासाठी: १/२ किलो साफ करून तुकडे केलेले चिकन २-३ टेस्पून आले+लसुण पेस्ट २ कप दही १ कप तळलेला कुरकुरीत कांदा १/२ कप बारीक चिरलेला पुदीना १/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर १ टीस्पून वेलचीपूड २ टीस्पून लाल तिखट १ १/२ टीस्पून गरम मसाला १ टेस्पून लिंबाचा रस १ हिरवी मिर्ची चिरून मीठ चवीनुसार १-२ टेस्पून तुप .

देवाचिये द्वारी...

लेखक धन्या यांनी शुक्रवार, 27/05/2011 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥ हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥ असोनि संसारी जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी ॥ ज्ञानीयांचा राजा ज्ञानदेवाने लिहिलेल्या हरिपाठाच्या सत्तावीस अभंगांपैकी हा पहिला अभंग. हरिपाठ म्हणजे (हरि या) देवाचे नामस्मरण. देवाच्या भक्तीचे अनेक प्रकार आहेत. नवविधा भक्ती वगैरे...

मुंबई क्विझ...१..

लेखक गवि यांनी शुक्रवार, 27/05/2011 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईशी आपल्या सर्वांचा संबंध कधी ना कधी येतोच. मुंबईत राहात नसलो तरी. आणि त्यातल्या त्यात मुंबईत राहणार्‍यांचा तर अर्थात रोजच. पण, मजसहित सर्वच मुंबईत राहणार्‍या माणसाची थोड्याफार फरकाने कुत्र्याने चावा घेतल्यासारखी धावपळीची लाईफस्टाईल असते. अशा लाईफमधे अक्षरशः मानेच्या वर नजर उचलून आजूबाजूला बघणेही कधीकधी जमत नाही. एक छोटीशी फोटो क्विझ सुरु करु धजावतोय. मुंबईतील ठिकाणे ओळखा. सध्या चारच प्रतिमा टाकतोय. अगदी साध्या कॅमेर्‍याने काढलेल्या आहेत. फोटोग्राफीचे कौशल्य म्हणून अजिबात पाहू नये ही विनंती. ओळखण्याचा प्रयत्न कराल? १.