Skip to main content

प्रयत्न

लेखक निशान्त यांनी गुरुवार, 26/05/2011 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
उध्वस्त होने आपल्या हाति, जिवन घडवने आपल्या हाति, उलटलि नाव जरि समुद्रि, पैलतिरि पोहुनि जाने आपल्याच हाति

बुद्धाच्या डोक्यावर

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 25/05/2011 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात पुण्याहून मुम्बईला येताना एक चित्रकार सहप्रवासी भेटले. ते कोणाशीतरी फोनवर बोलत होते. बोलताना त्यानी पलीकडल्या माणसाला विचारले की गौतम बुद्धाच्या डोक्यावर जे दिसते ते त्यांचे केस आहेत( बुचडा बांधलेले) की डोक्यावरचा मुकुट आहे. माझ्या मनात जे सहज आले ते म्हणजे बुद्धाच्या डोक्यावर जे आहे ते कुरळे केस आहेत. त्या चित्रकारांचे म्हणणे की तो मुकूट नाही किंवा ते केस देखील नाहीत. बुद्धा प्रमाणेच महावीराची मूर्तीदेखील त्या प्रमाणेच आहे. आणि महावीर आणी बुद्धा यांच्या कालावधीत फारसा फरक नाही. त्या चित्रकाराचे म्हणणे की बुधाने सर्वसंगपरीत्याग केलेला होता.

मी बोर्ड बोलतोय...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 25/05/2011 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
मी बोर्ड बोलतोय बोर्ड,बरेच वर्षापुर्वी एका पुढाय्रा कडुन लागलेला...बोर्ड॥ध्रु॥ त्या दिवशी जोरदार सोहळा होता,रंगवलेला शिवाजी आणि शेजारी १मावळाही होता। हार तुरे पेढे अगदी काहिही कमी नव्हतं,पुढाय्राच्या पुढे उभी होती १फोर्डं॥ माझ्यावर काय लिहितात मजकुर,मला माहित नसतो काय?पण १दिवस उलटला की लीहीणारे म्हणतात बायबाय। जसा रंगाचा ब्रश असतो ना,......तसच यांचं मन कोरडं॥ मी दुकानाचा असलो ना,की वाईट वाटत नाही,पण संघटनेचा असलो ना,की खटकतं। बाजार संपताच उठुन जातात........ऊरतं मोकळं मार्केटयार्डं॥ परवाच एका कुत्र्यानी माझ्यावर शू केली,त्या निमित्तानी जमलेली धुळ जरातरी कमी झाली। तुम्हाला अईकताना खिन्नता व
काव्यरस

बुवांचा न्याय

लेखक JAGOMOHANPYARE यांनी बुधवार, 25/05/2011 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
एका गावात एक बुवा राहत होते. लोक त्यांना बाबा म्हणत. बाबांवर गावाचं प्रेम होतं. वय तरूणच होतं. पण कुठल्याही गोष्टीचं तार्किक विश्लेषण, न्यायबुद्धी यामुळं गावातच काय पंचक्रोशीत त्यांचं नाव झालेलं होतं. त्यांच्या न्यायप्रियतेमुळे कोर्टाची पायरी चढणंच बंद झालं होतं. गावाला बुवांचा अभिमान होता. त्यांना रहायला घर बांधून दिलं होतं. शेतजमीन दिली होती. लोक स्वतःहून ती जमीन कसत आणि उत्पन्न बुवांच्या चरणी आणून ठेवत. बुवा नको नको म्हणत असताना त्यांचं बँकेत खातं उघडलं होतं. त्यात पैसे जमा होत होते. अन्नधान्य, दूधदुभतं ..कशाचीच कमी नव्हती.

माझ्या शब्दांनी एवढे स्वस्त व्हायला नको होते!

लेखक आर्या१२३ यांनी बुधवार, 25/05/2011 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
परवा, माळ्यावरची पुस्तके काढतांना धुळमाखली डायरी,२० वर्षापुर्वीची.. अचानक खजिना हाती लागल्यासारखी सापडली तशी लेखणी तर तुला बहाल केली होती डायरी फक्त माझी होती कव्हर सुंदर आहे म्हणत म्हणत अवघी डायरी तुच जिंकुन घेतलीस ...मी मात्र शाई..शाई वेचत राहिले! डायरी माझी, लेखणी माझी, माझा तु, माझं ..माझं ..सर्वकाही तसं काही विशेष मागितलं नव्हतं मी तुझ्याकडे, भावनांशिवाय! वाटलं होतं तु भावनांनी रंगवशील! ...तुझ्या भावना लाख महाग असतील रे पण माझ्या शब्दांनी एवढे स्वस्त व्हायला नको होते!

राष्ट्रपतींचा निर्णय -

लेखक विदेश यांनी बुधवार, 25/05/2011 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रपतींचा निर्णय लांबल्यास फाशीऐवजी जन्मठेप द्यावी? वर्तमानपत्रातील वरील शीर्षकाच्या बातमीने चांगलेच लक्ष वेधून घेतले ! पंजाबमधील फाशीची शिक्षा झालेल्या दहशतवादी भुल्लर याने राष्ट्रपतींकडे 'साडेसात वर्षांपूर्वी ' दयेचा अर्ज केलेला आहे. बिचा-याची (!) तब्येत , दहा वर्षांहून अधिक काळ तुरुंगातच असल्याने, ठीक नाही.

माझे नावडते संगीतकार

लेखक तिमा यांनी मंगळवार, 24/05/2011 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
आजच प्रवास करत असताना अचानक बसवाल्याने एफेम रेडियो लावला. त्यातल्या चरपटपंजरीचा त्रास कमी का काय म्हणून चरपटणारीने 'आज राजेश रोशनजी का बर्थ डे है' असे सांगून सगळी राजेश रोशनची गाणी लावली. त्यामुळे असह्य मानसिक ताप झाला. त्यातूनच ही कल्पना सुचली की आपले नावडते संगीतकार आठवावेत. पूर्वी कोणीतरी, आवडते संगीतकार, यावर कौल घेतला होता. म्हणून कौले काढायला गेलो तर 'पर्याय वाढवा' हे दाबल्यावर पुढचे सगळे इंग्रजीतच टाईप व्हायला लागले. बरीच खटापट केल्यावर विचार केला, की मग हा विषय चर्चेलाच टाकावा. मला नावडणार्‍या संगीतकारांची नांवे उतरत्या क्रमाने दिली आहेत.

झणझणीत वेब मसाला..

लेखक गवि यांनी मंगळवार, 24/05/2011 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा ऑनलाईन मटा. त्याचा सायंकाळी ५ वा. ६ मि. भारतीय प्रमाणवेळेनुसार घेतलेला प्रिंटस्क्रीन पहा. "११ वर्षीय मुलीचे कौमार्य विकले" अशा टायटलची बातमी आहे. तिची लिंक अर्थातच अन्य वेबसाईटला आहे. ती उघडल्यावर मजकूर दिसत नाहीये. मला धक्कादायक हेच वाटतं की "११ वर्षीय मुलीचे कौमार्य विकले" अशा मथळ्याची बातमी "झणझणीत वेब मसाला" अशा सदरात द्यावी ? (डावा कॉलम बघा) तिथेच "ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश" अशीही बातमी कम एक्सटर्नल लिंक आहे.

खान्देशी पदार्थः पुडाच्या पाटोड्या! (फोटो अ‍ॅड केलेत)

लेखक आर्या१२३ यांनी मंगळवार, 24/05/2011 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
Img00033[1] लागणारा वेळ: २ तास लागणारे जिन्नस: पुडाच्या पाटोड्या हा एक अस्सल खान्देशी पदार्थ.