Skip to main content

भ्रष्टाचाराचे मूळ

लेखक विकास यांनी मंगळवार, 31/05/2011 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलच्या अभ्यासानुसार भारताचा भ्रष्टाचाराचा इंडेक्स हा ३.३ आहे. जितका हा इंडेक्स शून्याच्या जवळ तितका वाईट तर जितका १० च्या जवळ तितका चांगला असतो. अर्थात एकूण प्रतिमा ही भ्रष्टराष्ट्राची आहे आणि आपण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ती सहनही करत असतो आणि काही अंशी सहभागीदेखील होत असतो. भ्रष्टाचाराचे मूळ कशात असते? मला वाटते, भ्रष्टाचार देखील अश्वत्थवृक्षा प्रमाणे, "वरी मुळे खाली फांद्या" असाच असतो. अर्थात तो वरून खाली येऊ लागतो. त्याची सुरवात सत्ता टिकवण्यापासून होते.

ताळेबंद

लेखक सुचेता यांनी मंगळवार, 31/05/2011 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
चालले मी परी विखुरल्यात इतस्ततः जाणीवभर लहानथोर माझ्या खुणा पदोपदी जाणवताना मिळेल आठवांना उजाळा शब्द - नात्या विरहीत आपला भावबंध आगळा नसणारे मी, एक शाश्वतय, मान्यय मला मनातला ठाव माझा अशाश्वत ठरणार का ? होते खरच ना मी इथलाच भाग अविभाज्य ? पानगळीइतकचं शुल्ल्क होतं माझं अस्तित्व ? आजर्पंतच्या असण्यावर प्रश्नचिन्ह उमट्लेलं जमाखर्चाच शेवटचं पान ताळेबंद विसरलेलं
काव्यरस

लेखक सुचेता यांनी मंगळवार, 31/05/2011 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
काळोखात तेवावी ज्योत दिव्याची मंद अस्तित्व तसं तुझं उजळ्ते माझे अंतरंग होत असंही कधी कधी कि न कळे कसे काय ?

वसंतकाव्यमाला कट्टा वार्तांकन

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 31/05/2011 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, आधी ठरल्याप्रमाणे रविवारी २९ मे २०११ रोजी काव्यकट्टा साजरा झाला. चार दिशांहून काव्यप्रेमी आले. 'मी मराठी' चे राज जैन व प्रसन्नकुमार केसकर सिंहगडरस्त्याने बाईकवरून, बावधनवरून डॉ अशोक कुलकर्णी व मी विमाननगरहून आलो. नेहमी जालावर शब्दरुपाने भेटणार्‍या व्यक्ती प्रत्यक्षात कशा दिसतात, कशा बोलतात याचा ओळखी झाल्यावर प्रत्यय आला. सायंकाळी पाचला सारसबागेतील एका झाडाच्या सावलीत कार्पेट टाकून त्यावर आम्ही स्थानापन्न झालो. जुजबी गप्पा झाल्या.

होमी भाभा यांचा कलासंग्रह – चुकवू नये असे काही

लेखक चिंतातुर जंतू यांनी मंगळवार, 31/05/2011 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
शास्त्रज्ञ म्हणून होमी भाभा अनेकांना माहीत असतात, पण त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी आणि रसिक बाजू माहीत होण्यासाठी थोडी वाट वाकडी करावी लागते. मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत जागोजागी विखुरलेली चित्रं आणि शिल्पं संस्थेला भेट देणाऱ्या कुणाही डोळस माणसाच्या नजरेत भरतात. होमी भाभा यांनी केलेल्या कलासंग्रहातली ती आहेत हे कळण्यासाठी मात्र थोडं चौकस असावं लागतं.

एलियन्स----लघुकथा----जयनीत दीक्षित

लेखक जयनीत यांनी मंगळवार, 31/05/2011 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
स्पेस क्राफ्ट ३०९ ९८६० २३१ कॉलिंग ब्रेकिंग न्यूज! ब्रेकिंग न्यूज!! आपल्या आकाशगंगे पासून सात लाख प्रकाशवर्ष दूर एका अज्ञात आकाशगंगे मध्ये एक ता-याचा शोध लागला आहे ज्याच्या मंडळातील एका ग्रहा वर जीव सृष्टी आढळून आली आहे . ह्या ग्रहा वर अनेक जीवजन्तूं सोबत एका दोन हात आणि दोन पाय असलेल्या प्रजातीचा वावर आहे. हे एलियन्स विवीध वर्णात विभागलेले असून ह्यांच्यात देश, संस्कृती, भाषा, वर्ग असे अजूनही पोट भेद आढळून आले आहेत.

हम है मताअ-ए-कुचा

लेखक शरद यांनी मंगळवार, 31/05/2011 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
हम है मताअ-ए-कूचा-ओ बाजारकी तरह उठती है हर निगाह खरीदार की तरह ...१ इस-कू-ए-तश्नगी मीं बहुत है कि एक जाम हात आ गया है दौलते-नादार की तरह ...२ वो तो कहीं है और, मगर दिल के आसपास फ़िरती है कोई शै, निगहे यार की तरह ...३ सीधी है राहे-शौक, पे यूं ही कहीं कहीं खम हो गयी है गेसू-ए-दिलदार की तरह ...४ अब जा के कुछ खुला ., हुनरे-नाखुने-जुनूं जख्मे-जिगर हुए लबो-रुख्सार की तरह ...५ "मजरूह", लिख रहे है वो, अहले-वफा का नाम हम भी खडे हुए है गुनहगार की तरह ...६ महरूह् मताअ ..मालमत्ता, माल, वस्तू. . कूचा--गल्ली. निगाह ... नजर. तश्नगी ... तहान. नादार ... निर्धन, कंगाल, गरीब. शै ...

इतकेच मला भरताना...

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 31/05/2011 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या कंपनीत सगळीकडे अपरेझलच्या चर्चा आणि काथ्याकुट चालू आहे, त्यातच काल कविवर्य सुरेश भटांची अप्रतिम गझल आकाश उजळले होते वाचनात आली आणि आमच्या लेखणीला बर्‍याच दिवसांनी प्रेरणा मिळाली.. इतकेच मला भरताना अपरेझल कळले होते सगळ्यांचे रेटिंग 'त्यांनी' आधीच ठरवले होते ही सिस्टिम अपरेझलची बोलून बदलली नाही मी ऍप्रिशिएशन लेटर नुसतेच जमवले होते मी ऐकवली साहेबाला माझी 'कर्म' कहाणी 'यादी'तून त्यांने माझे पण नाव वगळले होते झालेल्या अपरेझलचा उपहास चला विसरू या (रेटिंग कधी दिधलेले माघारी वळले होते?

आशीर्वाद..?

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी रविवार, 29/05/2011 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
झ-यांनी आजकाल दगडातून फुटणं सोडून दिलय पक्षांनिही आजकाल किलबिलणं बंद केलय फुलांनी आजकाल फुलणं’ सोडून दिलय पावसाने तर आपलं कोसळणच बंद केलय त्यांना म्हणे माणसां कडून उत्तर हवय .. की ही हिरवीगार जंगलं तुम्ही का तोडलीत...? " माहितीच्या अधिकाराच्या कायद्यात तुम्ही बसत नाही" असं माणूस त्यांना म्हणाल्याचं ऐकतोय..! " हो पण झाडे तोडणे हा गुन्हा आहे.. असं तुमचा कायदाच सांगतो..ना.." असे असित्वाने त्याला विचारले असंही ऐकतोय..! "हो गुन्हा आहे म्हणून आम्ही त्याचा दंड ही भरतो.की." असं माणूस त्यांना म्हणाला, आणि गुन्हा आहे पाप तर नाही ना..?