मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पालक आणि कोबी पराठा

Mrunalini · · पाककृती
साहित्यः कोबी - दिड कप (किसुन) पालक - १ कप (बारीक चिरुन) बेसन पीठ - ३ चमचे गव्हाचे पीठ - १ कप ओवा - १/२ चमचा आले लसुण पेस्ट - १/२ चमचा लाल तिखट - १ चमचा हळद - १/२ चमचा तेल - २-३ चमचे मिठ चवीनुसार बटर किंवा तुप - भाजण्यासाठी कॄती: १. एका बाउल मधे किसलेला कोबी, बारीक चिरलेला पालक घ्यावा. त्यात ओवा, आले लसुण पेस्ट, लाल तिखट, हळद, बेसन पीठ, तेल व मिठ टाकुन मिक्स करावे. हे बाउल १० मिनिटे झाकुन ठेवावे. २. १० मिनिटां नंतर कोबी व पालकला मिठा मुळे पाणी सुटलेले असेल. ह्या मधे बसेल एवढे गव्हाचे पीठ टाकुन, घट्ट गोळा मळुन घ्यावा. ३. मळलेल्या कणके मधुन एक गोळा घेवुन पराठ्याच्या जाडीचा लाटुन घ्यावा. हा पराठा तव्यावर चांगला भाजुन घ्यावा. भाजताना वरतुन बटर किंवा तुप लावावे. ४. हे पराठे लोणचे, छुंदा किंवा दह्या सोबत गरम serve करावे. टिपः १. मी खाली दिलेल्या फोटो मधे purple cabbage वापरला आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्या जागी साधा कोबी किंवा फ्लॉवर वापरु शकता. Image removed.

वाचन 9507 प्रतिक्रिया 0