मदत हवी आहे - एनआरआय लोन चे रेसिडेंट लोन मधे Conversion
नमस्कार मिपाकर मंडळी,
मी सध्या भारताबाहेर असुन भारतात घर घेण्यासाठी NRI लोन घ्यायचा विचार करत आहे. परंतु काही गोष्टींवर मला खुप धुंडाळुनही काही माहीती मिळत नसल्याने मिपाकरांना शरण आलो आहे.
जर NRI लोन घेतल्यानंतर काही अपरिहार्य कारणास्तव (असाईन्मेंट संपल्यामुळे म्हणा किंवा ईतर काही कारणाने) भारतात जावे लागले, तर लोनचे प्रोसेसिंग कसे होते? म्ह्णजे ideal केस मधे ते रेसिडेंट लोन मध्ये बदलले जायला हवे परंतु समजा मला इथे राहुन महीना ४५००० EMI देणं परवडत आहे, पण भारतात परत गेल्यावर जर माझा भारतातला पगार ही अमाऊंट कवर करु शकत नसेल तर काय होईल?
मिसळपाव