कागदोपत्री माणूस सी.व्ही.वारद गेले
सुन्न झालो. चार ओळींची बातमी होती.फारशी कुणी दखल घेतली नव्हती.काळाच्या ओघात विसरला गेलेला एक माणूस. बातमी वाचली नसती तर कदाचित कळलंही नसतं. आहेत की नाहीत.
काहीच आगापिछा नसलेला हा मनस्वी माणूस दोन-तीन वर्षं सेंट जॉर्जेस इस्पितळात वास्तव्य करून होता.आपल्या विकलांग देहातील व्याधींशी निकराने झुंजत होता.धुगधुगी अजून कायम होती. त्या अंधार्या खोलीतील त्यांच्या कॉटखाली पत्र्याच्या जाडजूड दोन-तीन ट्रंका होत्या.तीच त्यांची संपत्ती.काय होतं त्यात ? एकदा मला त्यांनी ती ट्रंक उघडून दाखवली.
मिसळपाव
मुंबईत आलो त्यावेळी पेन आणि पेन्सील दोन्ही बरोबर घेऊन आलो. सर्वच गोष्टी नवीन होत्या.घराबाहेर पडल्यावर असंख्य प्रकारचा जीवन संघर्ष बघायला मिळतो. मुंबई महानगर मायाबाजार आहे. त्यात सत्य काय आणि आभास कोणता हे कळणं जवळजवळ अशक्यच आहे.
पत्रकारिता करत असल्यामुळे मुंबईच्या कानाकोपर्यात फिरण्याची संधी मिळाली.प्रत्येक वेळेला वेगळा रंग ,वेगळा आशय जाणवला.