जन गण मन च्या निमित्ताने
आज भारताच्या स्वातंत्र्यदीना निमित्त तसेच रविन्द्रनाथ टागोरांच्या १५०व्या जयंतीनिमित्त सरकारने पुढाकार घेऊन केलेले आपल्या राष्ट्रगीताच्या पाचही कडव्यांचे सुंदर सादरीकरण ऐकायला मिळाले. आपण जर पाहीले नसेल तर ते अवश्य पहावेत! घटनेप्रमाणे केवळ पहीली दोन कडवीच राष्ट्रगीत आहे.
यातील प्रत्येक शब्द नीट ऐकता येत नाही अथवा बंगालीला जास्त जवळ असल्यास कळत नसला तरी त्याचे इंग्रजी भाषांतर देखील दिलेले आहे. ते ऐकताना, नेहमीचा प्रश्न परत डोकावला. टागोर, "भारतभाग्य विधाता" असे नक्की कुणाला म्हणत असावेत? विशेष करून त्यातील शेवटच्या कडव्यातील खालील ओळी आणि त्याचा अर्थ पहा:
Raatri Prabhatilo Udilo Rabichhabi, Purbo Udayo Giri Bhaaley
Gaahey Bihangamo Punyo Samirano, Nabo Jibano Rasho Dhaley
Tabo Karunaaruno Ragey,Nidrito Bhaarato Jagey
Tabo Chorone Noto Maatha
Jayo Jayo Jayo Hey, Jayo Rajeshwaro, Bhaarato Bhaagyo Bidhaataa
Jayo Hey, Jayo Hey, Jayo Hey,Jayo Jayo Jayo, Jayo Hey
इंग्रजीतील अर्थः
The night is over, and the Sun has risen over the hills of the eastern horizon.
The birds are singing, and a gentle auspicious breeze is pouring the elixir of new life.
By the halo of Your compassion India that was asleep is now waking
On your feet we lay our heads
Victory, Victory, Victory be to You, the Supreme King, the dispenser of the destiny of India!
मग अजूनच वाटू लागले. कुठल्या राजासंदर्भात टागोर म्हणत असावेत? मग जरा शोध घेतल्यावर काही उत्तरे मिळाली:
हे गाणे डिसेंबर १९११ साली पाचव्या जॉर्जच्या राज्याभिषेक च्या सुमारास रचले गेले होते. त्यात भर म्हणून त्याच वेळी भरलेल्या कलकत्ता काँग्रेस मध्ये ते दुसर्या दिवशी म्हणले देखील गेले होते, ज्या दिवशी काँग्रेसने अधिकृतपणे पाचव्या जॉर्जचे स्वागत केले होते (तसा ठराव केला होता). त्यामुळे ते गाणे पाचव्या जॉर्जसाठीच आहे असा समज होण्यास वाव नक्कीच राहीला. त्यात भर म्हणून (भारतातील) ब्रिटीश वर्तमानपत्र स्टेट्समनने "The Bengali poet Rabindranath Tagore sang a song composed by him specially to welcome the Emperor." असे लिहीले. तेच इतर वृत्तपत्रांनी केले... त्यामुळे "भारतभाग्य विधाता राजेश्वर" हा नक्कीच पाचवा जॉर्ज ठरला.
काँग्रेसने मात्र त्यांच्या १९११ च्या वृत्तांतात म्हणले की पहील्या दिवशी वंदे मातरम म्हणले, दुसर्या दिवशी प्रथम रविन्द्रनाथांचे देशभक्तीपर गीत. नंतर राजाच्या स्वागताचा ठराव आणि मग स्वागतपर गीते म्हणली गेली....
स्वतः रविन्द्रनाथांनी मात्र १९३७ साली आणि १९३९ साली पत्रव्यवहारात, अनुक्रमे खालील प्रमाणे म्हणले होते:
"A certain high official in His Majesty's service, who was also my friend, had requested that I write a song of felicitation towards the Emperor. The request simply amazed me. It caused a great stir in my heart. In response to that great mental turmoil, I pronounced the victory in Jana Gana Mana of that Bhagya Vidhata [ed. God of Destiny] of India who has from age after age held steadfast the reins of India's chariot through rise and fall, through the straight path and the curved. That Lord of Destiny, that Reader of the Collective Mind of India, that Perennial Guide, could never be George V, George VI, or any other George. Even my official friend understood this about the song. After all, even if his admiration for the crown was excessive, he was not lacking in simple common sense." (१९३७)
"I should only insult myself if I cared to answer those who consider me capable of such unbounded stupidity as to sing in praise of George the Fourth or George the Fifth as the Eternal Charioteer leading the pilgrims on their journey through countless ages of the timeless history of mankind." (Purvasa, Phalgun, 1354, p738.)तरी देखील हा प्रश्न त्यातील शब्दांमुळे आणि वेळेमुळे (किंग जॉर्जचा राज्याभिषेक) कायमच वादग्रस्त राहीला. माझ्या लेखी जर टागोरांनी इतके सुस्पष्ट लिहीले असेल तर त्यांचे मत खरे मानले गेले पाहीजे. तरी देखील मला जाता जाता एक प्रश्न पडतो. "वंदे मातरम" गीताच्या संदर्भात नंतरच्या ओळींमध्ये मुर्तीपूजा आली म्हणून आक्षेप घेतला गेला, पण, "...Bhagya Vidhata [ed. God of Destiny] of India who has from age after age held steadfast the reins of India's chariot through rise and fall, ..." अथवा, "...Eternal Charioteer leading the pilgrims on their journey through countless ages of the timeless history of mankind ...", असे थोडेफार धार्मिक/अध्यात्मिक विश्लेषण स्वत: टागोरांनीच केलेले असताना हे गीत राष्ट्रगीत म्हणून कसे चालले? ही माहिती मी विकीवरून घेतलेली आहे. हा वाद अनेकदा येतो, म्हणून आत्ता सांगावेसे वाटले इतकेच. पण येथील जाणकारांना जर अधिक काही माहिती असेल तर येथे अवश्य सांगावीत. टागोरांनी का लिहीले, कुणाला उद्देशून लिहीले वगैरे मुद्दे जरी इतर संदर्भांनी आणावेसे वाटले, तरी त्यावर योग्य ती अभ्यासू टिपण्णी करताना, "जन गण मन" हे आपले अधिकृत राष्ट्रगीत आहे आणि त्याचा तसा मान ठेवला जावा ही विनंती.
वाचने
7655
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
जन गण मन...
In reply to जन गण मन... by अर्धवटराव
असेच म्हणतो
In reply to असेच म्हणतो by गणपा
बदलासाठी नाही
शंका
(पु.लं.च्या मला वाटते 'वंगचित्रे'मध्ये ''जनगणमन' हे 'भो पंचम जॉर्ज भूपा'स उद्देशून कसे नाही' यावर बर्यापैकी विवेचन आहे. फॉर व्हॉटेवर इट इज़ वर्थ. बाकी, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आणि 'जनगणमन' हे राष्ट्रगीत म्हणून अधिकृतरीत्या स्वीकाररूनसुद्धा इतकी वर्षे उलटून गेल्यानंतर, आणि मधल्या काळात इतकी वर्षे 'जनगणमन' हे राष्ट्रगीत म्हणून वाजवल्याने देशाचे काहीही बिघडले नसता, 'जनगणमन' हे मुळात कोणाला उद्देशून होते आणि राष्ट्रगीत म्हणून उचित आहे का, या वादात निदान मला तरी स्वारस्य नाही. रवीन्द्रनाथांनी ते कोणालाही उद्देशून लिहिलेले असो, स्वतंत्र भारताने ते कोणत्या भावनेने आणि कोणाला उद्देशून म्हणून स्वीकारलेले आहे हे महत्त्वाचे. आणि म्हणूनच 'जनगणमन' हे भारताचे अधिकृत राष्ट्रगीत म्हणून स्वीकारताना मूळ कवीने ते नेमके कोणाला उद्देशून लिहिले होते, किंवा 'तराना-ए-हिन्दी' हे अनौपचारिक राष्ट्रीय गान किंवा भारतीय लष्कराची 'क्विक-मार्च'ची अधिकृत धून (संदर्भ: विकी.) म्हणून स्वीकारताना मूळ कवी हा नंतरच्या आयुष्यात पाकिस्तान-संकल्पनेचा पुरस्कर्ता झाला होता, या बाबींना माझ्या लेखी काडीचेही महत्त्व नाही. शिवाय, अगदी समजा की 'जनगणमन' हे रवीन्द्रनाथांनी 'भो-पंचम-जॉर्ज-भूपा'स उद्देशूनच लिहिले होते हे पुराव्याने शाबित वगैरे झाले. पण तरी म्हणून या कारणासाठी आपण आज हे गीत राष्ट्रगीत म्हणून रद्दबातल ठरवून नवे राष्ट्रगीत निवडणार आहोत का? याच ब्याकड्रापावर, पाकिस्तानचे पहिलेवहिले राष्ट्रगीत हे स्वातंत्र्यप्राप्तीच्या जेमतेम तीन दिवस अगोदर श्री. जगन्नाथ आझाद या लाहोरस्थित हिंदू कवीने खास कायदेआझम जीनांच्या वैयक्तिक विनंतीस मान देऊन रचले होते, मात्र जीनांच्या मृत्यूनंतर ते नवीन राष्ट्रगीतासाठी खास स्पर्धा आयोजित करून बदलण्यात आले, या बाबीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. या बाबीचा पाकिस्तानात फारसा उल्लेख होत नाही, फार थोड्या लोकांना ही बाब माहीत असते आणि या पहिल्यावहिल्या राष्ट्रगीताचे आज कोणतेही ध्वनिमुद्रण उपलब्ध नाही, असे वाचले आहे. या संदर्भात एक रोचक दुवा: इथे. प्रश्न हा आहे, की भारतासही इतक्या वर्षांनंतर या बाबतीत पाकिस्तानचा कित्ता गिरवावयाचा आहे का? अन्यथा, या चर्वितचर्वणास कितीसा अर्थ आहे?)
अवांतर: राष्ट्रध्वजाचा मान राखला जावा म्हणून राष्ट्रध्वज कसा हाताळावा, कोणी आणि कसा उभारावा वगैरे बाबींचे नियमन करण्याकरिता जशी नियमावली आहे, तद्वत राष्ट्रगीताच्या संदर्भात काही नियमावली आहे काय?
In reply to शंका by पंगा
?
In reply to ? by विकास
भावना !!
"राष्ट्रीय" म्हणून महत्त्व ऐतिहासिक, कायदेकलम म्हणून नव्हे
In reply to "राष्ट्रीय" म्हणून महत्त्व ऐतिहासिक, कायदेकलम म्हणून नव्हे by धनंजय
धन्यवाद
माझे मत
In reply to माझे मत by हुप्प्या
-१
In reply to धन्यवाद! by पंगा
...
In reply to माझे मत by हुप्प्या
हुप्प्याशेठशी सहमत आहे. वंदे
जन गण मन
अस्साच वाद
वंदे मातरम बँडवर वाजवायला
बादवे...
In reply to बादवे... by पंगा
ते
उथळ प्रतिसाद
In reply to उथळ प्रतिसाद by हुप्प्या
चुकलो चुकलो चुकलो
In reply to चुकलो चुकलो चुकलो by हुप्प्या
ख्या ख्या ख्या
चर्चा वाचतो आहे
In reply to चर्चा वाचतो आहे by ऋषिकेश
काहि ऐकीव माहिती असली तरी इथे
In reply to चर्चा वाचतो आहे by ऋषिकेश
जन गण मन मधील
चांगली माहिती