Skip to main content

मदत हवी आहे - एनआरआय लोन चे रेसिडेंट लोन मधे Conversion

लेखक अंतु बर्वा यांनी मंगळवार, 16/08/2011 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मंडळी, मी सध्या भारताबाहेर असुन भारतात घर घेण्यासाठी NRI लोन घ्यायचा विचार करत आहे. परंतु काही गोष्टींवर मला खुप धुंडाळुनही काही माहीती मिळत नसल्याने मिपाकरांना शरण आलो आहे. जर NRI लोन घेतल्यानंतर काही अपरिहार्य कारणास्तव (असाईन्मेंट संपल्यामुळे म्हणा किंवा ईतर काही कारणाने) भारतात जावे लागले, तर लोनचे प्रोसेसिंग कसे होते? म्ह्णजे ideal केस मधे ते रेसिडेंट लोन मध्ये बदलले जायला हवे परंतु समजा मला इथे राहुन महीना ४५००० EMI देणं परवडत आहे, पण भारतात परत गेल्यावर जर माझा भारतातला पगार ही अमाऊंट कवर करु शकत नसेल तर काय होईल?

शेवटी जे व्हायचे होते ते झालेच.सरकारचे अभिनंदन!

लेखक कापूसकोन्ड्या यांनी मंगळवार, 16/08/2011 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटी जे व्हायचे होते ते झालेच. अण्णा, अरविंद केजरीवाल्,किरण बेदी पोलिसांच्या तब्यात. आम्ही काहीही करू शकतो! तुम्ही कोण विचारणारे? पैसे,ताकद्,सत्ता यांची मस्ती आणी गुर्मी! शंका होतीच. सरकारला आत्ता जाग आली. अण्णा या दिवसाची मनात तयारी करूनच होते. सरकारचे अभिनंदन!! असेच आंदोलन चिरडीत रहा. भारतीय लोकशाही झिंदाबाद! भारतीय राज्याघटनेचा विजय असो! केंद्र सरकार झिंदाबाद! ममो सिंग सरकार आगे बढो! सर्व देशाचा तुरुंग बनवा. ज्या लोकांना आणिबाणी ची इतिहासाची प्रत्यक्ष माहीती नाही, त्यांना तर ही इतिहासाची साक्ष होण्याची पर्वणीच.

मिसळपाव

लेखक अभिजीत राजवाडे यांनी मंगळवार, 16/08/2011 06:27 या दिवशी प्रकाशित केले.
खोबरे मृदु प्रेमाचे अन मिर्ची्चा घाव आहे. आयुष्य तरी हे काय, एक मिसळपाव आहे. सोडुनी गेली होती त्या जुन्या पिंपळाखाली तिथेच भेटशील मजला हे मला ठाव आहे धरतीचा कंप होऊनी ते डोंगर मिटुनी गेले सांगावे लागले मजला, इथेच गाव आहे ज्याने प्रदुषित केले त्यालाही तोय दिधले गंगेकडेही कडेही माझ्या आई्चा स्वभाव आहे खोटे पसरते आहे मजला अजुन आस आहे अजुन माझ्या शरिराला माझे्च नाव आहे

प्रिंट मिडिया अण्णाच्या विरोधात का आहे?

लेखक संपत यांनी मंगळवार, 16/08/2011 02:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिंट मिडिया सध्या सातत्याने अण्णाच्या विरोधी लिखाण करतो आहे (इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या तुलनेत). उदाहरणार्थ आजच्या सर्व पेपरमध्ये अण्णाच्या चळवळीवर पातळी सोडून टीका आली आहे(अमेरिकेचे हस्तक, जातीयवादी). ह्याचे कारण माझ्या मते प्रिंट मिडीयाचे राजकारण्यांची असलेले घट्ट आर्थिक संबंध.आपल्याला काय वाटते?

जन गण मन च्या निमित्ताने

लेखक विकास यांनी मंगळवार, 16/08/2011 01:56 या दिवशी प्रकाशित केले.
आज भारताच्या स्वातंत्र्यदीना निमित्त तसेच रविन्द्रनाथ टागोरांच्या १५०व्या जयंतीनिमित्त सरकारने पुढाकार घेऊन केलेले आपल्या राष्ट्रगीताच्या पाचही कडव्यांचे सुंदर सादरीकरण ऐकायला मिळाले. आपण जर पाहीले नसेल तर ते अवश्य पहावेत! घटनेप्रमाणे केवळ पहीली दोन कडवीच राष्ट्रगीत आहे.

काय हे मनिष तिवारी-जी!

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 15/08/2011 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णा हजारे यांच्यासाख्या ज्येष्ठ आणि त्यागी व्यक्तीला संबोधताना "तुम", तुम्हारा" सारखे एकेरी सर्वनाम वापरणार्‍याचे कुणीही समर्थन करणार नाहीं. पण काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते असलेल्या मनिष तिवारी यांनी पूजनीय अण्णांना असे एकेरीत संबोधले. त्याबद्दल त्यांचा त्रिवार निषेध! ('साहेब'चा 'जी' केला आहे!)

सैरभैर .......

लेखक स्पंदना यांनी सोमवार, 15/08/2011 06:06 या दिवशी प्रकाशित केले.
काचेतुन बाहेर लॉन वर एक कावळा दिसतोय. कावळाच असावा. तीच चालण्याची ऐट, तेच मान वाकडी करुन निरखुन पहाण, तोच अलर्टनेस . खरच कावळ्या सारख तरतरीत पाखरु नाही दुसर! पण मग हा पांढरा रंग? मला हसुच फुटल. कावळ्याची अन बगळ्याची गोष्ट आठवली. त्यात बगळ्या सारख गोर होण्यासाठी नदीवर जाउन साबू लावून, घासून घासून अंग पांढर करायच्या प्रयत्नात रक्तबंबाळ झालेला कावळा आठवला. याला माहित असेल का ही गोष्ट? नुसता साता समुद्रा पल्याडचा नव्हे तर दक्षिण गोलार्धातला कावळा हा! आपल्या भारतीय संस्कृतीच माप याला लावुन चालेल काय? च ... काय हे ? कुठून कुठ ?

दामिनी

लेखक मराठे यांनी सोमवार, 15/08/2011 05:00 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या दिवसभर घरात खूपच गरम होत होतं. टिव्ही वरून संध्याकाळी थोडा पाउस असेल असं सांगत होते पण सात साडेसात पर्यंत आकाशात कसल्याही संशयास्पद हालचाली दिसेनात. घरात उकडत होतं म्हणून बाहेर ग्यालरीत येउन बसलो. थोडावेळ गेला नसेल तोच वारा सुरू झाला आणि बघता बघता आकाश भरून आलं. हा हा म्हणता विजांचा कडकडाट सूरू झाला आणि दणदणीत शॉवरबाथ घेतल्यासारखा पाऊस सुरू झाला.