Skip to main content

ग्रहण-१

लेखक स्पा यांनी गुरुवार, 15/09/2011 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
सायबानू मीच त्यो .... अंतिम आता पुढे .......... **************************************************************************** माणसाचं आयुष्य मोठं अनाकलनीय आहे. प्रत्येक पुढचा क्षण हा अनपेक्षित असतो. काही काही लोकांच आयुष्य तीस-चाळीस वर्ष तसच्या तसं जातं, काही बदल नाही..साचलेल्या डबक्याप्रमाणे.! पण काहींच आयुष्य.....

फुलांची बाग - मी काढलेली काही फुलांची छायाचित्रे

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 15/09/2011 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, मी काढलेल्या छायाचित्रांचा एक स्लाईड शो टाकत आहे. लोड व्हायला थोडा वेळ लागेल पण खात्री आहे बघितल्यास निराशा होणार नाही. पहिल्य चित्रावर क्लिक केल्यास दोन त्रिकोण दिसतील. त्याच्यावर क्लिक केल्यास पुढचा फोटो दिसेल. अर्थात तुम्हाला हे माहिती असेलच. :-) निसर्गाचे उपकार !

भारत्-पाक १९६५ युद्ध्....त्रोटक आणि विस्कळित माहिती

लेखक मन यांनी गुरुवार, 15/09/2011 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
१९६५ चे भारत पाक युद्ध सुरु कसे झाले? पार्श्वभूमी:- १९६०चे दशक एक वेगळेच समीकरण जागतिक राजकिय पटलावर मांडत होते. शीतयुद्धाला रंग चढत होता. NATO च्या छत्राखाली अमेरीकन समर्थक देश व कम्युनिस्टांच्या लेबलखाली तत्कालीन USSR म्हणजे रशियाचे समर्थक अशी कधी छुपी तर कधी उघड स्पर्धा सुरु होती. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळताच अमेरिकेने स्वतः मैत्रीचा हात पुढे करत भारतात अमेरिकन तळ मागावायचा प्रयत्न केला. भारताने तो फेटाळुन लावल्यावर राजकिय दृष्टीने अमेरिकेच्या मनात भारताविषयी अढी निर्माण झाली ती पुढे कित्येक दशके वाढतच गेली.

जालरंग प्रकाशनाच्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवा !!!

लेखक सुहास झेले यांनी गुरुवार, 15/09/2011 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी आता आपल्याला वेध लागलेत दिवाळी अंकाचे. जालरंग प्रकाशनातर्फे आपणही दिवाळीचे स्वागत साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांनी करूया. आपण नवोदित असाल किंवा अनुभवी, आम्ही सगळ्यांना सामावून घेतो. तेव्हा चला,उठा आणि सज्ज व्हा आता. आपल्या दिवाळी अंकासाठी कोणताही एक विशिष्ट असा विषय नाहीये.

एक स्वतःची भाषा

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 15/09/2011 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळीवर वावरताना आपल्या लक्षात येइल. मिसळीची एक स्वतःची भाषा आहे. काही स्वतःचे शब्द आहेत. आपण त्याची यादी करुया उदा... मोठे व्हा जिलब्यापाडू लिखाण हलवाई भंपक आपल्याला आठवणार्‍या शब्दांची आपण भर घालावी ---

रानी माज्या मळ्यामंदी

लेखक जागु यांनी बुधवार, 14/09/2011 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आईकडच्या छोट्याश्या मळ्याला लागलेल्या भाज्या. १) दुधी भोपळा २)

शैक्षणिक वर्षातील अंतर् असलेल्यांनी/एक वर्ष नापास असलेल्यांनी कधीच सरकारी नोकरी करायची नाही?

लेखक pramanik यांनी बुधवार, 14/09/2011 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
जवळजवळ सर्वच सरकारी नोकरीच्या भरतीच्यावेळी 'शैक्षणिक वर्षातील अंतर् असलेल्या/एक वर्ष नापास झालेल्या' विद्यार्थ्यांना डावलले जाते.मी कीत्येक उदाहरणे बघितलेत ज्यांमधे विद्यर्थ्यांनी बारावी कींवा डीग्रीच्या एखाद्या वर्षात नापास व्हावे लागले/त्यांनी एकतर काही अटळ कारणास्तव परीक्षाच दीली नाही कींवा परीक्षा देउन नापास झाले.त्याच विद्यार्थांनी नंतरच्या परीक्षेत ८०-८५% टक्के काढले. पण सरकारी नोकरीत ते परीक्षा पास होतात व ईंटरव्ह्युला नाकारले जातात. हे कीतपत बरोबर आहे?

पाहूच की

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 14/09/2011 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
पाण्याला आवड असून चालत नाही रंगांची अन् आरशाला प्रतिमांची . आरशाला तरी मुभा असते अंधारात डोळे मिटण्याची कवीला मात्र पाण्यासारखेच राहावे लागते अंधार असो वा उजेड नावड असो वा आवड त्याला लिहावीच लागते, हृदयातून उमटणारी ओळ . जसे पाण्याला घ्यावाच लागतो, त्यात मिसळणारा रंग . पडलाच उजेड तर दिसेलच कि जगाला पाण्याचा रंग आणि कवीची ओळ म्हणूनच मी निवांत आहे . माझ्या ओळीच्या प्रारब्धिही असेलच कि उजेड उजळेल तेव्हा पाहूच की |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१४/०९/२०११)
काव्यरस

निष्पर्ण

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 14/09/2011 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
"बाबा, आईला पण घेऊन जा ना आज; तिची खूप इच्छा आहे..." "असं काय करतोस, गौतम? तुला माहिती आहे ना काय होतं ते?" "मला माहिती आहे हो...पण...अपूर्वापण मला सांगत होती की आज बाबांना आईला सोबत घेऊन जायला सांग म्हणून...आई रडली तिच्याजवळ काल दुपारी." "गौतम, मला वाटत नाही का तिला सोबत घेऊन जावं म्हणून? मागच्या वेळेस मी आणि ती गेलो होतो सुधाकरच्या घरी. मग घरी परत आल्यावर ती कितीतरी वेळ रडत बसली होती कुणी तिच्याशी बोलत नाही म्हणून..." "मग तुम्ही तिला सहभागी करून घेत जा ना तुमच्या गप्पांमध्ये. म्हणजे आपोआप सगळे बोलतील, बरं वाटेल तिला...सुधाकरकाका, विमलकाकू, अजय, स्मिता...सगळ्यांना माहिती आहेच ना.