मालवणी फिश करी
साहित्यः
पापलेट स्वच्छ करून तुकडे करणे
१ वाटी खोवलेले खोबरे
१ मध्यम कांदा बारीक चिरून
२-३ लसुण पाकळ्या
३-४ आमसुलं
१ टेस्पून धणे
५-६ बेडगी किंवा संखेश्वरी मिरच्या (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त)
मीठ चवीनुसार
१ टीस्पून गरम मसाला (ऐच्छिक)
तेल
६-७ तिरफळं , आतील काळी बी काढुन टाकावी , तिरफळं पाण्यात भिजवावी, मग ठेचुन त्याच पाण्यात घालावी. (हे ऐच्छिक आहे)
पाकृ:
पापलेटच्या तुकड्यांना थोडी हळद व थोडे मीठ लावून ठेवावे.
धणे व मिरच्या १/२ तास गरम पाण्यात भिजवून ठेवणे.
नंतर ओले खोबरे, लसुण, धणे, मिरच्या व कांदा एकत्र मिक्सरमधून बारीक वाटून घेणे. (कांद्यातील १ टेस्पून कांदा बाजुला काढून ठेवणे.)
वाटलेला तयार मसाला.
जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करून १ टेस्पून कांदा गुलाबीसर परतून घ्यावा.
त्यात वाटलेला मसाला घालून चांगले परता.
कालवणासाठी लागेल तसे पाणी घालून उकळी आणा.
त्यात माश्यांचे तुकडे, मीठ, गरम मसाला व आमसुलं घाला , सुमारे १० मिनिटे शिजवावे.
तिरफळाचे पाणी गाळून कालवणात घालावे व ४-५ मिनिटांनी शिजवून गॅस बंद करावा
चिरलेली कोथिंबीर घालावी व चपाती, भाताबरोबर सर्व्ह करावी.

वाचने
13529
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
खुप छान पाकक्रुती...
In reply to खुप छान पाकक्रुती... by कौशी
हेच म्हणणार होतो
In reply to हेच म्हणणार होतो by चिंतामणी
:) कधीही या..आम्हाला
In reply to :) कधीही या..आम्हाला by सानिकास्वप्निल
धन्यु.
In reply to धन्यु. by चिंतामणी
जिथे जमेल
कातिल!!!!
(खालून दुसर्या फोटोवरून प्रतिक्रिया)
आयेचो घो..
In reply to आयेचो घो.. by chipatakhdumdum
गरम मसाला थोडाच
व्वाह !! मार डाला ... आत्ताच
गरम मसाला आणि लसूण
ख त र ना क !! टेम्पिंग !!
काय बोलू..?..!
आज नको
तिरफळा म्हण्जे?