Skip to main content

लोकसत्ता मध्ये मिपा गौरव आणि दखल.

लेखक कलंत्री
Published on शनीवार, 07/05/2011
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=61&Itemid=74 वेबजगत खमंग मिसळ-पाव पुणे असो वा सातारा, कोल्हापूर असो वा नाशिक.. गरमागरम आमटी, कांदा, फरसाण आणि वर लिंबू पिळलेली ‘खमंग मिसळ’ पावासोबत खाण्याची लाइफ स्टाइल’ आजही लोकप्रिय आहे. ही मिसळ-पाव खाताना सोबत कुटुंबीय किंवा दोस्त असले तर गप्पांची लज्जत आणखी वाढते. फर्मास ‘मिसळ-पाव’मध्ये विविध चवीचे पदार्थ असतात व अस्सल मराठीपण असतो. हेच नाव धारण केलेली मराठमोळी, धमाल वेबसाइट आहे. www.misalpav.com जगभर पसरलेल्या मराठी नेट भटक्यांचे विचार, त्यांचे अनुभव, त्यांची कला, त्यांच्या अभिव्यक्ती माय मराठीतून सादर करण्याची संधी देणारे हे अस्सल मराठमोळं व्यासपीठ आहे. इतले धमाल पोस्ट/ ब्लॉग्ज वाचून तुमचेही हात प्रतिक्रिया टाइप करण्यासाठी शिवशिवू लागतील. या संकेतस्थळावर काय आहे?’ असं विचारण्याऐवजी ‘काय नाही?’ असं विचारा. खरंतर इथला बराच मजकूर इतरत्र छापील स्वरूपात प्रकाशित व्हावा इतका दर्जेदार आहे. प्रथमच पाहणाऱ्यांनी संपादकीय धोरण’ वाचून पुढे नवे लेखन, काथ्याकूट किंवा माझे लेखन’सारख्या दालनातील प्रत्येक उपशीर्षकावर क्लिक करून पुढे वाचत जावे. आवर्जून येथे सदस्यत्व घ्या व तुमच्या कलाकृती व प्रतिक्रिया अपलोड करा. दिवाळी अंक, गप्पांची चावडी, वाचनालय, व्याख्यानमाला या सर्वाचा एकत्रित अनुभव नियमित देणारे हे संकेतस्थळ नक्की पाहा. विवेक मेहेत्रे सर्व मिपा प्रेमी चे अभिनंदन. मिपा अजून उत्तरोत्तर प्रसिद्ध राहो ही प्रर्थना.

वाचन संख्या 12345
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

आज ही बातमी वाचून बराच आनंद झाला. मिपा जेंव्हा बाल्यावस्थेत होते तेंव्हा बर्‍याच लोकांनी बरेच कष्ट घेऊन मिपाची वाढ होईल हेच पाहिले. मात्र आहे तेथेच न थांबता बरीच वाटचाल करावयाची आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. मराठी गाण्याचा दृकश्राव्य खजिना, मुलांच्या गोष्टी मुलांच्याच आवाजात ऐकण्याची सोय, चित्रपट परिक्षणे इत्यादी इत्यादी.

मि.पा. चे त्रिवार आभिन॑दन ! विनित

अभिनंदन!!!मिपाच्या संस्थापकांचे, ते चालवणार्‍यांचे आणि त्यावर वाचनिय लिखाण करणार्‍यांचे.

लोकसत्ताने घेतलेली दखल बघुन एक मिपाकर म्हणून आनंद झाला :)

In reply to by ऋषिकेश

लोकसत्ताने घेतलेली दखल बघुन एक मिपाकर म्हणून आनंद झाला असेच म्हणतो. येथे माहिती दिल्याबद्दल, कलंत्रीसाहेबांना धन्यवाद इतले धमाल पोस्ट/ ब्लॉग्ज वाचून तुमचेही हात प्रतिक्रिया टाइप करण्यासाठी शिवशिवू लागतील. या संकेतस्थळावर काय आहे?’ असं विचारण्याऐवजी ‘काय नाही?’ असं विचारा. चपखल!

In reply to by विकास

लोकसत्तेतील वरील बातमी वाचून आनंद झाला. कलंत्रीसाहबांना धन्यवाद.

आजच वाचले होते. याचे श्रेय तात्या, नीलकांत, संपादक मंडळ व मिपाला श्रीमंत करणारे मिपावरचे साहित्यिक यांनाच जाते.

हे लै झाक झाल बघा,आता बघु किति लोक-सत्ता गाजवायला येतात ते.त्यान्ना म्हनाव,आमच्या तर्रिला तोन्ड लावन सोप न्हाई,,आम्चि तर्र्रि नुसतिच तिखट न्हाय,चरचरित बि असतिया...हित निसते खिशात पैसे असुन जमनार न्हाई,पचवायचिबि तयारि लागल...तवा चान्ग्ल टाईट असाल तरच या........................................पराग दिवेकर.

मिपाची उत्तरोत्तर प्रगती होत राहो, हीच शुभेच्छा.. तात्यांचे, निलकांतचे आणि संमंचे तसेच सर्व मिपाकरांचे अभिनंदन... :-)

मस्त बातमी. मिपाला "प्रेस कव्हरेज" नावाचा वेगळा विभाग सुरु करावा लागेल असे वाटते, मिपा आणि मिपाकर दोघंही प्रिंट मिडियात कुठेना कुठे झळकतच आहे.

In reply to by आनंदयात्री

सहमत आहे.

हि बातमी वाचून मनापासून आनंद झाला.. आणी या परीवारात आम्ही ही सदस्य आहोत याचा अभिमान.. @याचे श्रेय तात्या, नीलकांत, संपादक मंडळ व मिपाला श्रीमंत करणारे मिपावरचे साहित्यिक यांनाच जाते सहमत मिपाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो, हिच सदिच्छा आणि पुन्हा एकदा शुभेच्छा..

या संकेतस्थळावर काय आहे?’ असं विचारण्याऐवजी ‘काय नाही?’ असं विचारा. खरंतर इथला बराच मजकूर इतरत्र छापील स्वरूपात प्रकाशित व्हावा इतका दर्जेदार आहे.
मिपाचे नाव वर्तमानपत्रात येउन कौतुक झाले याचा आनंद आहेच पण या शब्दात मिपाचे कौतुक व्हावे याचा जास्त मोठा आनन्द आहे. दर्जेदार लिखाण देणारया मिपाकरांचे , नीलकांत आणि संपादक मंडळाचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

कलंत्री, लोकसत्ता आणि समस्त मिपाकरांचे ! आवर्जून दखल घेतली गेल्याबद्दल ' मिसळपाव " चेही !!!

आत्तापर्यन्त मिपावरचे शिलेदार प्रिंट मिडीयात चमकत होते. आता खुद्द मिपाचीच दखल प्रिंट मिडीयाने घेतली आहे हे पाहून आनंद झाला.

छान बातमी! वाचून आनंद झाला. स्वाती

इवलेसे रोप लावियेले इंटरनेटच्या दारी। तयाचा वेलू गेला गगनावरी॥ मिसळपावचे हार्दिक अभिनंदन....

आता समस्त मिपाकरांनो, मस्त पैकी एक मिसळपाव जवळच्या हाटेलात मारुन आनंद साजरा करा. मी केला. धमाल आणि मजा आली. खेळीमेळीचे वातावरण ठेवले की नाडी वात आणणार नाही...

In reply to by शशिकांत ओक

>>मी केला. काय केला हो काका ? >>धमाल आणि मजा आली. अरे वा वा .. धमाल आला होता हे ऐकुन आनंद झाला .. ही मजा कोण ? तीने कधी सदस्यत्व घेतले ?

In reply to by शशिकांत ओक

गरमागरम आमटी, कांदा, फरसाण आणि वर लिंबू पिळलेली ‘खमंग मिसळ’ पावासोबत खाण्याची लाइफ स्टाइल’ आजही लोकप्रिय आहे. लोकसत्ताच्या लेखातील हे पहीले वाक्य दाताखाली आलेल्या खड्यासारखे आठवत होते. :(

In reply to by चिंतामणी

सेम हियर. नशीब "वरण" नाही म्हटले. :) शिवाय माझ्यामते खमंग हा शब्द मिसळीसारख्या अर्धद्रव पदार्थाला वापरत नाहीत. तो थालीपीठ किंवा तत्सम खुसखुशीत / कुरकरीत पदार्थाला वापरतात. चू.भू.दे.घे.

आनंद झाला, समाधान वाटले. नीलकांताचा, सर्व मिपाकरांचा आणि लोकसत्तेचा मी ऋणी आहे.. तात्या.