लेखकप्रकाश१११यांनी सोमवार, 03/10/2011 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
[ -घोडा म्हणजे मनातील विकार . दूरदेशी गेल्यावर त्यावर नियत्रण ठेवणे अवघड जाते .आपले मन म्हणजे संस्कार .संस्कार म्हणजे लगाम. आपला आपल्याला लगाम लावणे अवघड जाते त्रास होतो आणि ही तारेवरची कसरत असते].
लेखकसानिकास्वप्निलयांनी सोमवार, 03/10/2011 06:21 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य चिकन चिमीचांगा:
५०० ग्राम साफ करुन तुकडे केलेले बोनलेस चिकन
फ्लॉर / कॉर्न तोरतीया (Tortilla)
३ टेस्पून तयार मेक्सिकन सीझनिंग (हे जर तुम्हाला नाही मिळाले तर तुम्ही पॅपरीका पावडर किंवा लाल मिरची पावडर, मीठ, गार्लिक पावडर, ऑरेगॅनो, लिंबाचा रस, जिरेपूड, धणेपूड, साखर हे सर्व एकत्र वापरु शकता.)
१ हिरवी भोपळी मिरची बारीक चिरलेली
१ लाल भोपळी मिरची बारीक चिरलेली
१ मध्यम कांदा बारीक चिरलेला
१ छोटा टोमॅटो चिरलेला
१ टीस्पून लसूण बारीक चिरलेले
१ टीस्पून काळीमिरीपूड
२-३ हॅलेपिनो किंवा हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
१ वाटी मॉंन्टेरी जॅक ची
लेखकयकुयांनी सोमवार, 03/10/2011 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
आयुर्विमा घेताना प्रस्तावकाला पूर्वीपासूनच असलेल्या सर्वसामान्य आजाराबद्दल विमा कंपनीला माहिती दिली नाही, हे कारण विमा रक्कम व विम्याचे इतर लाभ नाकारण्यास पुरेसे ठरू शकत नाही. विशेष म्हणजे "सर्वसामान्य आजारात" सर्वोच्च न्यायालयाने मधुमेह व उच्च रक्तदाब हे आजार ग्राह्य धरले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा आधार घेऊन एका ग्राहक मंचाने दिलेला निर्णय नुकताच माझ्या हातात पडला, करिता हा प्रपंच. विमा धारकाने एका खासगी विमा कंपनीचा विमा काढताना कंपनीच्या वैद्यकीय प्रश्नावलीत त्याला पूर्वीपासून असलेल्या आजाराबद्दलच्या प्रश्नात "नाही" असे उत्तर दिले होते.
लेखकचित्रगुप्तयांनी रविवार, 02/10/2011 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
धर्म - अर्थ - काम - मोक्ष हे पुरुषार्थ, बद्ध - मुमुक्षु - साधक - सिद्ध, या अवस्था आणि अष्टांगयोग
रोजनिश्यांमधील आठवणी वाचताना जाणवलं, की अरे, आपण किती उत्साही, धडपड्ये होतो, भविष्याची यत्किंचीतही कल्पना नसताना जेंव्हा जे जे समोर येत गेलं, सुचत गेलं, ते ते करत गेलो, यातून काहीतरी हिताचं असं घडतच गेलं, आणि आज बहुतांश कौटुंबिक जबाबदारया संपून आपण आता वाटेल ते करायला - आपल्या विशिष्ट मर्यादांमध्ये का होईना, स्वतंत्र आहोत...
...
लेखकमाझीही शॅम्पेनयांनी रविवार, 02/10/2011 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
नवरात्र नऊ रंग , स्त्री-शक्ति आणि आम्ही !
.. कुठलीही नवी जुनी गोष्ट सांगायची तर परवा ठरलेला असतो, पण ही कालची, परवाची , तेर्वा ,एरवाची आणि येणार्या उद्या , परवाची पण आहे पण गोष्ट आहे असो
अहो कालचीच गोष्ट स्टेशनवर उतरलो तर समस्त स्त्री वर्ग छान पैकी हिरव्या रंगांत न्हाउन गेला होता.
सगळ्या बायका , मुलीनी छान पैकी हिरवा रंगाच्या ठेवणितल्या साड्या घातल्या होत्या. ज्याना पूर्ण पणे ह्या रंगाचे पारंपरिक कपडे घालायचे नव्हते त्यानी जीन्स आणि हिरवे टॉप घातले होते. थोडा वेळ एकदम छान वाटल. पुढे रिक्शेच्या रांगेत पुढे मागे हिरवाच रंग होता.
लेखकआनंद घारेयांनी शनिवार, 01/10/2011 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
सन १९७५ - आम्ही माझ्या एका ज्येष्ठ आप्तांकडे आग्र्याला गेलो होतो, त्यांचे नाव डॉ.कुंटे. पूर्वी राजाकी मंडी या भागात त्यांचा दवाखाना होता आणि त्याच भागात ते रहात असत. एक निष्णात डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होतीच, शिवाय समाजकार्य आणि देशसेवा यातही त्यांचा महत्वाचा सहभाग असल्यामुळे त्या भागातील आबालवृध्द त्यांना ओळखत होते. पुढे त्यांचा मुलगा राजा डॉक्टर बनला आणि हळूहळू त्याचा जम बसत गेला. त्यांच्या दवाखान्याखेरीज इतर काही नर्सिंग होम्स, हॉस्पिटल्स वगैरेंमध्ये तो जात असे. राजाकीमंडीमधील जुने घर सोडून ते कुटुंब आग्रा शहराच्या बाहेर दयालबाग रोडवरील नव्या बंगल्यात रहायला आले.
लेखकशरदयांनी शनिवार, 01/10/2011 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
गाथा तरंगली का?
परवा आमच्याकडे शरदबोवा आले. हे शरदबोवा कोण असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का ? सांगतो. हे थापा मारतात ; पण अगदी बेमालूम ( हे प्रमाणपत्र मॅडम प्रियाली यांनी दिले आहे तेव्हा ते खरे आहे असे आपण धरून चालू. ) त्यांच्या थापा अगदी विश्वासार्ह वाटतात. आल्यावर त्यांनी एकदम विचारले " काहो, तुकारामांची गाथा इन्द्रायणीतून वर आली, यावर तुमचा विश्वास आहे की नाही ? " मी काही उत्तर देण्याआधीच ते म्हणाले ' घाई करू नका. तुम्हाला पुरावाच देतो " त्यांनी त्यांच्या पोतडीतून काही कागद काढले व म्हणाले " परवा देहूला गेलो होतो, तेथे बूवांची अस्सल गाथा सापडली आहे. त्यातले दोन अभंग मला मिळाले आहेत.