माहेरी जायची मला झाली आता घाई
माहेरी जायची मला झाली आता घाई
डायवर दादा रं
डायवर दादा जोरात गाडी चालीव की रं
माहेरी जायची मला झाली आता घाई रं
गेले व्हते मी बाई मागल्या दिवाळीला
पुरं व्हत आलं आता वरीस त्या सणाला
आखाजी संपून आता दसरा आला की रं
माहेरी जायची मला झाली आता घाई रं
बा माझा कसा आसलं शेतात राबूनी
थकला आसंल घाम कष्टाचं गाळूनी
यिचारपुसं त्याची समक्ष करू दे की रं
माहेरी जायची मला झाली आता घाई रं
आयी माझी हाये जनू बाभळीचं लाकूड
सौंसाराच्या आगीसाठी जळतीया भुरभुर
कधी भेटती ती मला आसं मला झालं रं
माहेरी जायची मला झाली आता घाई र
मिसळपाव
- २ वट्या मुगाची डाळ (सालीसकट or सालीशिवाय) दोन तास भिजत घाला.
- दोन तासानन्तर डाळ साधारण दुप्पट होइल.
- जास्तिचे पाणी काढुन हि डाळ, २ मिरच्या, २ लसुण पाकळ्या, १/२ इन्च आल, बारीक चिरलेलि कोथिम्बिर, चविनुसर मीठ आणि किन्चित हिन्ग घालुन mixer मधुन वाटुन घ्या.
- हे मिश्रण जाड्सरच राहु द्या.
- आता वरुन थोडे जीरे, बरिक चिरलेला कान्दा घालुन आप्पे-पात्रामधे आप्पे बनवा.
मी हे Maggie Hot n Sweet Ketchup बरोबर serve केले.