बोस्की-इंटीमेट आणि सी -९०
लेखनप्रकार
१९६९ किंवा ७० साल असावं . एल निनोचं नाव तेव्हा कुणालाच माहीती नव्हतं. नैऋत्य मोसमी वारे आणि खारे वारे -मतलई वारे इतकंच भूगोलाचं ज्ञान होतं.. याच दरम्यान एक नविन वारं खेळायला लागलं. दुबईचं सोनेरी वारं .या वार्याची जाणीव आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांना उशीराच झाली .
दुपारच्या वेळी पारवळं पकडत उनाड फिरणारी तांबोळ्याची आणि अत्ताराची पोरं दिसेनाशी झाली आणि अचानक वर्षभरात रमझान इदेला झगझगीत पांढर्या कपड्यात गले मिलताना दिसायला लागली . इस्माईल पारटेची गाडी उलाल होऊन अंगणात उभी होती पण पारट्याची पोरं दिसेनाशी झाली .खोताची पाड्यावरची जमीन मकबूलनी दामदुपटीनी घेतल्याची आवई कानावर आली . मशीदीच्या वळचणीत भरणार्या मदरशात अरबी शिकवणारा नविन मास्तर आला.
मग उशीरानी का होईना हळूहळू दुबईच्या वार्याची झुळुक भटाब्राह्मणांच्या वाड्यांवर पण आली. आयटीआय मधून टर्नर -फिटर झालेली खरे खांबेट्यांची मुलं दुबईला गेली .
दुबईच्या पैशानी उंच वाटणारं आकाश हाताशी आलं . इंदीराजींची गरीबी हटाव मोहीम राबवूनही गरीबी हटली नाही पण या नव्या श्रम संस्कृतीनी घरावरचं खचत आलेलं आढं पुन्हा उंचावलं . तशी या दरम्यान पूर्वेकडे हाँगकाँग सिंगापूरची हवा पण जोरात होती पण दुबईसारखी मागणी तिकडे नव्हती .तिकडे स्वस्त चिनी कामगार उपलब्ध होते. अतीपूर्वेच्या आघाडीवर सामसूमच होती.
हिंदी -उर्दु बोलणारे मुस्लीम आखाताकडे आणि तैवान चिन कोरीयाचे श्रमबळ हॉगकाँग सिंगापूरकडे . धर्म आणि भाषेच्या वळणानी मनुष्यबळाचे होणार्या स्थलांतराचा हा उत्तम नमुना होता.
आखातात गेलेली सगळी मुलं येताना तीन वस्तू आठवणीने आणायची. बोस्कीचं झुळझुळतं कापडं -इंटीमेट स्प्रे आणि सोनीच्या सी -९० च्या कॅसेट. या तिन्ही वस्तू म्हणजे नव श्रीमंताची स्टेटस सिंबॉल . श्रम संस्कृतीचं फॅशन स्टेटमेंट.
कॅसेट आल्या .कॅसेट भरण्याची दुकानं आली. आपसात आवडणार्या गाण्यांची देवघेव व्हायला लागली . मग डुप्लिकेट सोनीच्या कॅसेटी आल्या .नल्ला कॅसेटीतून टेप भसाभसा बाहेर पडून टेपरेकॉर्डरच्या हेडला फास लावायची .कॅसेट असली -नकली समजणार्याकडे पोरं भक्तीभावानी बघायला लागली . हळूहळू सी ९० जाऊन टीडीकेच्या कॅसेटी आल्या. टीडीके नल्ला मिळायच्या नाहीत म्हणून त्यांचा भाव जास्त असायचा .
काही वर्षानी जंबो रोल भारतात कट व्हायला लागले आणि वर्शन रेकॉर्डींगची एक नवीनच कहाणी सुरु झाली.
पांढरं स्वच्छ झुळझु़ळीत बोस्कीचं कापड खरं म्हणजे कोरीयात तयार व्हायचं पण आपल्याकडे आलं दुबईमार्गे. बोस्की म्हणजे शॅटुंग सिल्कचाच एक प्रकार . पण शॅटुंग खरखरीत आणि जाड असतं बोस्की हलकं आणि पूर्णपणे मानवनिर्मीत धाग्यातून बनवलेलं .त्यामुळे डागळलं तरी थोडासा साबण लावला की परत टवटवीत स्वच्छ दिसायला लागायचं . त्या कपड्याची क्रेझ बरेच दिवस टिकली . हे नाव विस्मरणातही गेलं असतं पण लोकांनी त्यांच्या पॉमेरीयन कुत्र्यांची (मुलींचीही) नाव बोस्की ठेवायला सुरुवात केली आणि बोस्की कायमचं लक्षात राहीलं.पण हळूहळू बोस्कीच्या कापडाची नवाई संपली इंटीमेट चा सुगंधही कंटाळवाणा झाला.
दुबईच्या वार्याचा जोर कमी झाला आणि सिलीकॉन वॅलीचे वारे वहायला लागले .
दुबईच्या वार्यानी श्रमजीवींचा उध्दार केला आणि सिलीकॉन वॅलीनी बुध्दीजीवींचा .
जे कुळ कायद्यात हरवलं ते सिलीकॉन व्हॅलीनी दिलं .
एव्हरी अंडरडॉग हॅज हि़ज डे.
वाचने
21409
वाचनखूण
प्रतिक्रिया
45
छान लिहिलय काका.
:-) सुरेख :-)
नेहमीप्रमाणेच सुंदर लेख. त्या
नेहमीप्रमाणेच छान!
अरे!
आहाहा! त्या केशरी रंगाच्या कव्हरवाल्या सोनिच्या कॅसेट्स....
नाईस नॉस्टाल्जिया!!
लेखनाला दंडवत. इतकं कमी
सुरेख
In reply to सुरेख by सुनील
कॉटस् वूल नावाचाही काही
रामदास काका इज बॅक..
ह्म्म्म्म्म्म्म्म
वा!
ढापलेला लेख
In reply to ढापलेला लेख by सुनील
काय राव..
In reply to काय राव.. by मोदक
काय म्हन्ता?
मस्तच
लेख
रामदास काकांनी यावेळी हात
छान लेख पण चुटपुट लावून संपला!
नेहमीप्रमाणे सुंदर लेखन
मस्त
In reply to मस्त by नंदन
+ १
रामदास काकांनी लिहिलं आहे
In reply to रामदास काकांनी लिहिलं आहे by मृत्युन्जय
+१
दुबई...
paradigm shift
बॉस्की- सी ९०
छान लिहिलय.
मस्तच लेख
जमाना
मस्त आणि चुरचुरीत
सहज सोपा आणि मनाला भिडणारा
वावा..
अशी
अरेच्च्या बासुंदी तोंडात घोळेपर्यंत संपली पण ...
अतिशय मस्त लेख.. अजूनही
In reply to अतिशय मस्त लेख.. अजूनही by गवि
८०-२०
या दुबईला जाणार्या लोकांमुळे
सी - ९० आणि अन्य
सर लेख आवडला.
मस्त!
लोकप्रभातल्या लेखाची लिंक
वर काढतोय
अनेक आठवणी ताज्या झाल्या.