Skip to main content

इच्छा मरण

लेखक रघु सावंत यांनी बुधवार, 11/01/2012 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
मला मरण यावे ते समुद्रात यावे एकदा तरी मनसोक्त मला माशांनी खावे आयुष्यभर मी ज्यांचे लचके तोडले त्यांनी मला एकदा फाडले तर काय बिघडले ज्यांच्या मऊ अंगावर मसाला लिंबू चोळून तव्यावर खरपूस भाजून टाकले मी खाऊन मी मेल्यावर हे हात त्यांना दिसावेत एकदा तरी मनसोक्त मला बोंबलानी खावे. कधी सुंगटाची कढी कधी तव्यावर जवला वांग्याचं भरीत ,कधी कोलंबी मसाला बाहेर पडलेल्या जिभेवर त्यांनी हक्काने बसावे एकदा तरी मनसोक्त मला कोलंबीने खावे कोळणीकडे निपचीत पडलेली सुरमई पापलेट किंमत कमी करून मी दिली सारात सोडून त्या सुरमई पापलेटाने मला कमी भावात आणावे एकदा तरी मनसोक्त मला सुरमई पापलेटाने खावे खोबरं लाल तिखट धण

‘निया’ मधल्या लाकडी पाट्या

लेखक ए.चंद्रशेखर यांनी बुधवार, 11/01/2012 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
सातव्या शतकाच्या सुरूवातीला (602-664) होऊन गेलेला ह्युएन त्सांग (Xuenzang) हा प्रसिद्ध चिनी बौद्ध भिक्कू आणि पर्यटक बहुतेक सर्वांना माहीत आहे. 17 वर्षाच्या कालखंडात त्याने भारतभर केलेला प्रवास आणि बौद्ध धर्माच्या सूत्रांच्या प्रती काढण्यासाठी त्याने केलेले परिश्रम हेही प्रसिद्धच आहेत. त्याने आपल्या प्रवासाचे अत्यंत बारकाईने केलेले वर्णन हा त्या काळच्या भारतातील परिस्थितीचे ज्ञान करून घेण्याचा एक सुलभ मार्ग मागची 1400 वर्षे जसा होता तसा आजही आहे. हा बौद्ध भिक्कू चीनहून खुष्कीच्या मार्गाने भारतामधे आला, फिरला व चीनला परत गेला.

सो...हम....सो...हम!!

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 11/01/2012 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मित्रमंडळींनो, `आपला अभिजित` नावाने मिपावर वावरणारा त्रस्त समंध गेले काही दिवस, काही महिने कुठे गायब झाला, असा प्रश्न आपणांस पडला असणे साहजिक आहे. अर्थात, हा आपला माझा समज. `तुझ्यावाचून मिपा ओस पडलंय रे बाबा, कधी परततोयंस` अशी आर्त साद मला कुणी खव किंवा टपाल हापिसातून घातलेली नाही. मिपावर एकाहून एक सरस आणि सुरस लेखकु असताना अस्मादिकांची विशेष दखल घ्यावी असे नाही. तरीही अस्मादिक कुठे होते, आणि सध्या काय करतायंत, हे सांगण्याचा हा आगाऊ प्रयत्न. गेले काही दिवस खाजवायला फुरसत नाहीये. मिपावर तर फिरकलो नव्हतोच, पण ब्लाॅगलाही गंज चढलाय. गुंतलोय एका वेगळ्या माध्यमात. टीव्ही सिरियलच्या लिखाणात.

चित्रपट ओळख - द लास्ट सामुराई

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 11/01/2012 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
इशारा : या लेखात चित्रपटाच्या शेवटाबद्दल माहिती कळू शकते. *** They say Japan was made by a sword. They say the old gods dipped a coral blade into the ocean and when they pulled it out, four perfect drops fell back into the sea. And those drops became the islands of Japan.

खादाड कंपू-२०१२

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 10/01/2012 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
या वेळी कट्टा जाहिर धागा काढुन ठरलेला असल्यामुळे,इतर अनेक मि.पा.करांप्रमाणे कट्ट्याविषयीची कल्पनाचित्र(जागा आधीच माहित असल्यमुळे ;-) ) आंम्ही मनात तयार केलेली होती.परंतू प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचल्यावर मात्र,हाटीलच्या भायेर(च)-''बनीयन ट्री''खाली(आमच्या आधी)जमलेली मेंबरं पाहुन आमी जरा शंकाकुल झालो होतो,म्हटलं...आधी आलेल्या बनीयन लेंगा प्रस्तावानुसार शेजारच्या गाडीत ती व्यवस्था केलेली आहे कि काय..?आणी नंतर सगळी मेंबरं.सॉरी सॉरी सभासद(हां आता कंसं सभ्य वाटलं बरं..!)जमल्यावर प्रत्येकाचं माप-काढुन त्या प्रमाणे ड्रेपरी वाटप वगैरे ठरलय की काय..?पण हाटीलच्या दरवाज्याजवळ गाडी(सॉरी टू व्हिलर ;-) )लावल्य

नृपशंभू- छत्रपती संभाजी !

लेखक मालोजीराव यांनी मंगळवार, 10/01/2012 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
छत्रपती संभाजी राजांच्या आयुष्यातील अनेक पैलूंपैकी एक म्हणजे त्यांच्यात दडलेला 'साहित्यिक' , त्यांच्या परमप्रतापी कारकीर्दीमुळे असेल,त्यांच्या छत्रपती असण्यानी असेल किंवा इतिहासकार,नाटककारांनी त्यांच्यावर जी गरळ ओकली त्यामुळे असेल... त्यांच्यातला साहित्यिक फारसा लोकांपुढे आला नाही. ८-१० लाखांच्या मोगली सैन्याशी लढा देणाऱ्या या छत्रपतीने 'बुधभूषण' हा संस्कृत तर सातसतक,नखसिख आणि नायिकाभेद हे ब्रज भाषेतील ग्रंथ लिहिले. यापैकी बुधभूषण हा राजनीतीपर ग्रंथ आहे, यामध्ये राज्य

सेवाभावातील मानसिकता

लेखक हरिकथा यांनी मंगळवार, 10/01/2012 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रकूटाच्या कारवी मठाचे महंत श्रीजगदेवदासजी मोठे सन्तसेवी म्हणून प्रसिद्ध होते. ते खूपच वैभवसंपन्न असल्यामुळे आपल्या जवळील वित्ताचा विनियोग अधिकाधिक साधुसेवेमध्ये कसा होईल याचाच विचार करायचे आणि तसेच आचरण ठेवायचे. दिवस असो का रात्र, त्यांच्या मठातील साधुसेवेमध्ये कधीच खंड पडला नाही. एक दिवस काही तीर्थयात्री आणि साधु फिरत फिरत वृंदावनातून चित्रकूटला आले. त्या सर्वांची महंतजींच्या मठामध्ये चांगली सोय झाली. प्रसादाचं भोजन आणि निवासाच्या व्यवस्थेमुळे त्या सर्वांनी महंतजींना अनेक धन्यवाद दिले. त्यांच्यातले वरिष्ठ साधुबाबा म्हणाले, "महंतजी, तुमच्यामुळे आमची इथे फार उत्तम सोय झाली.

तू आठवत राहतेस...!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 10/01/2012 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
कसे भास होत असतात मला कसे कसे सुंगध पसरतात मनात माझ्या तू आठवत राहतेस संध्याकाळी तिन्हीसांजेला, कशी हलके हलके उतरतेस मनात माझ्या ह्या खिन्न वेळी ,कातरवेळी अलगद पावलांनी किती दूर आहेस तू नि मी असा परदेशी फक्त एकटा माझ्या खिडकीतून बघत बसतो हे खिन्न आभाळ नि घराकडे परतणारी पाखरे तुझ्या आठवणीने किती काहूर उठतात मनात माझ्या नि किती व्याकुळ होऊन जाते मन माझे गच्च कल्लोळ नुसता मी गुदमरून जातो तुझ्या आठवणीत मग कधीतरी अचानक नेटवर बोलताना दिसू लागतो मला देवघरातील दिवा नि तुझ्या चेहऱ्यावरचा प्रसन्न भाव किती सहजपणे सहन करीत असतेस तुझे एकटेपण . मुलाना सांभाळीत हे सगळे आठवून हलकेच कल्लोळ कमी होऊ लागत
काव्यरस