Skip to main content

प्रीत दे ना मजला ...

लेखक ajay wankhede यांनी मंगळवार, 10/01/2012 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
मंद वारा रात्र चांदनी धुंद मी मधुमती का देतोस रे वेदना प्रीत दे ना मजला || स्वप्न तुझेच सजविले स्वप्नातच रंगविले तुजला स्वप्नातच मी रमले स्वप्न वेडी वृषला का देतोस रे वेदना प्रीत दे ना मजला ||१|| प्रीत तुझी हवी हवीशी रोज मला वाटते दिस न रात तुझी संगती होय मला भासते प्रीतीच्या भावना शरदा त ही चिंब चिंब भिजल्या का देतोस रे वेदना प्रीत दे ना मजला ||२|| मन धुंद धुंद वाट पाहते तुझी कशी राहू सांग मी एकटी ? हे विरहाच्या वाळूतील मृगजळा का देतोस रे वेदना प्रीत दे ना मजला ||३|| मंद वारा बोचतो स्पर्श तुझाच हा धगधगले अंतःमन घे जवळ घे मजला रात्र चांदनी मिठीत घेउनी चुकवू नको रे क्षणा का देतोस रे
काव्यरस

पॅनकेक - स्ट्रॉबेरी सिरप

लेखक उदय के'सागर यांनी मंगळवार, 10/01/2012 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दिवसांपासुन पॅनकेक खाण्याची व (त्याहिपेक्षा) बनवण्याची इच्छा होती , शेवटी ह्या विकांताला बनवण्याचा योग आला. साहित्य : (साधारण ५-६ पॅनकेक च्या हिशोबाने) पॅनकेक : १. मैदा - १ वाटी २. गव्हाचे पीठ - १ वाटी ३. ताक - २ वाटी ४. दुध - १ वाटी ५. अंड - १ ६. बटर - ५० ग्रॅम ७. बेकिंग पावडर - २ चमचे ८. बेकिंग सोडा - अर्धा चमचा ९. पीठीसाखर - ३ चमचे १०. मीठ - चवीनुसार ११. फ्रेश-क्रिम - सर्व्हिंगनुसार स्ट्रॉबेरी सिरप : १. स्ट्रॉबेरी - १० २. साखर - ५-७ चमचे ३. पाणी - ३ वाटी कृती : पॅनकेक : १.

THE FATE !!

लेखक सुहास.. यांनी मंगळवार, 10/01/2012 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्व-प्रकाशित तो दिवस तसा सामान्यच होता, अगदी माझ्या बंगलोर वास्तव्यातल्या रोजच्या दिनक्रमासारखा! जवळ-पास सिंगल बॅचलर्स लाईफ!! रूम वर सकाळी सुमारे ११ च्या सुमारास उठायचे, ११. ४५ पर्यंत फ्रेश व्हायचे, काहीतरी पोटात ढकलायला बनवायचे, खायचे आणि निघायचे. जाताना टपरीवर चहा-सिगरेट मारायचा, चालत-चालत ई-सिटीस्थित प्रशस्त इन्फोसिसच्या गेट न. सहा पर्यंत पोहोचायचे, आपल्या क्यूबिकल ला एकदा पोचलो की काम, सोशल नेटवर्किंग च्या साईट्स आणि ब्रेक घेत आपली ८ वाजेपर्यंतची शिफ्ट संपवायची.

तुम गगन के चंद्रमा हो

लेखक स्मिता. यांनी सोमवार, 09/01/2012 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस झाले या गोष्टीला. तेव्हा ज्या घरात मी रहायचे त्या घराला एक छानशी गच्ची होती. रात्री जेवण झाल्यावर त्या गच्चीत अगदी मस्त शतपावली करता यायची. ती सवयच झाली होती. आणि मग बरेचदा त्यावेळी काही काही विचार चालू असायचे मनात. असंच एकदा शतपावली चालू होती. आजूबाजूला अगदी शांत वातावरण होतं. कानात हेडफोनवर मंद आवाजात रेडिओ चालू होता. रात्रीची विविध भारतीवर सुंदर सुंदर जुनी हिंदी गाणी लागतात. मुख्य म्हणजे त्यात आता एफेम वाहिन्यांवर चालते तशी बकबक नसते. निवेदक कामापुरतंच बोलतात. गाण्यांचा मूड जात नाही त्यामुळं.

बासरीविषयी थोडेसे !

लेखक चैतन्य दीक्षित यांनी सोमवार, 09/01/2012 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
बासरी हे भगवान् श्रीकृष्णाच्या हातात शोभलेलं एक लोभस वाद्य. कान्ह्याच्या बासरीचे सूर उमटावेत आणि गोपिकांनीच काय गाई-वासरांनीही देहभान विसरून जावं इतकी ह्या बासरीची किमया. अर्थात् ती बासरीची किमया की कान्ह्याची हे सांगणं अवघडच. ह्या बासरीविषयी एक कथा वाचण्यात आली ती अशी की कृष्णाचं बासरीवरच सर्वात अधिक प्रेम आहे हे जाणून गोपिका बासरीवर चिडून असायच्या. एकदा त्यांनी बासरीला विचारलंच की आम्ही असताना कान्ह्याचं तुझ्यावर इतकं प्रेम कसं? तर बासरीने उत्तर दिलं की मला एकूण सात छिद्रं आहेत. त्यातल्या ६ छिद्रांतून षड्रिपू केव्हाच बाहेर गेलेले आहेत.

मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१२

लेखक सुशान्त यांनी सोमवार, 09/01/2012 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने 'मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१२' आयोजित करण्यात येत आहे. त्यासंबंधीचे संस्थेचे निवेदन इथे दिले आहे. -------------------------------------------------------------- संगणकावर मराठीतून माहितीचा देवाणघेवाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनातील विविध विभागांकडे असणारी माहिती लोकांना सहज उपलब्ध व्हावी ह्यासाठी प्रयत्न होत आहेत. कला, क्रीडा, संस्कृती, विज्ञान, अर्थव्यवहार अशा विविध विषयांवरील माहिती आज मराठीतून संगणकावर उपलब्ध होऊ लागली आहे.