मन मौज कराया उडते....
नमस्कार,
मी इथे नवीन आहे. हि माझी पहिलीच कविता आहे.
तुम्हाला आवडेल अशी आशा करतो...
मन मौज कराया उडते....
भिरभिरणारा वारा होते...
खळखळणारा ओढा होते..
दाटल्या मेघामधुनी...
झरझरणार्या धारा होते...
मन मौज कराया उडते..
किलकिलणारी पहाट होते..
सळसळणारे पाते होते...
घनदाट वनराई मधले..
किलबिलणारे पक्षी होते...
मन मौज कराया उडते..
मिसळपाव