Skip to main content

" एका ठाणेकराच्या बुद्धीच ( ? ) सुट्लेल ग्रहण " ;)

लेखक पियुशा यांनी शुक्रवार, 13/01/2012 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
( सदर धागा हा केवळ निखळ मनोरंजनासाठी आहे :) ) चू.भू.दे.घे. " एका ठाणेकराच्या बुद्धीच ( ? ) सुट्लेल ग्रहण " ;) *************** मला आता घरच्यांपासून काहीही लपवायचं नव्हत. नाश्त्याला बसलेले असताना.. मी सर्व हकीकत सांगून टाकली उर्मिलाचा चेहरा. भयाने पांढरा फाटक पडलेला .. आई पण हादरलेली.. बाबांच्या कपाळावर आठ्या पडलेल्या.. मग कोणीच काही बोललं नाही. मग बाबाच म्हणाले, काल भाटे सांगत होते.. त्यांनी लिफ्ट उघडली तेंव्हा तू खाली पडलेला होतास.. आणि तुझ्या अंगावर ३, ४ काळी मांजर होती.. ती नंतर जिन्यातून पळून गेली . मी मान खाली घालून बसून राहिलो..

एका कल्पनेतलं जग

लेखक प्रास यांनी शुक्रवार, 13/01/2012 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी रात्री संगीतावर आधारलेला तो चित्रपट अगदी रंगतदार अवस्थेत होता. शाळेच्या आणि शालेय शिक्षणाच्या पार्श्वभूमीवरची कथा असलेल्या चित्रपटातल्या त्या भागात एकूणच बदललेला काळ आणि त्या काळातली शालेय मुलांची बदललेली अभिरूची दाखवणारा प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून सरकत होता. नेहमीप्रमाणेच मी चित्रपटाचा अगदी गंभीरपणे आस्वाद घेत होतो आणि तेवढ्यात बदललेली सांगीतिक अभिरूची दर्शवताना पार्श्वभूमीवर एक गाणं वाजू लागलं आणि ते ऐकताच काळजात कुठेतरी लक्कन् हललं. तो प्रसंग आणि चित्रपट पुढे सरकला पण ते गाणं काही माझा पिच्छा सोडत नव्हतं.

(खा घास हा)

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 13/01/2012 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबन हा प्रकार तसा मला जास्त आवडत नाहि .. एक चुकुन विडंबन केले होते 'खेळ मांडला' याचे.. पण करुन विडंबन नसतेच असे ऐकुन घेवुन विडंबनातील काही कळत नाही म्हनुन गप्प होतो.. आज काल श्री वल्ली महाराज चिंचवडकर यांच्या प्रेरणेने आम्हास मनाच्या विरुद्ध जावुन विडंबन करायचे सुचले आहे, त्यात सकाळीच स्पा ने एक मोरपिस फिरवल्याने लिहायला घेतले .. आता दारु न पाजता विडंबन कसे करायचे हे मात्र वल्ली महाराजांकडुन शिकले नसल्याने आम्ही भातच खायला घातला आहे.. गोड माणुन घ्या ...
काव्यरस

नायज्जा जेलोफ राईस विथ मॅश्ड पोटॅटो, बेक्ड वेज अ‍ॅण्ड रोज वाइन

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 13/01/2012 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
पल्या गणपाने नुकतीच नायज्जा जेलोफ राईस / पेप्पे चिकन नावाची एक पाककृती प्रकाशित केली होती. त्यातल्या पेप्पे चिकनला फाटा देउन त्या रेसिपीला थोडा ट्वीस्ट देउन एक 'ईंप्रोवाइज्ड' डीश मागच्या रविवारी ट्राय केली. ती डीश एकदम हीट झाली होती म्हणून शेयर करतो आहे.

त्रिशंकू

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 13/01/2012 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
त्रिशंकू ! “जाऊ का नको, जाऊ का नको” असे मनाशी म्हणत मी अखेरीस डॉ. प्रणव यांच्या दवाखान्यात पोहोचलो. आता यांचे आडनाव काय आणि त्यांची कन्सल्टींग रूम कूठे आहे हे विचारू नका. कारण जास्त माहिती द्यायची नाही हे आम्हाला शिकवलेले असते. अर्थात यात विशेष काही नाही पण सवयीचा परिणाम. डॉ. प्रणव यांच्याकडे यायचे कारण म्हणजे आम्ही आता चांगले मित्र झालो होतो. आमची क्लबमधे झालेली पहिली भेट मला अजूनही चांगली आठवते. त्यानंतर आठवड्यातून एकदा तरी भेटल्याशिवाय आम्हाला चैन पडायची नाही. खरे तर आमच्या दोघांचेही व्यवसाय पूर्णपणे भिन्न.

(भा SSSSS सं भा SSSSS सं)

लेखक स्पा यांनी शुक्रवार, 13/01/2012 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: सो...हम....सो...हम!! उपाकर मित्रमंडळींनो, `खाईन मांडे ` नावाने उसळपाव वर वावरणारा त्रस्त समंध गेले काही दिवस, काही महिने कुठे गायब झाला, असा प्रश्न आपणांस पडला असणे साहजिक आहे. अर्थात, हा आपला माझा समज. `तुझ्यावाचून उपा ओस पडलंय रे बाबा, कधी परततोयंस` अशी आर्त साद मला कुणी खव किंवा टपाल हापिसातून घातलेली नाही. उपावर एकाहून एक सरस आणि सुरस संपादक असताना अस्मादिकांची विशेष दखल घ्यावी असे नाही. तरीही अस्मादिक कुठे होते, आणि सध्या काय करतायंत, हे सांगण्याचा हा आगाऊ प्रयत्न. गेले काही दिवस खाजवायला फुरसत नाहीये.

पाकिस्तानी चित्रपट भाग १: खुदा के लिये

लेखक अन्या दातार यांनी गुरुवार, 12/01/2012 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
दहशतवादाचे परिणाम काय फक्त आपल्यालाच सोसावे लागतात का? दहशतवादाची जिथून सुरुवात होते त्यांना कधीच काही चटके बसत नसतील का? सगळेच पाकिस्तानी दहशतवादी असतात का? अर्थात चित्रपटाची ओळख करून देण्याची हि काही पद्धत नसावी. पण हे विचार मनात आल्याशिवाय हा चित्रपट बघू नये. माध्यमांना जर समाजमनाचा आरसा समजत असाल तर नक्कीच या प्रश्नांचा उलगडा होण्यासाठी तरी का होईना हा चित्रपट बघावा. चित्र पहिले: शिकागो, एका हॉस्पिटलमध्ये एक बाई येऊन हुंदके देत रडतेय. चित्र दुसरे: लाहोर, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी एक रॉक कॉन्सर्टची तयारी चालू आहे. अचानक एक जमाव लाठ्या घेऊन येतो, तिथल्या जागेची नासधूस करतो.

मुळ्याच्या पानांची भाजी

लेखक किचेन यांनी गुरुवार, 12/01/2012 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ्याच्या पानांकडे भाजी म्हणून मी कधीच बघितलं नव्हत.काळ भाजीवाला मुळ्याच्या पानांच्या गड्ड्या स्वस्तात विकत होता.मी सहज विचारला ह्याचा काय करतात तो बोलला लसून मिरची टाकून मस्त भाजी होते.मी सहज म्हणून एक गद्दी घेतली आणि भाजी केली.पाककृती खाली देतीये.तुम्हीही करून पहा. साहित्य: १ मुळ्याची गड्डी, ५-६ मिरच्या, एक लहान चमचा आल्याचा कीस,१ चमचा जिरे, ५-६ लसणाच्या पाकळ्या,१ चमचा हळद,१ चमचा हिंग, चवीनुसार मीठ. पाककृती.: १.