पर्यावरणपूरक गणेशोत्सव
मध्यंतरी पुण्यातील शाश्वत फाउंडेशनच्या सौ. प्रज्ञा ठाकूर यांच्याशी संवाद झाला त्यातून त्यांच्या "पर्यावरणपूरक गणपती मुर्तीच्या" प्रकल्पाबाबत समजले. त्यांन या संदर्भात मिपाकरांसाठी माहिती देण्याची विनंती केली होती. ती खाली त्यांच्याच शब्दात देत आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव
गणाधीश जो ईश सर्व गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा
सकळ गुणांचा अधिपती असलेल्या गणेशाच्या पूजनाने सर्व कार्याचा शुभारंभ आपण करीत असतो. गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा सातवाहन व चालुक्य च्या कालखंडा पासून सुरु असल्याचे दाखले आढळतात. ब्रिटीशांच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या जनतेला एकत्र आणण्यासाठी १८९३ मध्ये लो. टिळकांनी हा गणेशोत्सव सार्वजनिक केला. आता हा गणेशोत्सव फक्त धार्मिक न राहता सामाजिक व राजकीय चळवळ बनला आहे.
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपतीची स्थापना करण्याची प्रथा आहे. नदीकाठच्या मातीपासून मूर्ती बनवून तिला हळद व पानाफुलांपासूनचे रंग वापरून रंगविली जात असे. तसेच त्यांचे विसर्जन देखील नदीत करत असत. गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धती काळानुसार बदलत गेल्या. गणेशच्या मूर्ती, सजावटीसाठी लागणारे साहित्य, गणेश विसर्जन मिरवणूक व विसर्जनाच्या पद्धती या सर्व गोष्टींवर आधुनिकतेचा प्रभाव दिसून येतो
घरोघरी बसविल्या जाणार्या मूर्तींमध्ये लक्षणीय वाढ होत असून हजारोच्या संख्येने सार्वजनिक गणेश मूर्ती व देखावे उभे राहत आहेत. उत्सवादरम्यान होणाऱ्या जल, ध्वनी, वायू प्रदूषण या बरोबरच विजेचा अतिरिक्त वापर यामुळे मुळ हेतू पासून गणेशोत्सव दुरावत चालला आहे.
गणेशमूर्ती मजबूत, जास्तीत जास्त उंच व वजनाला हलकी करण्यासाठी शाडू माती ऐवजी प्लास्टर ऑफ प्यारीस चा वापर होवू लागला. या मूर्ती पाण्यात लवकर विरघळत तर नाहीतच पण त्यांचे विघटन देखील लवकर होत नाही यामुळे अशा मूर्तींचे खंडित भाग विसर्जनानंतर उघड्यावर येतात. हे प्लास्टर ऑफ प्यारीस पुनर्वापरास हि उपयोगी नसते. गणेशमूर्ती सजावटीसाठी जे मखर वापरले जाते त्यात प्लास्टिक व थर्माकोल चा वापर मोठ्या प्रमाणात आढळतो, हे घटक विघटनशील नसल्याने पर्यावरणास हानिकारक ठरतात, आणखी महत्वाचा मुद्दा येतो तो निर्माल्य विसर्जनाचा. प्लास्टिक च्या पिशव्यांमधून हे निर्माल्य नदी, तलावात विसर्जित केले जाते. अशा पद्धतीने नैसर्गिक जाल्स्त्रोतांना हानी पोहोचते व सृष्टीचे जीवनचक्र बिघडते.
वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरण यामुळे प्रदूषणाच्या समस्या भेडसावत आहेतच त्यात सण व उत्सव यांचे मागल्या व पावित्र्य राखावयाचे असेल तर पर्यायांचा विचार करण्याची वेळ आली आहे.
गेली काही वर्षे बर्याच संस्था याविषयी जनजागरण करीत आहेत, लोकांमध्ये याविषयी जागृतीही दिसून येते, त्याचेच प्रत्यंतर म्हणजे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती व सजावट साहित्य यांची वाढती मागणी. हि मागणी व उपलब्धता यांची योग्य सांगड घालणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन शाश्वत इको सोल्युशन फौंडेशन, नवसंवेदनाव ई गणेश या संस्थांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या सहाय्याने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती व सजावट याविषयी समाजातील विविध घटकांमध्ये यावर्षीपासून नवी मुंबई येथून प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले. या प्रशिक्षण वर्गातशाडू माती व कागदाचा लगदा तसेच कागद आणि कापड यापासून मखर व निर्माल्या टाकण्यासाठी कागदाची पिशवी बनविण्याचे संबंधी प्रशिक्षण दिले विकलांग विद्यार्थी, महिला बचत गटांतील सदस्य महिला, शाळांतील विद्यार्थी, जेल मधील कैदी अशा १०० जणांना प्रशिक्षण दिले.
गणेशोत्सवाचा आनंद निरामय व चांगल्या पद्धतीने चिरकाल घ्यावयाचा असेल तर गणेशोत्सवात होणारा अतिरिक्त वीज वापर, कचर्याची योग्य विल्हेवाट, सजावट साहित्य, ध्वनी प्रदूषणाचे निकष याचे भान ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी गरज आहे ती मानसिकतेत बदल करण्याची. या गणेशोत्सवात याची मुहूर्तमेढ रोवली आहे. आपले लाडके बाप्पा देखील सुखावतील अशी खात्री आहे !
सौ प्रज्ञा ठाकूर
शाश्वत इको सोल्युशन फौंडेशन
वाचने
9914
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
चांगला उपक्रम
+१
चांगल आहे...असच चालू राहू
छान प्रयत्न आहे
स्तुत्य उपक्रम
कल्पक आणि उपयोगी
In reply to कल्पक आणि उपयोगी by धनंजय
पुन्हा
In reply to पुन्हा by प्रदीप
जमायला पाहिजे, असे वाटते
In reply to जमायला पाहिजे, असे वाटते by धनंजय
+१
In reply to पुन्हा by प्रदीप
उत्तर
उत्तम माहिती
उपक्रम चांगलाच आहे.
याबाबत
In reply to याबाबत by सहज
असं काही होणार नाही.
In reply to असं काही होणार नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नक्की माहीत नाही पण...
In reply to नक्की माहीत नाही पण... by विकास
मनोभावे
उत्तम कल्पना
मी काय म्हणतो, सार्वजनिक
धन्यवाद - काही छायाचित्रे
अभिनंदन, शुभेच्छा
खूपच चांगली माहिती! मुलांनी
वेगळा/उलटा विचार
In reply to वेगळा/उलटा विचार by नितिन थत्ते
वाहत्या पाण्यात विसर्जन करतेवेळी
In reply to वाहत्या पाण्यात विसर्जन करतेवेळी by ऋषिकेश
हौदात विसर्जन करण्याबाबत
In reply to हौदात विसर्जन करण्याबाबत by नितिन थत्ते
अजुन एक धक्का :: १. दहा