Skip to main content

कोडॅक मोमेंट्स

लेखक रामदास यांनी सोमवार, 06/02/2012 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
मी बँकेच्या रांगेत उभा होतो . काम संपतच आलं होतं आणि त्यानी मला बघीतलं . हा माझा मित्र कमोडीटी ब्रोकर आहे . सोनं चांदी तांबं -जस्तं सारख्या कमोडीटीत व्यवहार करतो. हात धरून जवळजवळ ओढतच त्यानी मला बाहेर काढलं . "बघीतलंस ?" माझा चेहेरा प्रश्नार्थक . "पुन्हा एकदा माझा अंदाज बरोब्बर निघाला. चांदीचा भाव पडला." "जवळजवळ सत्तर हजाराच्या आसपास होती ना रे चांदी ?" मी काहीतरी बोलायचं म्हणून बोललो "तो इतिहास झाला रे. ओसामा मेला त्याच्या दुसर्‍या दिवशी त्रेप्पन्न हजारावर आला होता भाव.

सुपरबॉल स्पेशल - ओनियन रिंग्ज

लेखक स्वाती२ यांनी सोमवार, 06/02/2012 05:40 या दिवशी प्रकाशित केले.
यावर्षी सुपरबॉल इंडियानापोलिसच्या लुकस ऑइल स्टेडियममधे खेळला जातोय. त्यामूळे पार्टीचा उत्साह वेगळाच! यावर्षी पार्टीसाठी - ओवन बेक्ड ओनियन रिंग्ज! साहित्यः १/२ कप लो फॅट दही १/२ कप ब्रेड क्रंब्ज १/२ कप कॉर्न मिल २ यलो ओनियन ( स्वीट ओनियन मिळाल्यास उत्तम) १/४ चमचा मीठ १/२ चमचा तिखट थोडे तेल तेलाचा स्प्रे कृती : ओवन ४०० फॅ. ला तापत ठेवावा. कुकी ट्रेला फॉइल लावून घ्यावी.फॉइलला तेलाचा हात लावावा. कांद्याचे साल काढून त्याच्या साधारण १/४ इंचाच्या चकत्या कापाव्यात. या चकत्या हाताने वेगळ्या करुन त्यातील मोठ्या आणि मध्यम आकाराच्या रिंग्ज घ्याव्यात.

वाजवा रे वाजवा, कलमाडी पुण्यात आला!

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 05/02/2012 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.esakal.com/eSakal/20120204/5163698292591074375.htm वाजवा रे वाजवा, आपला कलमाडी सुटला आणि पुण्यात पोचला. पुणेकरांच्या अकलेचे दिवाळे आणि अब्रूचे खोबरे करुन झाले. आता मनपाच्या विलेक्शनमधे पैसे खायाला आला रे आला. चला चला चला सुरेशभाईंच्या पाया पडू आणि तिकिटाची भीक मागू ! चला चला बिगी बिगी. लाजू नगा. मागं र्हावू नगा. जेलमदून भाईर आल्यावर समदे साफच असत्यात.

"श्रद्धा"

लेखक बज्जु यांनी रविवार, 05/02/2012 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
श्रद्धा "श्रद्धा" या एका शब्दाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा सगळ्यात आधी विचार येतो तो म्हणजे हि एक देव, संत, महात्मे झालच तर अगदी अलीकडल्या काळातले अमुक अमुक बाबा, तमुक तमुक माता यांच्याशी जवळीक साधणारी काहीतरी भानगड असावी असा. पण मग श्रद्धा म्हणजे नेमक काय असाव ? श्रद्धा म्हणजे विश्वास का ? श्रद्धा म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी किवा वस्तूविषयी वाटणारी प्रेम किवा आपुलकीची भावना का? का भीती? का श्रद्धा म्हणजे देव या संकल्पनेविषयी वाटणारा आदर ?

झपुर्झाच.......दुसरं काय ?

लेखक इरसाल यांनी शनिवार, 04/02/2012 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
जर का लता मंगेशकरांनी तुमच्यासाठी गाणे म्हटले, सचिनने शंभर तुम्हाला अर्पण केले, ए आर रहमानने तुम्ही गायलेल्या गाण्याला चाल आणि संगीत दिले तर तुमची अवस्था काय होईल.:D असाच काहीसा ढिंच्याक अनुभव मला आला.;) मला खात्री आहे काही ओळीनंतरच मिपाकर ओळखतील कि कोणाबद्दल बोलतोय ते.पण तरीही मी सांगणार नाही फक्त शेवटी एक संकेत (मराठीत-हिंट) देणार. ;) नवीन कंपनीत लागून २/३ च महिने झाले होते.सुरुवातीला कॉर्पोरेट ऑफिस सुप्रसिद्ध रॅडिसन हॉटेल मध्ये होते.पण कारखान्याचे बांधकाम चालू झाल्याने मुख्यप्रबंधकाने (मराठीत- एमडी) सगळ्या विभागप्रमुखांना कारखान्यावर पिटाळले( थोडक्यात हाकलले ४५ कि.मी. दूर):(.

धन्य ते आजकालचे निब॑ध आणि त्या॑चे विषय !

लेखक सस्नेह यांनी शनिवार, 04/02/2012 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
धन्य ते आजकालचे निब॑ध आणि त्या॑चे विषय ! आमच्य लहानपणी निब॑धलेखन आणि एकूणच (मराठी) भाषा या विषयाला मोठेच महत्व आणि प्रतिष्ठा होती. सायन्स, गणित, इ. शत्रुराष्ट्रा॑ना जरी घाबरुन असले तरी फारशा सन्माननीय नजरेने कुणी पहात नसे. काव्य, निब॑ध, वक्त्रुत्व अशा क्षेत्रातील पटुत्व सिद्ध करण्यार्या विद्यार्थ्या॑ना मोठ्या आदराने पाहिले जात असे. दुर्दैवाने आम्ही मात्र त्याकाळी सायन्स आणि गणितातच केवळ मार्क पाडू शकत होतो. भाषा, इतिहास, भूगोल, इ. विषयात आम्ही प्रथमपासूनच अ॑मळ कच्चे ! म्हणुन आता जरा आम्ही सुधरायच॑ मनावर घेतलय. ( तसही, अभिया॑त्रिकीचा प्रवेश व पदवी इ.