Skip to main content

सरस्वती.. एक लोकमाता

लेखक शरद यांनी मंगळवार, 07/02/2012 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
सरस्वती ... एक लोकमाता सरस्वती लुप्त होऊन हजारो वर्षे झाली. हिमालयात उगम पावून हरियाना, पंजाब, राजस्थान,गुजराथ मधून वहात जाऊन कच्छच्या रणात समुद्राला मिळणारी सरस्वती, ऋग्वेदात जिचे रम्य वर्णन केले आहे, एके काळी जिचे पात्र ८-१० किलोमीटर रुन्द होते, जिच्या काठावर भारतातील सर्वात पुरातन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत , अशी सरस्वती आज मात्र तुम्हाला पहावयासही मिळत नाही. तिच्या पाण्यावर आज तुम्ही शेती करू शकत नाही. तिच्या लेकरांची तहानभूक ती आज भागवू शकत नाही. भूगर्भातील उत्पातामुळे तिचे पात्र आटले पण तिचे प्रेम मात्र आजही आटलेले नाही. आजही ती भारताला सुजलाम्-सुफलाम् करावयास आसुसलेली आहे.

भेट

लेखक प्रेरणा यांनी मंगळवार, 07/02/2012 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
जागे होण्याआधी गोकुळ शांत अजुन पानांची सळसळ चंद्र केशरी अजुनी आभाळी पहाटवारा वाहे अवखळ अजुन जुईची बंद पाकळी नसे अजुनही किलबिल जागी खट्याळ वारा घाली फुंकर होई हलके राधा जागी दाट सावळ्या केसांना मग हळुच सारुन मागे काना अर्ध्या मिटल्या लोचनात त्या पहिली आठवण होते कान्हा अधीर्‍या ओल्या अंधारातुन भारावून ती चाले वाट तिलाच ऐकू येतो आणिक यमुनेचा तो हिरवा काठ दिसते तेथे बाहू पसरुन तीच आकॄती ओळखीचा बांधा घुमु लागता त्याचा पावा राधा नुरते आता राधा

बिघडला स्वर्ग हा अपार.

लेखक रेवती यांनी मंगळवार, 07/02/2012 02:58 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ: क्षीरसागरातले विष्णूंचे होम थिएटर. प्रचंड आरडाओअरडा ऐकू येतोय. बावन्न इंची एच डी एल ई डीवर सुपरबॉलचा धुमाकूळ सुरु आहे. नारदमुनी: नारायण , नारायण. विष्णू: अरे! मुनीवर कधी आलात? येताना नेहमीसारखा खडावांचा आवाज नाही आला? नारद (उसासा टाकून खांद्यावरची गिटार खाली ठेवत): कुठल्या खडावा आणि कसले काय्.....सध्यातरी स्पोर्टशूजच वापरावे लागतायत. बघताय ना, वजन किती वाढलय आणि पायही सुजलेत. सो, खडावाज आर आउट ऑफ क्वश्चन! विष्णू: अरेच्च्या! हा बदल बरा चालला तुम्हाला? नारद: खडावांसारखी खडखड मीही केली पण डॉ. धन्वंतरी ओरडले.

हास्यास्पद पाट्या...अमेरिकेतील...

लेखक वाटाड्या... यांनी मंगळवार, 07/02/2012 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो...मिपाकरहो... अमेरिकेत गावोगाव हिंडताना विविध प्रकारच्या पाट्या(हो इथेसुद्धा) पहायला मिळाल्या... त्यातल्याच काही पाट्या तुमच्या करता...

किल्ले रामशेज

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 06/02/2012 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
किल्ले रामशेज- नाशिकपासून अवघ्या १५ किमीवर. दिसायला तसा छोटेखानी, अगदी एखाद्या टेकाडाएव्हढाच. पण त्याला संरक्षण आहे ते चहुबाजुंनी असलेल्या कातळकड्याचे. याच भक्कम नैसर्गिक तटबंदीच्या जोरावर आणि यावरच्या मूठभर मावळ्यांच्या मनगटाच्या ताकदीवर हा किल्ला मोगलांच्या राक्षसी सैन्यबळापुढे तब्बल साडेपाच वर्षे झुंजला. रामशेजला जाण्यासाठी आम्ही नाशिकवरून सकाळीटे साडेसहालाच निघालो, नाशिक-वणी रस्त्यावर असलेल्या किल्ल्याच्या पायथ्याच्या आशेवाडीत जेमतेम अर्ध्या तासातच पोहोचलो. रामशेजची कातळटोपी लक्ष्य वेधून घेत होती. गावातूनच किल्ल्याची चढाई चालू होते.

राजगड संवर्धन मोहीम २०१२

लेखक धमाल मुलगा यांनी सोमवार, 06/02/2012 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
रामराम मंडळी, राजगड! श्री शिवछत्रपतिंची प्रथम राजधानी! नावाप्रमाणेच असलेल्या ह्या राजगडाची आज अवस्था मोठी वाईट आहे. पडझड, रानगवत, पर्यटकांनी केलेला कचरा अशा निरनिराळ्या अडचणींनी हा गड आपलं मुळचं वैभव हरवून बसला आहे. गडाची देखभाल तसेच दुरुस्ती करुन हा सांस्कृतिक ठेवा जतन करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. काही दुर्गप्रेमी..खरेतर गड-किल्लेवेड्या मित्रांनी एकत्र येऊन अशाच निरनिराळ्या गड-किल्ल्यांची, लेण्यांची गुहांची दुरवस्था न पहावून ह्या ऐतिहासिक ठेव्यांचे संगोपनाचे शक्य तितके वैयक्तिक प्रयत्न सुरु केले.

Veg Lasagna /Lasagne

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 06/02/2012 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः २-३ वाट्या मिक्स भाज्या (बेबीकॉर्न , रंगीत भोपळी मिरच्या, गाजर ) भरताचे वांगे (अर्धेच ) बारीक चिरुन मीठाच्या पाण्यात घालून ठेवणे २ कांदे बारीक चिरुन मुठभर पालकाची पाने २-३ लसुण पाकळ्या बारीक चिरून बेसील (इटालियन तुळस ;) ) तयार Lasagna /Lasagne सॉस (मी डॉलमियो/ दॉलमियो सॉस वापरला आहे) किसलेले मोझ्झरेला चीज किसलेले पारमेझान चीज २ टीस्पून पांढरी किंवा काळीमिरपूड १-२ टीस्पून ड्राईड हर्ब्स ऑलिव्ह ऑईल तयार Lasagna / Lasagne शीट्स (पास्ता शीट्स) मीठ चवीनुसार