Skip to main content

समारोप - गुरूपदेश

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 23/09/2011 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो तुमच्या भरघोस आणि उत्स्फूर्त प्रतिसादातून बरेच काही शिकायला मिळाले. पण एक खुलासा आवश्यक आहे. माझ्या गुरूला मी अंतर्बाह्य ठाऊक असल्याने माझे भले कशात आहे ते त्यांना चांगले ठाऊक होते. त्यांनी दिलेला सल्ला पूर्णपणे वैयक्तिक होता. तो माझ्याकरता म्हणजे विशिष्ट व्यक्तीकरता होता. मला माझा विकास साधायचा असेल तर मी ज्या वातावरणात असायला हवे तेथे मी नव्हतो, एव्हढेच त्यांनी लक्षात आणून दिले. त्यामुळे आयायटियन्स बुद्धीमान की आयायटी बाहेरचे बुद्धीमान हा मुद्दा गैरलागू आहे. ज्योतिषाशी लावलेला संबंध तर अत्यंत हास्यास्पद आहे. (अवांतर - आयायटीत ज्योतिषाबद्दल आस्था बाळगणारी अनेक मंडळी मला भेटली आहेत. मी आयायटीमध्ये जाईन हे भाकित आयायटीत व्हिजिटींग प्रोफ़ेसर म्हणुन येणा-या - पण ज्योतिषाचा अभ्यास दांडगा असलेल्या -एका सद्गृहस्थानी केले होते.). ता.क. - येणारी अमावस्या आणि पौर्णिमा भयानक त्रासदायक आहेत. त्याचा १ला दणका बसलाच आहे. यावेळेला सविस्तर लेख लिहायचा मात्र कंटाळा आला आहे.
लेखनविषय:

वाचने 4721
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

त्यामुळे आयायटियन्स बुद्धीमान की आयायटी बाहेरचे बुद्धीमान हा मुद्दा गैरलागू आहे. ज्योतिषाशी लावलेला संबंध तर अत्यंत हास्यास्पद आहे. वगैरे सगळे मुद्दे मान्य.. ज्योतिषाशी संबंध असल्याची शंका मीच बोलून दाखवली. तीही माझी वैयक्तिक शंकाच बरं का.. माफीसह विचारतो.. तुम्ही वर जे लिहिलंय ते सर्व मान्य केलं तर मग तुमच्या मूळ पोस्टचा उद्देश काय होता? तुम्ही आयआयटियन आहात हे कळण्याखेरीज? की नुसतेच एफ वाय आय? धन्यवाद..

In reply to by गवि

लोक प्रत्येक घटनेकडे स्वतंत्र पणे बघतात. तेव्हा या घटने कडे कसे बघतात ते जाणून घ्यायची उत्सूकता ( किंवा किडा) होती, एव्ह्ढेच.

>>त्यांनी दिलेला सल्ला पूर्णपणे वैयक्तिक होता. तो माझ्याकरता म्हणजे विशिष्ट व्यक्तीकरता होता. मग इथली ब्याण्डविड्थ का बरे जाळली?

In reply to by नितिन थत्ते

इथली ब्याण्डविड्थ हे एक धगधगते अग्निहोत्र आहे... त्यात धाग्यांच्या समिधा पडायलाच हव्यात... :) आणि हो ब्याण्डविड्थ मी जाळली की प्रतिसादानी जाळली?

In reply to by युयुत्सु

आणि हो ब्याण्डविड्थ मी जाळली की प्रतिसादानी जाळली? काय बोललात काका... जेबात्त फुल पाठींबा आपला.. इथल्या पब्लिक ला अक्कलच नाही.. उगाच तुमच्या टुकार धाग्यांवर प्रतिसाद देतात.. आणि सगळ खापर तुमच्यावर फोडतात आकाशातला बाप त्यांना सुबुद्धी देवो

त्यांनी दिलेला सल्ला पूर्णपणे वैयक्तिक होता. तो माझ्याकरता म्हणजे विशिष्ट व्यक्तीकरता होता. मला माझा विकास साधायचा असेल तर मी ज्या वातावरणात असायला हवे तेथे मी नव्हतो, एव्हढेच त्यांनी लक्षात आणून दिले. मग त्यांनी किति आयाआयटीयन्स आहेत ही चौकशी का केली?

उत्तम लेख. युयुत्सु, आपल्या लिखाणावरुन आपण आय्.आय.टी.तून १९८८ साली MSc. Physics केले आहे असे मला वाटते. (ज्योतिषी)चिरोटा

त्यांनी दिलेला सल्ला पूर्णपणे वैयक्तिक होता. तो माझ्याकरता म्हणजे विशिष्ट व्यक्तीकरता होता.
मग त्या सल्ल्याचे गावजेवण घालायची काय गरज होती ? युयुत्सु बर्‍याचदा तुम्ही देखील 'डायरीयाचे' अर्थात 'दिसामाजी काहीही खरडतच जावे' चे शिकार झाल्यासारखे वाटता. हा जो वर तुम्ही खुलासा दिला आहे, तो तुम्ही स्वतःच्याच मुळ धाग्यात देखील देऊ शकला असतात. त्यासाठी नविन धागा काढून पुन्हा गदारोळ उडवायची गरजच काय ? स्पष्ट विचारायचे तर स्वतःच्य हातानीच स्वतःचे अपमान करुन घेण्यात काय आनंद मिळतो ? का सतत काही ना काही वादंग निर्माण करुन, बेताल वक्तव्ये करुन चर्चेत राहण्याचा तुमचा मानस असतो ? तुम्ही स्वतःचे तर नुकसान करत आहातच पण मिपाचे देखील नुकसान करत आहात हे ध्यानात घ्या.

In reply to by परिकथेतील राजकुमार

"युयुत्सु बर्‍याचदा तुम्ही देखील 'डायरीयाचे' अर्थात 'दिसामाजी काहीही खरडतच जावे' चे शिकार झाल्यासारखे वाटता."
माझ्या लिखाणाची वारंवारता तपासलीत तर आपल्याला आलेली शंका निराधार आहे असे वाटते.
"स्पष्ट विचारायचे तर स्वतःच्य हातानीच स्वतःचे अपमान करुन घेण्यात काय आनंद मिळतो ?"
मी स्वत:चे अपमान करून घेतो असे मला तरी वाटत नाही. (असे हागल्या-पादल्या अपमान व्हायला लागले तर जगणे मुश्कील कोईल). मी हाताळत असलेले बरेचसे विषय "पोलिटीकली इनकरेक्ट" या लेबल खाली येतात. त्यामुळे वादंग निर्माण होतात. मी मात्र या सर्वांकडे बुद्धाच्या करूणामय दृष्टीनेच बघतो. याहुन अधिक काय सांगू?

In reply to by युयुत्सु

असे हागल्या-पादल्या अपमान व्हायला लागले तर जगणे मुश्कील कोईल जनरली अश्या लोकांना निर्ल्लज्जम सदासुखी म्हणतात. तुम्ही त्या प्रकारातले वाटत नाही. पराशी सहमत आहे. असले धागे टाकणे कृपया बंद करा नाहितर तुमच्या पुरुषमुक्तीच्या धाग्यांनादेखील कोणी गंभीरपणे घेणार नाही. अवांतरः आत्तातारी पुरुषमुक्तीच्या धाग्यांना कोण गंभीरपणे घेतो असा अवघड प्रश्न विचारु नका.

काहीजणाना .. वर लाथा खाण्यात प्रचंड आनंद मिळतो. कुठली वाक्ये अशा लाथा तयार करेल हे पण आधीच माहीत असते. आणि तशी वाक्ये मुद्दाम टाकली जातात. वरील पोस्ट मधे तशी व्यवस्था केली गेली आहे. अशा मॅनिया ला परा तु काहीही करु शकत नाही. युयु लगे रहो.

मी मानतो कि गुरु ची मदत अपल्याला लगते वा आपण कितीही मोठ्ठे झालो तरी गुरु अपल्याला मार्गदर्शन करु शकतात वा सल्ले देउ शकतात. पण एका आयआयटी च्या मुलाला ह्या असल्या साध्या गोष्टी स्वतःच कळु नये (गुरु ने सांगायची वाट पाहावी) हे म्हणजे आयआयटीचं दुर्दैव म्हणावं. (एक तर कुठ्ल्याही संस्थेमधे किती आयआयटीअन आहेत ह्यावरुन त्याची गुणवत्ता ठरवुच नये. तुमच्या गुरुंना हे महत्त्वाचं नाही वाटलं का कि तुम्हि नेमकं काय काम करता? तुम्हाला त्यात समाधान आहे का? पुढे त्यात तुम्ही वेगळं काय करु शकता? आणि आहे त्याच संस्थेला तुम्हि कसं वर नेऊ शकता, तुमच्या सारख्या आयआयटी तज्ञांकडुनच तर प्रगतीच्या अपेक्षा ठेवतील लोक(संस्था). पण तुमचे गुरु म्हणतात कम्पनीच बद्ला? कठीण आहे.)

In reply to by उदय के'सागर

कंपनीतच राहून कंपनी बदलणार्‍यांना leader म्हणतात. बाकी (आम्ही) सगळे ९ ते ६.

अजुन एक गूरु शिष्य संवाद, चेपु वरुन साभार गुरुजी : गंपू, अरे सारखा इंटरनेटवर असतोस........ फेसबूक ,ऑकुट, युटयूब , टिवटर यापलीकडेही काही जग आहे....... गंपू : काय सांगता? मला पाठवा ना लिंक !!

गेल्या काही वर्षांत आयआयटीतून बाहेर पडणा-या विद्यार्थ्यांचा दर्जा घसरत असून वरच्या २० टक्क्यांतील विद्यार्थी वगळता बाकीच्या ८० टक्क्यांचा दर्जा सुमार असतो, असे मत ‘ इन्फोसिस ’ चे संस्थापक नारायणमूर्ती यांनी व्यक्त केलं http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10228616.cms यातच सर्व काही आले .. बाकी चालु द्या