भारतातील वाढत्या आजारपणास भारतीय अन्नपुर्णा/ पदार्थ कारणीभुत आहेत काय?
भारतीय उपखंडात निरनिराळ्या आजारपणांचे प्रमाण वाढते आहे. त्यात मधुमेह, हॄदयरोग, स्थुलपणा आदी गृहीत धरा. वेगवेगळ्या संस्था याबाबत वेळोवेळी आकडेवारी प्रसूत करत असतात. जरी ती आकडेवारी आहे तितकी खरी मानली नाही तरीही वरील आजारांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहेच. हे आजारपण वाढण्यामागे अनेक कारणे असतीलही - जसे बदलती जीवनशैली, आर्थीक स्थिती उंचावणे, अन्नघटकाचे पोषणमुल्ये, सुपोषण आदी. परंतु या सर्व कारणांमध्ये भारतीय अन्नाची चव व ते अन्न रूचीदार बनवणार्या गृहीणी किती कारणीभुत आहेत?
या गृहीतकामागे बर्याच घरांमध्ये भारतीय अन्नपुर्णा घरी अन्न बनवतात असे गृहीत धरलेले आहे. भारतीय पदार्थ चविष्ट असण्यामागे या अन्नपुर्णांचा हात स्पष्टपणे असतो. सढळ हाताने चमचमीत अन्नपदार्थ, मिठाया बनवण्यात सर्व जगात पहिल्या क्रमांकासाठी भारतीय उपखंडातल्या स्त्रीयांचा समावेश करावा लागेल. आपल्या उपखंडात मसाल्याचे पदार्थांचा मुबलक वापर केला जातो. हे फार पुर्वीपासून चालत आलेले आहे. त्याकाळातही असल्या आजारांचे प्रमाण येथल्या उपखंडात जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात याबाबतीत त्याकाळी शास्त्रशुद्ध अभ्यास नसल्यामुळे ती आकडेवारी मिळणार नाही.
भारतीय नारी ही घरातल्या व्यक्तीच्या खाण्याच्या आवडीनिवडीबाबत फारच जागरूक असते. पतीला ही भाजी आवडत नाही - नको डब्यात द्यायला, मुलाला डब्यात निरनिराळे पदार्थ देणे जेणेकरून तो शाळेत डबा संपवेल, असे तीचे चालू असते. अर्थात या सर्वांत त्या स्त्रीचे कुटूंबाप्रती असलेले प्रेमच निर्देशीत होत असते. असल्या कुटूंबवस्तल वृत्तीचा मला आदर आहेच, त्यात वाद नाही. एखादा पदार्थ जर चांगला झाला अन तो आग्रहपुर्वक वाढण्यात आला तर त्यास सहसा नकार न देता दोन घास जास्तीचे खाल्ले जातात हा अनुभव आपणास एकदातरी आलेला असेलच.
आणखी एक उपमुद्दा येथे येवू शकतो तो म्हणजे आपल्याकडचे सण-समारंभ आणि उत्सव. यांचेही प्रमाण इतर समाजात व भारतीय समाजात व्यस्त आहे. महिन्याकाठी एकतरी सण समारंभ आपल्या संस्कृतीत करण्याचे प्रमाण आहे. त्यावेळी काहीतरी गोडधोड, चमचमीत पदार्थ घरी केले जातात.
भारतीय समाजात वाढणारे आजारपणाची सामाजीक व्याप्तीला नवीन दिशा मिळण्याच्या हेतूने वरील सर्व मुद्दे लक्षात घेवून चर्चा अपेक्षीत आहे. (या चर्चेत अमेरीकन्स पण जाड होतायेत, पिझ्झा बर्गर यांची भारतातही चंगळ होते आहे हे टाळावे. संशोधन करणार्या बर्याचशा संस्था ह्या अमेरीकन (अभारतीय) असल्याने बहूतेक शारीरीक स्केल्स ह्या अमेरीकन/ ब्रिटीश लोकांनाच गृहीत धरून असतात. उदा. BMI, उंची/ वजन/ रक्तदाब यांचा रेशो आदी.
अवांतरः (पाभेचा फुटकळ धागा म्हणून दुर्लक्ष अपेक्षीत नाही.)
वाचने
9288
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
अनेक गोष्टी
चांगला चर्चाप्रस्ताव..
In reply to अनेक गोष्टी by प्रियाली
+१
In reply to चांगला चर्चाप्रस्ताव.. by नरेश_
सदरहू धागा मला संपादन करता
In reply to +१ by रामपुरी
नाही हो...
In reply to चांगला चर्चाप्रस्ताव.. by नरेश_
वेगवेगळ्या संस्था याबाबत
नेमकी हीच गोष्ट आम्ही हेरली
In reply to वेगवेगळ्या संस्था याबाबत by नगरीनिरंजन
दुर्लक्ष नाही
१९८० च्या सुमारास या आलेखात
In reply to दुर्लक्ष नाही by क्रेमर
१९८० च्या सुमारास या आलेखात
In reply to १९८० च्या सुमारास या आलेखात by ३_१४ विक्षिप्त अदिती
माहीत नाही
In reply to १९८० च्या सुमारास या आलेखात by ३_१४ विक्षिप्त अदिती
चीन आणि भारताची तुलना करायची
In reply to माहीत नाही by क्रेमर
तुलना नाही
In reply to चीन आणि भारताची तुलना करायची by ३_१४ विक्षिप्त अदिती
सुगरणींचा ह्यात हात असलाच तर
काय खरं आणि काय खोटं कोणास
अजून एक कारण
अगदी अगदी. पूर्वीच्या
In reply to अजून एक कारण by नितिन थत्ते
हा हा हा ...
In reply to अगदी अगदी. पूर्वीच्या by गवि
+१
In reply to अजून एक कारण by नितिन थत्ते
अजून कोणाच्या लक्षात न आलेले कारण
In reply to +१ by राजेश घासकडवी
कै तरीच
In reply to अजून कोणाच्या लक्षात न आलेले कारण by नितिन थत्ते
कसचं कसचं !!!!
In reply to कै तरीच by प्रियाली
लालबहादुर शास्त्री
In reply to कसचं कसचं !!!! by नितिन थत्ते
गंभीर बाब...
चुकुन तिनदा प्रतिसाद पडला.
माझ्या मते आजारांच्या वाढत्या
**
आयुष्यात वाढलेला ताण-तणाव हे
हो मदनबाण तेही एक कारण आहेच.
पण मी काय म्हणतो,
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है |
In reply to पण मी काय म्हणतो, by परिकथेतील राजकुमार
.
काय पाभे. कशाला उगाच सुगरण
काय पाभे!
हल्ली
चर्चेला एक वेगळाच आयाम मिळाला
सुगरण
In reply to चर्चेला एक वेगळाच आयाम मिळाला by पाषाणभेद
वाटत नाही. उलट भारतीय आहार हा
मागणी तसा पुरवठा!
मानसिक व्यायाम
अन्नपूर्णा की भूत
In reply to मानसिक व्यायाम by विसुनाना
दोन्ही एकच...
In reply to अन्नपूर्णा की भूत by प्रियाली
अर्रर्र!
In reply to दोन्ही एकच... by विसुनाना
उत्तम चर्चा, धन्यवाद
होय, खरे आहे. आमची पाने
In reply to उत्तम चर्चा, धन्यवाद by चित्रा
हो हो..
In reply to होय, खरे आहे. आमची पाने by रेवती
काय रे ठोंब्या,
In reply to हो हो.. by प्रभो
चांगली चर्चा...
अभय बंग यांच्या 'माझा