Skip to main content

मेमरी कार्ड वापरता ? .......हे माहित आहे का?

लेखक कोल्हापुरवाले यांनी बुधवार, 15/02/2012 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या पैकी असे बरेच लोक आहेत जे मेमोरी कार्ड वापरतात. आज काल बर्याच प्रमाणात ओंनलाइन शॉपिंग केलं जात. बऱ्याच वेब साईट्स वर कमी किमती मध्ये अशी उत्पादने विकली जातात. जेव्हा आपण कार्ड विकत घेत असतो तेव्हा फक्त "किमंत" हा निकष लावला जातो. पण बर्याच लोकांना हे कदाचित माहित नसाव कि जे कार्ड आपण वापरतो त्याचे बरेच प्रकार असतात. मेमरी कार्ड चे वेगवेगळे क्लास असतात तुम्हाला असा जाणवलं आहे का तुम्ही घेतलेलं नाव कोर कार्ड खूप स्लो आहे.? फोटो काढला तरी सेव व्हायला खूप वेळ लागतो? या सगळ्याला १ गोष्ट जबाबदार असते ती म्हणजे मेमोरी कार्ड चा क्लास. आता म्हणाल त्याचा आणखी कसला क्लास ?

ब्युटी अँड द बीस्ट

लेखक शुचि यांनी बुधवार, 15/02/2012 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
कालचा व्हॅलेन्टाइन डे , " ब्युटी अँड द बीस्ट" हा कार्टून सिनेमांमधील माझा सर्वात लाडका सिनेमा पाहून मी साजरा केला. लहानपणी बाबांबरोबर हा सिनेमा पाहील्याचे आठवते. तेव्हा खूप म्हणजे खूपच आवडला होता. स्नो व्हाईट , लेडी अँड द ट्रँप वगैरे सिनेमे तर या सिनेमापुढे कुछ भी नही असे तेव्हा वाटले होते. याचे मुख्य कारण स्नोव्हाईट इतकी गोरीपान, फुलासारखी छान आहे की तिच्याशी स्वतःला "आयडेंटीफाय" करताच येत नाही. याउलट ब्युटी अतिशय "प्लेन" आणि पुस्तकी कीडा आहे. लहानपणी मी सहज ब्युटीशी स्वतःला आयडेंटीफाय करू शकले असावे. ते असो.

प्रतापगडाला कसे जावे !

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 14/02/2012 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
काही माहिती हवी आहे प्रतापगडाबाबत गडाची उंची किती आहे. खालून वर चढत जाणे शक्य आहे का ! की फारच उंच आहे नाइट स्टे करण्यास काही सोय आहे का? वरती पिण्याचे पाणी मिळेल का जेवण वर मिळू शकेल का अथवा आपले आपण बनवण्यास परवानगी असेल का अन्य कोणती काळजी घ्यावी

मॅंगो चीजकेक ...खास प्रेमदिनानिम्मीत्त

लेखक सानिकास्वप्निल यांनी मंगळवार, 14/02/2012 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रेमदिन आणी एकही पाकृ नाही???? असे आत्ताच आपल्या एका मिपाकर मैत्रीणीने विचारले...असं कसं होईल...आजचा दिवस खास आहे म्हणून खास पाकृ देत आहे :) तुम्ही नक्की करुन पहा आणी आपल्या प्रियजनांना खाऊ घाला :) अतिशय सोप्पी आणी नो बेक...

गुलाब फक्त देणंच...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 14/02/2012 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
जी जी त्याला भेटली तिला तिला तो गुलाब देत गेला. ती काही का म्हणेना पण त्याचं गुलाब देणं काही चुकलं नाही. साध्यासुध्या दिसणाऱ्या मुलींनाही त्याने आखीव रेखीव अन् आकर्षक गुलाबपुष्प सादर केले होते. त्यावेळी त्या सामान्य मुलीच्या डोळ्यांतील आश्चर्ययुक्त भाव वाचणे त्याला भारी आवडायचे. तिच्या मनी ध्यानी नसतांना मिळालेली ही सुंदर भेट तिला स्मितहास्य करायला भाग पाडायची. तसं तिच्या मनात हे असं काही घडेल याची पुसटशी शंकाही हजर नसायची. अशा अचानक वेळी त्यानं गुलाब दिला की नकळत किंवा स्त्रीसुलभ पुष्पप्रेमापोटी तिचा हात तो गुलाब घेण्यास आपोआप उद्युक्त व्हायचा.

ईश्वर , विज्ञान आणि श्रद्धा..

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 14/02/2012 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल ईश्वरावर श्रद्धा असणे हे मागासलेपणाचे लक्षण समजले जाते. बर्याच वेळा ती अ॑धश्रद्धाच ठरवली जाते. ईश्वराच्या अस्तित्वाचा कि॑वा नस्तित्वाचा स्वतः अनुभव घेतल्याशिवाय असे विधान करणे चुकीचे ठरेल. एखाद्या वैज्ञानिकाने जाहीर केले की गॉड पार्टिकल्स आहेत, मग आम्ही लगेच विश्वास ठेवतो. पण युगायुगापासून वेदा॑नी सा॑गितलेल्या प्रक्रुतीच्या तीन मूलभूत तत्वा॑वर् (..सत्व, रज, तम..) विश्वास ठेवणे ही आम्ही अ॑धश्रद्धा मानतो. विश्वाचे कार्य विज्ञान सा॑गेल ते आम्ही खरे मानतो. पण कारणस्वरूपी परमात्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा लागतो..तोही इ॑द्रियानी गोचर होणाराच.

म्हणून..

लेखक गवि यांनी मंगळवार, 14/02/2012 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
काही नाही रे भेंचोत.. आमचं नुसतं फ्रेंडलीये.. असं सगळ्या गँगला म्हणत म्हणत आणि आतल्या आत मोहरत जे काही केलं तेव्हाही व्हॅलेंटाईन डे येऊन गेले असणार बरेच.. लक्षात आलं नाही.. आमचं कॅलेंडर वेगळंच होतं.. म्हणून.. तेव्हाही सुरुवात झाली होती.. ग्रीटिंग कार्डांची चार्पाच दुकानं फोडायला.. पण फरक पडला नाही.. कारण ग्रीटिंग घ्यायचं नव्हतंच.. ग्रीटिंगबिटिंग कशाला.. भावनांचं प्रदर्शन नुसतं.. म्हणून.. चॉकलेटं.. हार्टशेपची नव्हती.. तिला दिलं होतं मी.. रावळगाव मला वाटतं.. अन तिनंही मला.. कॉफी बाईट.. रॅपर पडून आहे कपाटात खास कप्प्यात.. ठेवून उपयोग नसला तरी फेकायचं कुठे..