Skip to main content

सुदर्शन पटनायक

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी शुक्रवार, 17/02/2012 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
वाळू! केवळ या एका शब्दात आयुष्यभराचा आठव साठवता येऊ शकतो. शंख शिंपले गोळा करत आणि खोपे बनवत वाळूच्या ढिगा-यावर घालवलेलं लहानपण; समुद्रकिना-यावर तीच्याबरोबर तासनतास बसुन बांधलेलं वाळूचं घर; वाळूत उभं राहून ते घर डोळ्यात साठवत असतांना अचानक आलेल्या लाटेबरोबर त्याचं पायाखालच्या वाळूबरोबर वाहून जाणं आणि त्यानंतर झालेला हिरमोड लपवत पुन्हा नव्याने घर बांधायला घेणं! कन्याकुमारीच्या वाळवंटात उभं राहून दिसणारं भारतमातेचं तेजोमय रूप; आणि चंद्रभागेच्या वाळवंटात वारक-यांनी धरलेले रिंगण!

कर्नाटक सरकारचा भानामतीचा ‘बुद्धिवादी शोध’ विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मुलन प्रकरण ८. ---

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 17/02/2012 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, विवेक खोतांनी करणी / भानामती असा धागा काढून त्यांना आलेला विलक्षण अनुभव सादर केला. त्यानंतर अनेकांनी आपापल्या अनुभवांची त्यात भर घातली. त्यावर नेहमीप्रमाणे उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. त्यात गविंनी त्यांना सुचवले, “आपण करणी वा भानामती खरी असते असे न बिचकता खणखणीतपणे म्हणा व त्यावर चर्चा करायला टाका”. आत्मशून्यांनी म्हटले, “भानामती /करणीचा तर स्वतःला मला अनुभव नाही पण लोकांचे किस्से जबरदस्त बुचकळ्यात पाडतात”.

मनोरंजक घोषणा / भाषणे

लेखक राजघराणं यांनी शुक्रवार, 17/02/2012 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
महापालिका निवडणुकीत भरपूर मनोरंजन झाले. ठाकरेंची कोंबडी पवारांना भावली पण त्यांच्या कोंबड्यात दम नसल्याने, कोंबडीने अंड घातलच नाही ! राज उद्धव पाउल फुडे मागे जायचे खेळ खेळत होते. बाबा म्हणाले ठाकरेंचे महत्व ही निवडणुक संपवणार. काही मनोरंजक उखाळ्या पाखाळ्यांचा संग्रह करूया इथे काय बघतोस रागाने फाडुन खाल्ल ना वाघाने..." बघतोयस का रागान इंजिन धावतय वेगान तुम्ही अ‍ॅड करा अजून -

चिवचिवाट

लेखक पारा यांनी शुक्रवार, 17/02/2012 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
हा धागा म्हणजे संपादकांना एक प्रश्न म्हणा किंवा एक नवीन feature म्हणा. माझ्या मनात असे होते कि मिसळपावचं एक twitter खाते बनवता येईल काय ? नवीन कुठलेही लेखन झाले की आपसूक एक tweet केला जाईल ज्यात त्या लेखाचा दुवा असेल. कशी वाटते कल्पना? ता. क. : असे आधीच काही असेल किंवा असा काही विचार आधी झाला असेल तर माफ करा अ.(अधिक) ता. क. : कुठल्या विषयांतर्गत हे मांडावे न कळल्यामुळे बरेच विषय निवडले आहेत

पेचप्रसंग

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 17/02/2012 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या सर्वोच्च नेत्या आपण इटलीहून आयात केल्या. तर नुकतेच आलेल्या बातमीनुसार ह्या थोरल्या महाराणीसरकारच्या म्हाईरच्या काही लोकांनी भार्ताच्या काही मच्छीमार बांधवांचा गोळ्या घालून बळी घेतला. कारण की ते चाच्यांसारखे दिसत होते (म्हंजी चाचा न्हेरू वा थत्ते चाचा नसून सोमालियातील चाचे). http://timesofindia.indiatimes.com/india/Killing-of-fishermen-Italian-n… महाराणीसाहेबांनी वज्रचुडेमुंडित असल्यापासून ती.गं.भा.

क्रोशे - कॉलर

लेखक जयवी यांनी गुरुवार, 16/02/2012 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
ही सोलोमन्स नॉट किंवा रुद्र गाठ ने तयार केलेली कॉलर आणि त्यावर गुलाबाचं फुल Crochet Collar" width="480" height="360" alt="" />

" ....आभास.... "

लेखक जेनी... यांनी गुरुवार, 16/02/2012 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
हळुवार ... हळुवार येशील आयुष्यात ...अस कधी वाटलच नव्हत .. मनाच्याही मनातल सांगशील असही कधी वाटल नव्हत .. स्पर्शाची भाषा ..सहवासाच जग ..मला कधी अनुभवायला मिळेल असही कधी वाटल नव्हत ... पण तू आलास आयुष्यात असाच अगदी हळुवार ..पावलांचा आवाजही न करता ..... बर्याच दा मागे वळून पाहिलं ..पण तू कधी दिसायचास ..तर कधी ओझरता तुझा भास व्हायचा .. मला कळायचच नाही ..मला नक्की कशाचा भास होतोय ..तुझा कि तुझ्या श्वासांचा .. सतत चाहूल लागायची कि चालताना बोलताना .तू माझ्या जवळ आहेस .. तुझ्या पावलांवर माझ पावूल पडतंय ..तुझ्या चेहेर्यावर माझी सावली पडतेय ..तुझ्या पापण्यात माझी आठवण साठ्तेय .... पण खरच तुझा म

कवितेचा कीड़ा

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 16/02/2012 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेचा कीड़ा जेंव्हा डोक्यात शिरतो करितो यमकांची जुळवा-जुळवी ताबा तोंडाचा घेतो फिरतो सैर-भैर तो. कानात बोळे घालूनी भयक्रांत बायको वावरते घरी. पोरे ही म्हणती पपा होतो अभ्यासाचा हर्जा. हातात चोपड़ी पाहुनी मित्रही पळती दूर किती पाहुण्याची लाट आटली निस्तब्ध शांती घरी पसरली. आता रात्रीच्या एकांती बैसुनी माझी मीच ऐकतो कविता. आप्त ही म्हणती 'वैनी' गेले हो पार कामातुनी आता. दाखवाहो 'ह्याना' एकदा नेवून वेड्यांच्या इस्पिताळी. वाया गेला एक 'माणूस' लागून कवितेच्या नादी.

करणी / भानामती खरे कि खोटे

लेखक विवेकखोत यांनी गुरुवार, 16/02/2012 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी मि. पा वर करणी भानामती हे खरे कि खोटे ह्या वर बराच गोंधळ उडाला होता, डोळ्यामध्ये खडे घालणारी मुलगी, आणि अंधश्रद्धा निर्मुलन वाले ह्याच्या मध्ये बरीच खडाजंगी चालु होती. ह्या सर्व प्रकारामध्ये मि माझा एक - दोन अनुभव ऐकवू इच्छितो. मी साधारणतः ५-६ मध्ये होतो. त्यावेळी मी माझ्या मावशी कडे शिकायला होतो. त्यावेळेस माझ्या मावशीचे मिस्टर अचानक आजारी पडले. हा हा म्हणता आजार बळावत गेला आणि पाहता पाहता ते अंथरुणाला खीळले, हा डॉक्टर तो वैद्य सर्व उपाय करून झाले.

जिलेबी ....

लेखक पियुशा यांनी गुरुवार, 16/02/2012 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
जिलेबी..... चला मि.पा.