Skip to main content

एक हिंस्र कविता (?)... (१८+ only)

लेखक अस्वस्थामा यांनी शुक्रवार, 16/03/2012 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
हाणा रे हाणा , या विडंबकांना.. हे चावताती, हळव्या कवींना.. टांगून उलटे, माळावरी अन.. नवकवितांची धुरी द्या हो त्यांना.. जशी कोवळ्या कवितांची, पिसे हे उपटती.. यांच्या बोडक्याचे, केस केस उपटा.. तरीही जर उरले, अतृप्त अस्वस्थ आत्मे, हृद्य गद्य ललितात यांना बुडवून टाका.. (अपूर्ण आणि विस्तारासाठी सर्वाना खुले आवाहन... आणि ह. घ्या. हे सांगणे न लगे.. )

सच्याचे शंभर.........

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शुक्रवार, 16/03/2012 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
आशिया चषकातंर्गत बांग्लादेशविरुद्ध सामन्यात सचिन तेंडुलकर ९७ धावांवर खेळतोय. सचिन महाशतक पूर्ण करेल, असे वाटते. १०० झाले तर धागा ठेवतो. नै तर... सचिन तेंडुलकरने आज वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर भारतीय क्रिकेट प्रेमींना महाशतकाची भेट दिली. अनेकांचा लाडका सच्या महाशतक कधी करतो इथपासून तर सच्यानं आता रिटायर व्हायला हवं अशी कुजबुज करणार्‍यांना आपल्या लौकिकाला (?) साजेशी खेळी करत गेल्या काही दिवसापासून फॉर्ममधे नसलेल्या सच्यानं आज जगभरातल्या क्रिकेट रसिकांना आज महाशतकी खेळी करुन एक आनंदाची मेजवानी दिली. सच्याचे मनःपूर्वक अभिनंदन.

खेळ नियतींचा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 16/03/2012 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
उडाली पाखरे परदेशी ,मोकळा चौसोपी वाडा. पोपडे पडे ओसरीस ,नाही अंगणी शेणसडा.. परसदारी तो औदुंबर, असे शांतपणे उभा. ना त्यास प्रदक्षिणा, ना कुणी राखे निगा. कोनाड्यातील आरसा ,उडाला त्याचा हि पारा भीतीवरील कुंकु खुणा, मिरवी सौभाग्याचा तोरा अडगळीतली रेशमी वसने, सांगे शृंगाराच्या कथा कोप~यातली उभी काठी, रडे वार्धक्याच्या व्यथा. कोप~यातल्या खाटेवर, श्वास मंदसा घुमे कुणाचा? ना हाती जीवनमरण ,भोग भोगणे खेळ नियतींचा

माझी चित्तरकथा

लेखक मृत्युन्जय यांनी शुक्रवार, 16/03/2012 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
माझे आणि चित्रकलेचे नाते डॅरील कलीनन आणी शेन वॉर्नचे नाते जसे होते अगदी तसेच होते. कलीनन शेन वॉर्नला प्रचंड घाबरायचा. त्याच्या हातभर वळणार्‍या चेंडुला जास्त घाबरायचा की तोंडातुन हातभर बाहेर येउन चालणार्‍या जीभेला जास्त घाबरायचा ते नाही माहिती. पण त्याला म्हणे स्वप्नात सुद्धा शेन वॉर्न दिसायचा. त्याने त्यासाठी खास मानसोपचार घेतले. दुर्दैवाने ही गोष्ट वॉर्नीला कळाली. झाले. पुढच्या वेळेस मैदानात गाठ पडताच वॉर्नने त्याला टोमणा मारलाच "कली बाळा घाबरु नकोस. पाहिजे असल्यास तु माझ्या बेडवर झोपु शकतोस." शेन वॉर्न ने त्याचे आयुष्यभर भांडवल केले आणि जमेल तेव्हा कलीननला टोमणे मारले.

सेवा - एक आंदोलन

लेखक विश्वास कल्याणकर यांनी शुक्रवार, 16/03/2012 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
समाज सेवेशी माझा सर्वप्रथम परिचय इशान्य भारतात झाला तो २००८ मध्ये.. तेथे, गेल्या ६० वर्षापासुन सेवा भारती, विद्या भारती, कल्याणाश्रम, विवेकानंद केन्द्र, रामकृष्ण मिशन या संस्थांद्वारे होत असलेले कार्य बघुन मी खुपच प्रभावित झालो. आपला देखील यात खारीचा वाटा असावा या हेतुने मग मी होइल तसे तिकडे जात राहीलो अर्थात ते देखील निवृत्तीनंतर. नोकरीत असतांना कामातुन वर मान करायला देखील उसंत नव्ह्ती. गोहाटी ला ,समाज सेवे चे कार्य कसे सुरु करावे यावर सेवा विभागाने काढलेली एक छोटी पुस्तिका माझ्या वाचनात आली त्यातील काही माहिती मी आपणासोबत शेअर करीत आहे.

कोस्टर्स

लेखक जयवी यांनी शुक्रवार, 16/03/2012 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या क्रोशेचा वळवळणारा किडा बघून मैत्रिणीने तिच्याकडला पांढरा दोरा दिला. त्याचे बनवलेले हे कोस्टर्स :) DSC00538" alt="" />

ती वेळ निराळी होती . . . ..

लेखक अरूण म्हात्रे यांनी गुरुवार, 15/03/2012 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
छातीत फुले फुलण्याची वार्‍यावर मन झुलण्याची ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे. डोळ्यात ऋतुंचे पाणी मौनात मिसळले कोणी वाळूत स्तब्ध राहताना लाटेने गहिवरण्याची ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे. तू वळून हसलीस जेव्हा नक्षत्र निथळले तेव्हा मन शहारून मिटण्याची डोळ्यात चंद्र टिपण्याची . . . ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे. ज्या चंद्र कवडशा खाली कुणी साद घातली ओली मग चंद्र वळून जाताना किरणात जळून जाण्याची ती वेळ निराळी होती.... ही वेळ निराळी आहे. पाऊस परतला जेव्हा नभ नदीत हसले तेव्हा कोरड्या मनाने कोणी गावात परत येण्याची ती वेळ निराळी होती....

आमचीही दांडगाई ___दान

लेखक चिंटु यांनी गुरुवार, 15/03/2012 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
आता मगजात, मध्‍ये यावे - कोणे परि नी किती ओकावे चिडौनी सर्वांसी घालावे, मेंटलात हे ||१|| . हे बाळांची सुरसुरी नासो, तया सुन्नमनस्कता वाढो, जालात परस्परे घडो, मैत्र मुला-मुलींचे ||२|| . बुद्धीकुंभ साठले, आओ, जग वाचते लिहा हो, जो जे कुंथील ते भरभरुन येवो, धागियांत ||३|| . अरे हे तर सकळ चांडाळी, इगोनिष्‍ठांची वळवळे अळी, ‍अनिवार ओरडे पांगळी, खेटरें खाता ||४|| . केले मसंस्थलाचे बारव, घेऊनी मराठीचे नाव, ओकीती जे बडबड केवळ, आयुष्‍यांची ||५|| . मेंढरे जी गर्दन घालून, एडके जे शिंगहीन, हे बारमाही सदा धरोन, स्व-चर्चा हेतू ||६|| . स्‍त्रीमुक्ती विदुषी येवो, वाट्टेल तैसे नाचो नवर्‍यांचे पार्श्
काव्यरस

नभांगण...!!

लेखक वेणू यांनी गुरुवार, 15/03/2012 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
सुरावटींनी सजलेल्या, तर कधी उधळल्या गेलेल्या मैफिली.... घमघमलेली सांजरात अन् अर्धोन्मिलीत मोगरा.... 'आठवतंय का ते?'- सालांनंतरच्या भेटीतला, तुझा निरागस प्रश्न तेच, विस्मयी डोळे न् दुमडलेले ओठ! तुला विचारायचेच राहून गेले कधी वाकून पाहिलंस मनात माझ्या...? तू नेहमीच काठाशी वावरणारी..... 'अपनी धुन में मस्त' असं अधोरेखित जगणारी... जितकं तुला ओढू पाहिलं, अडकवु पाहिलं, तितकी निसटत गेलेली... 'बांधील प्रेमाचा व्यापार का?' ह्याच भोवती धुमसणारी समजलो नव्हतो, बंधनात अडकणारी तू नाहीस, जितकं स्वातंत्र्य नात्यात, तितकी माझी होशील ते! उमजताच, आलो हाक मारायला तोवर मनाचं नभांगण रिकामं करून गेलीस.... हाक