मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(( आमची हद्दपारी दिल्ली -चंदिगडला)) जा मना तू दिल्या गावी तू सुखी रहा

जयंत कुलकर्णी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
जा दिल्या घरी तू सुखी रहाच्या चालीवर..... मुळा मुठा या डोळ्यात उभ्या काऽऽऽऽ जा मना जा दिल्या गावी तू सुखी रहा. वटवट ही तुझी आठवता बाळा तरूणपण आले खाता चिकन मसाला आठवले पराठे सारे, गहिवरले आत्मेऽऽऽ कढ कढीचे तुला सांगती जा... दिले दिल्लीला तरी तू सुखी रहा.... दारात उभी राहिली तुझी बुलेट दुचाकी ती. बघ डोळे मित्रांचेऽऽऽ तुझ्याच जाण्यावरती.. पुस रे डोळे या फडक्याने लपव ही गाडी गाडी येथे तू मला ठेऊनी जाऽऽऽऽऽ..... दिले दिल्लीला तरी तू सुखी रहा.... साहेब तू रे आयटी हमालांचा मानाचा हसतील ती पंजाबी, बंगाली जाटेऽऽऽऽऽ. बघू नकोस मागे मागे वेड्या बघ पुढे ऽ नकोस विसरू परी खादाडीला जा...ऽऽऽऽ. मुळा मुठा डोळ्यात उभ्या काऽऽऽऽ जा मना जा दिल्या गावी तू सुखी रहा. दिले दिल्लीला तरी तू सुखी रहा...ऽऽऽऽऽ. जयंत कुलकर्णी....

वाचन 9584 प्रतिक्रिया 0