Skip to main content

मुगाच्या डाळिचा ढोकळा

लेखक नेहरिन यांनी शनिवार, 12/05/2012 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- १वाटी मुगाची डाळ, ५-६ लसणाच्या पाकळ्या, १चमचा खिसलेले आले, ३/४ हिरव्य मिरच्या, १ चमचा मीठ. साखर चवीनुसार,१ लिंबाचा रस , १ चमचा हळद १ वाटी बारिक चिरलेली कोथिंबीर, १ सॅशे इनो. फोडणीसाठी - १ टेबलस्पुन तेल, १चमचा मोहरी, १ चमचा हिंग. कृती :- मुगाची डाळ ४-५ तास भिजत घालावी. नंतर त्यातील पाणि काढुन टाकावे. डाळ, मिरच्या, आलं,लसुण, मीठ, साखर, हळद,लिंबाचारस एकत्र करुन मिक्सरमधुन वाटुन घ्यावे.मिश्रण एका बाउलमधे काढुन घ्यावे.प्रेशर कुकरमधे पाणि घालुन उकळ्ण्यास ठेववे.

सॅलड

लेखक नेहरिन यांनी शनिवार, 12/05/2012 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः - १५/२० सॅलडची पाने , २ मध्यम आकाराचे टोमॅटो, १ मोठा कांदा, १वाटी भाजलेले दाणे , १टीस्पुन मीठ, १ टीस्पुन लाल तिखट ( आवडिनुसार कमीजास्त करावे), साखर चविनुसार, १/२ लिंबाचा रस, फोडणीसाठी ; १ टेबलस्पुन तेल, १टी स्पुन मोहरि , १ टीस्पुन हिंग , १टीस्पुन हळद. कॄती :- सॅलडची पाने स्वछ धुऊन बारिक चिरुन घ्यावित, कांदा, टोमॅटो बारिक चिरुन घ्यावे.

सुप्रभात .. शुभ रजनी ...

लेखक विदेश यांनी शनिवार, 12/05/2012 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रभात .. शुभ रजनी ... कशासाठी दोस्त ? अफजलगुरू कसाब मजेत मस्त आपण महागाईने नेहमीच त्रस्त गृहिणी टंचाईत नित्य चिंताग्रस्त सामान्यांची स्वप्ने धुळीत उध्वस्त नेतेमंडळीचे दौरे कायम जबरदस्त जनतेची कमाई दलालाकडून फस्त सभागृह नेहमी गोंधळातच व्यस्त गुड मॉर्निंग... गुड नाईट... कशासाठी दोस्त ? "
काव्यरस

मेसोअमेरिका - एक दृष्टिक्षेप

लेखक किलमाऊस्की यांनी शनिवार, 12/05/2012 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
मी इतिहासतज्ज्ञ नाही. इतिहास हा माझ्या अभ्यासाचा विषय ही नाही. परंतु इतिहासाची प्रचंड आवड आणि बरीचशी उत्सुकता यातून जे वाचन घडते त्यातील काही माहिती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. या लेखात काही त्रूटी आढळल्यास नजरेस आणून देणे. हा लेख कुठल्याही एका मेसोअमेरीकन समाजाची विस्तृत माहिती नसून मेसोअमेरिकन जगाची छोटीशी तोंडओळख आहे. **************************************************************** स्पॅनिश सेनानायक आर्नान कोर्तेसने मेक्सिकोत आस्तेकांचा पराभव केल्यानंतर सोनं, दुर्मिळ खजिने, पिसांचे सुंदर भरतकाम केलेल्या वस्तू युरोपात पाठवायला सुरवात केली.

तीन गझला

लेखक JAGOMOHANPYARE यांनी शनिवार, 12/05/2012 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
------------१-------------------- बालकाच्या शुष्क गाली तू लळा शोधून ये जन्मता त्या टाकणार्‍या तू खळा शोधून ये जीवनाची द्वाड रेती निसटली हातातुनी सोडुनी गेला तुला त्या तू पळा शोधून ये जीवनाचा अर्थ पाणी सांगती जन सारखे बुडविली नौका तुझी त्या तू जळा शोधून ये कर्म करता कर्म करणे आणि जा विसरूनिया बोलते गीता तरीही तू फळा शोधून ये बंध होते प्रीतिचे अन स्वार्थ नव्हता कोणता आपल्याला जोडणार्‍या तू बळा शोधून ये --------------२------------------------ प्रेम म्हणजे काय मजला सांगते नसणे तुझे जाणवे हर एक श्वासा अंतरी असणे तुझे रातराणीच्या फुलांच्या गंधभरल्या तारका पौर्णिमेच्या चांदव्यासम त्यामधे बसणे
काव्यरस

New York मध्ये संपर्क

लेखक yeda यांनी शुक्रवार, 11/05/2012 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, माझ्या मित्राची पत्नी New York मध्ये येत्या सप्टेंबर महिन्यात ६ महिने फेलोशिप करण्यासाठी पुण्याहून येत आहे. तिची राहण्याची सोय विद्यापीठात होणार आहे. तिला काही मदत लागली तर आपल्यापैकी कोणी New York मध्ये असेल तर उत्तम. मदत म्हणजे, फक्त एखाद्या कुटुंबाचा संपर्क असला तर चांगलं होईल. धन्यवाद. भूषण केरूर (bkerur1 @yahoo.com )

कलाईगनर

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी शुक्रवार, 11/05/2012 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
राजकिय स्थीत्यंतरांचा, किंवा सत्तापालटाचा दांडगा अनुभव असलेलं एकमेव राज्य म्हणजे तामिळनाडू! कधी घवघवीत यशाची शिखरे तर कधी अत्यंत लाजिरवाणे पराभव ही येथील नेत्यांची नियती आहे. दक्षीण किनार्र्यावरच्या या वादळी परिस्थीतीत आपल्या द्रविड मुन्नेत्र कझगम (डिएमके) पक्षाची नाव नेटाने रेटणारे तामीळ राजकारणाचे भिष्म पितामह म्हणजे 'कलाईगनर' मुथुवेल करूणानिधी! डोळ्यावरचा काळा चष्मा, शुभ्र वस्त्रांवर शोभुन दिसणारी पिवळी शाल, आणि कुठल्याही परिस्थीतीत चेहर्र्यावर कायम ठेवलेलं स्मीतहास्य -- एव्हाना ही करूणानिधींची राजकारणातली छवी बनलेली आहे.

गरमागरम चहा

लेखक नाना चेंगट यांनी शुक्रवार, 11/05/2012 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : एक कप एक बशी एक चमचा चांगली गाळणी एक छोटेसे पातेले गॅस शेगडी (शिलींडरसह) लायटर अर्धा कप पाणी एक कप दूध दोन चमचे साखर एक चमचा चहापावडर चिमुटभर चहामसाला किंवा वेलचीपावडर कृती : प्रथम सिलिंडरमधे गॅस असल्याची खात्री करुन शेगडीवर पातेले ठेवावे. पातेल्यात पाणी, दूध, साखर, चहापावडर आणि मसाला किंवा वेलची पावडर टाकून मिश्रण चांगले ढवळावे. लायटरच्या सहाय्याने गॅस पेटवून चांगली उकळी आणावी. अधुन मधून चमच्याने ढवळावे. उकळी आल्यावर गॅस बंद करावा. दोन मिनिटे जमल्यास झाकण टाकून वाट पहावी. आता चहा गाळणीच्या सहाय्याने गाळून कपात घ्यावा.

लेडी ड्रायवर

लेखक पुश्कर यांनी शुक्रवार, 11/05/2012 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज ऑफिस मधून निघताना एक लेडी ड्रायवर कार चालवताना दिसली. तेव्हा मनात विचार आला की लोकं एका स्त्रीला ड्रायवर म्हणून कामाला ठेवू शकतील का ? तेवढी त्यांच्या मनाची तयारी आहे का असा प्रश्न पडला . पण आजचे बदलते जग बघता अजून काही वर्षात हे हि शक्य वाटते. तुम्हाला काय वाटते ? विचार केल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय चित्र उभे राहिले ?