Skip to main content

अळुवडी ( क्रिस्पी -कुरकुरी )

लेखक पियुशा यांनी मंगळवार, 15/05/2012 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
अळूवडी ( क्रिस्पी) साहित्य : १) अळूची पाने ८-१० ( कोवळी अन छोटी असतील तर उत्तम ) २) बेसन पीठ २ वाट्या (मी हिरा बेसनपीठ वापरले आहे चिकट असते रोल करायला सोपे पडते ) ३) हिरव्या मिरच्या ७-८. ४) लसूण पाकळ्या ७-८. ५) जीर / (जिरपूड ) १ छोटा चमचा . ६) गुळ १ छोटा चमचा (किसून) ७) चिंचेचा कोळ १ चमचा . ८) मीठ चवीनुसार . ९ )तळण्यासाठी तेल . १० ) भाजलेली बडीशेप भरड अर्धा चमचा ( आँपशनल). कृती :- अळूची पाने स्वच्छ धुवून - पुसून कोरडी करून घ्या . अळूच्या पानाचा मागल्या साईडला असलेला देठ काप

कौतुक

लेखक Pearl यांनी मंगळवार, 15/05/2012 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
कौतुक ... एकदम जादूई शब्द आहे ना. आणि त्याचा इफेक्ट पण जादूच्या कांडीसारखाच. सगळ्यांनाच आवडतं कौतुक. अगदी लहान मूलापासून ते आजी-आजोबांपर्यंत.. खरचं कोणी प्रशंसेचे दोन शब्द बोलले की कसं छान वाटतं ना, अंगावरून मोरपिस फिरल्यासारख. आणि कौतुक कशाचंही केलं जाऊ शकतं अगदी लहान सहान गोष्टींचंही. ते करण्यासाठीही फार काही मह्त्कष्ट पडतात असंही नाही. दोन चांगले शब्द बोलायला काहीच त्रास नसतो. मनुष्य स्वभावाचीही किती गंमत आहे ना.

चिकन तंदुरी

लेखक सानिकास्वप्निल यांनी मंगळवार, 15/05/2012 07:22 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः ५०० ग्राम चिकन ३-४ टेस्पून दही २-३ लसूण पाकळ्या १ इंच आले २ टेस्पून कोथींबीर २ टेस्पून पुदिन्याची पाने २ टेस्पून तंदुरी मसाला रंगासाठी दीड टेस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर १/२ टीस्पून काळिमिरीपूड १ टेस्पून गरम मसाला मीठ चवीनुसार . पा़कृ: आले, लसूण, कोथींबीर व पुदिना एकत्र वाटुन पेस्ट करुन घेणे. चिकनला दही, तंदुरी मसाला, काश्मिरी लाल मिरची पावडर, काळिमिरीपूड, गरम मसाला, मीठ व हि

स्ट्रॉबेरी फ्रीज कशी करावी? साठवून ठेवावी?

लेखक Pearl यांनी सोमवार, 14/05/2012 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
(How to freeze Strawberry?) थोडे दिवसांपूर्वी स्ट्रॉबेरी पिकिंगला जायचा योग आला. खूप मजा आली. आणि खूप सार्‍या फ्रेश, सुंदर, लालचुटूक स्ट्रॉबेरी घरी आल्या. आल्या आल्या स्ट्रॉबेरीने भरलेली छोटी टोपली फ्रीजमध्ये ठेवली. मग दुसरे दिवशीपासून विचार सुरू झाला की इतक्या सार्‍या स्ट्रॉबेरीजचे करायचे काय? केकमध्ये घालाव्यात की जॅम करावा की शेक करावा की आणखी काय करावे. मग नेटवर जरा शोधाशोध केल्यावर स्ट्रॉबेरी साठवून ठेवायचे मार्ग सापडले. त्यातला सगळ्यात सोपा मार्ग भावला :-D त्यानुसार स्ट्रॉबेरी फ्रीज करायचे ठरवले.मग थोडे R&D करून स्ट्रॉबेरी फ्रीज केल्या. काम फत्ते.

मेसोअमेरिका (२) - ओल्मेक (Mother Culture)

लेखक किलमाऊस्की यांनी सोमवार, 14/05/2012 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
मेसोअमेरिका - एक दृष्टिक्षेप तज्ज्ञांच्या मते, मेसोअमेरिकन प्रांतातील पहीली वसाहत ही बहुदा सैबेरीयापासून स्थलांतरित झालेले भटके लोक. त्यांच्या स्थलांतराचा निश्चित कालावधी जरी माहीत नसला तरी Tlapacoya (North-East Mexico city) येथे सापडलेल्या काही हाडांच्या रेडीयोकार्बन डेटिंगने सिद्ध झाले आहे की आस्तेक वस्ती ज्या भागात होती त्या भागाच्या आसपास सुमारे ख्रि.पू. २१००० वर्षे वस्ती असावी.

|| चिरन्जीवी परशुराम ||

लेखक मृगनयनी यांनी सोमवार, 14/05/2012 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
परशुराम ;- भगवान महाविष्णुचा सहावा अवतार असणार्‍या "परशुरामा"बद्दल काही जातीय कारणास्तव बरीच उलटीसुलटी चर्चा ऐकायला मिळते. परशुरामाबद्दल काही तरी ऐकीव माहितीआधारे बरेच लोक त्याला अविवेकी ठरवतात. परन्तु परशुरामाचे खरे रूप अत्यन्त सच्चे, मातृ-पितृ भक्त असेच आहे. तसेच त्याने कोणावरही कुठलाही अन्याय केलेला नाही...उलट भगवान परशुरामामुळे लोकांचे कल्याणच झाले आहे. यावर प्रकाश टाकणारा हा लेख! - महिष्मती नगरीचा क्षत्रियकुलोत्पन्न राजा क्रतुवीर व राणी राकावती यांना गुरु-दत्तात्रेय कृपेने पुत्रपाप्ती झाली. त्या पुत्राचे नाव- कार्तवीर्यार्जुन.

इतिहास

लेखक नाना चेंगट यांनी सोमवार, 14/05/2012 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
इतिहास म्हणजे असे असे घडले असे सांगणारी कथा. इतिहास आपल्यापर्यंत अनेक मार्गांनी येतो. लहानपणी आजीने, आईने सांगितलेल्या कथा. ज्यात भुते असतात, राक्षस असतात. चेटकीणी असतात. राजकुमारी असते. राजकुमार असतो. शेवटी लग्न होऊन ते सुखी होतात. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र लग्न झाल्यावर कथा अशी सहजासहजी सुखी होत संपत नसते. वाढणारे आयुष्य त्याची जाणीव करुन देते. मग लग्न झाल्यावर पुढे काय झाले हा विचार मनात येत रहातो. कल्पनाशक्ती सुसाट धावत सुटते आणि आपल्या स्वतःच्या, आजुबाजुच्या परिस्थितीशी साधर्म्य असणारी कथा आपलेच मन तयार करुन पुढे असे झाले असावे असा आपल्या मनाचा समज करुन देते.

निवडुंग

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 14/05/2012 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
रुतल्या कोर-कपारी दारी अगणित वांछा संसारी निवडुंग कुंपणी मी तैसा चाकरी करी खडकाळ तिरी निश्चल काटेरी खोड असे माळल्या विशाखा संभारी राखणे देखणे बहुतांचे अंकीत होतसे सहज उरी निरपेक्ष साधना जन्मभरी जड देह उभा; जळ गाभारी अवकाळहि माझा काळ नसे मी चिरंजीव तव दरबारी ...............अज्ञात
काव्यरस