Skip to main content

एक होता रोमेल

लेखक निशदे यांनी मंगळवार, 08/05/2012 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
==================================================================== आपल्यासमोर एक अत्यंत धाडसी आणि बुद्धिमान शत्रू आहे आणि युद्ध बाजूला ठेवून मी म्हणेन की तो एक अत्यंत शूर सेनापतीही आहे. -विन्स्टन चर्चिल (ब्रिटिश पार्लमेंटसमोर) ==================================================================== १९४४ चा ऑक्टोबर थंडीचा विलक्षण कडाका दाखवत होता. संपूर्ण युरोप बर्फाच्या साम्राज्याखाली आला होता. नजर जाईल तिथपर्यंत केवळ पांढरे आच्छादन दिसत होते. पण या साम्राज्याची कोणालाही तमा नव्हती. गेली आठ वर्षे युरोपच नव्हे तर संपूर्ण जग एकाच माणसाच्या राक्षसीपणात पोळून निघाले होते.

(एक चारोळी)

लेखक कुंदन यांनी मंगळवार, 08/05/2012 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
श्रेय : दोन चारोळ्या - http://www.misalpav.com/node/21589 ओळखीच्या पाणवठ्यावर रात्रभर, पिउन जाई राजकुमार ! दिसतो जरी रुबाबदार, पितो मात्र उधारीवर !!

दोन चारोळ्या -

लेखक विदेश यांनी सोमवार, 07/05/2012 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
१. अनोळखी वाटेवर क्षणभर भेटुन जाई राजकुमार - नाही दिसला पुन्हा जरी तो ओढ तयाची का अनिवार ! २. मिठीत तुझिया विसावतो मी - म्हणू लाडके कसे तुला ? चवळीची तू शेंग बारकी , दुधी टम्म मी फुगलेला !

सूर तेच छेडिता- एक संध्याकाळ अमिट(त) "अ‍ॅकॉर्डियन" बरोबर !

लेखक चौकटराजा यांनी सोमवार, 07/05/2012 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रि वाहिनीवर अमित वैद्य या पुणे स्थित कलाकाराची अ‍ॅकॉर्डियन वादनाची झलक दाखविणारी मुलाखत पाहिल्यानंतर वर्तमानपत्रात अशाच कार्यकमाची जाहिरात ही पहायला मिळाली.व कार्यक्रम विनामुल्य असल्यामुळे चिंचवड ते पुणे असे अंतर काटण्यास मन लगेचच तयार झाले. मोदक पुण्यातून आपले काम आटपून कार्यक्रमाच्या जागी भेटणार होता. मी दुपारी साडेतीनच्या सुमारास निघालो. रविवार असल्याने रस्त्यावर रहदारी बेताचीच. साडेचार चे सुमारास पुण्यात पोहोचून मग डेक्क्नवर इकडे तिकडे भटकत टाईम पास चा कार्यक्रम केला.व नव्यापेठेतील गांजवे चौकात आलो. पत्रकारभवन शेजारी कार्यक्रम होता म्हणून अंदाजानेच एका इमारतीत घुसलो,.

जन्नत २

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 07/05/2012 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
इम्रान हाश्मीचे चित्रपट चालण्याचे कारण गमतीने 'ASS' (Action, Songs, Sex) असे आम्ही कायम म्हणत आलेलो आहोत. नुकताच आलेला त्याचा जन्नत २ देखील ह्या सगळ्या अपेक्षांना पुरून उरतो. कुणाल देशमुखचे दिग्दर्शन आणि भट गँगचे प्रॉडक्शन हा चित्रपट घेऊन आले आहे. नेहमीप्रमाणेच हा चित्रपट mechanic ह्या चित्रपटावर थोडाफार बेतलेला आहे. अर्थात भट गँगची ती खासियतच आहे म्हणा.

हाऊ टू गेट पेड फॉर यू आर वर्थ

लेखक शुचि यांनी सोमवार, 07/05/2012 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच एका मित्राच्या सांगण्यावरुन, मी अ‍ॅमेझॉनवरुन पुढील पुस्तक मागविले - "हाऊ टू गेट प

वालाच्या शेंगा अन चपात्या

लेखक कुंदन यांनी सोमवार, 07/05/2012 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
राम्राम मंडळी... स्पा सारख्या आमच्या पाड्यावरच्या नवशिक्या होतकरु मित्रांसाठी ही पेशल पा कृ: वालाच्या शेंगांची रस्सा भाजी अन घडीच्या चपात्या. साहित्य : १) वालाच्या शेंगा ( नीट निवडुन , नाकी काढुन , कापुन) ( इकडे मिळतात तशा , पणं आमच्या मातोश्रीनी नीट साफ करुन वाळवुन डबा भरुन दिलाय. त्या शेंगा मी कुकर मध्ये वाफवुन घेतल्या) २) २ हिरव्या मिरच्या ३) १ मोठी लसुण पाकळी ४) मुठभर शेंगदाणे ५) १ जुडी कोथिंबीर ( निवडुन ) , कोण रे तो कोथिंबीरीच्या काड्या बोलला तो. नको असलेल्या काड्या आमच्या बिका ला द्याव्यात. ६) १ चमचा तेल , फोडणी साठी ७) हिंग-जिरे-मोहोरी-हळद इ.

सत्यमेव जयते

लेखक सोत्रि यांनी रविवार, 06/05/2012 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
भल्या भल्यांना टीव्हीच्या छोट्या पडद्याने मोहात पाडले आहे. अमिताभ, सलमान, शाहरूख ह्यांच्या मांदियाळीत आता मि. परेफेक्ट, आमिर खान, हाही सामिल होतो आहे. तो सत्यमेव जयते ह्या एका कार्यक्रमाद्वारे छोट्या पदद्यावर येतो आहे. आजपासून दर रविवारी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम १६ भागांत दाखवला जाणार आहे. ह्या कार्यक्रमाचा कॉन्सेप्ट 'थीम्ड टॉक शो' असा आहे. स्त्री भ्रूण हत्या, बाल कामगार असे वेगवेगळे सामाजिक विषय/मुद्दे घेऊन, समाजातल्या विवीध स्तरातील लोकांचे अनुभव आणि प्रतिक्रिया ह्यावर चर्चा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे.

कात्रज ते सिंहगड - (K2S) - नाईट ट्रेक - कोणी इच्छूक आहे का..?

लेखक मोदक यांनी रविवार, 06/05/2012 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रेकिंग ग्रूप मधल्या एका मित्राची NIM (Nehru Institute of Mountaineering) च्या बेसिक कोर्स साठी निवड झाल्याने त्याचा स्टॅमीना वाढवण्यासाठी आणि आम्ही सोबत म्हणून येते काही महिने दर शनिवारी (किंवा जसे जमेल तसे पण शनिवार नक्की) कात्रज ते सिंहगड ट्रेक करायचे ठरवत आहे. हा एक थकवणारा पण विलक्षण आनंद देणारा ट्रेक आहे. कात्रज जुन्या बोगद्यापासून निघाल्यानंतर एका दृष्टीक्षेपात दिसणारे झगझगीत पुणे... संपूर्ण वाटेदरम्यान खुणावणारा आणि हुलकावणी देणारा सिंहगडावरील टॉवरचा लाल दिवा... वाट दाखवणारा शीतल चंद्रप्रकाश... पौर्णीमेच्या रात्री मध्यानवेळेसारखी पडणारी आपली सावली... काळेभोर, निरभ्र आणि लुकलुकणार्‍