मला मरण यावे ते समुद्रात यावे
एकदा तरी मनसोक्त मला माशांनी खावे
आयुष्यभर मी ज्यांचे लचके तोडले
त्यांनी मला एकदा फाडले तर काय बिघडले
ज्यांच्या मऊ अंगावर मसाला लिंबू चोळून
तव्यावर खरपूस भाजून टाकले मी खाऊन
मी मेल्यावर हे हात त्यांना दिसावेत
एकदा तरी मनसोक्त मला बोंबलानी खावे.
कधी सुंगटाची कढी कधी तव्यावर जवला
वांग्याचं भरीत ,कधी कोलंबी मसाला
बाहेर पडलेल्या जिभेवर त्यांनी हक्काने बसावे
एकदा तरी मनसोक्त मला कोलंबीने खावे
कोळणीकडे निपचीत पडलेली सुरमई पापलेट
किंमत कमी करून मी दिली सारात सोडून
त्या सुरमई पापलेटाने मला कमी भावात आणावे
एकदा तरी मनसोक्त मला सुरमई पापलेटाने खावे
खोबरं लाल तिखट धणे कोकम तिरफळ खास
बांगड्याच्या तिखल्याचा मी रोज घेतला वास
त्यांना रसरशीत शरीर हे मी मेल्यावर दिसावे
एकदा तरी मनसोक्त मला बांगड्यांनी खावे
आठवड्याचे चार वार असंख्य बंधू केले ठार
जी मांदेली वाट्यावर स्वस्त एकावेळी केली दहा मी फस्त
त्या सगळ्यांनी मिळून मला चक्र व्युहात फसवावे
एकदा तरी मनसोक्त मला मांदेलीने खावे
वर्षातून एकदा महागडा हलवा घरात आणला
ज्यास्त पैसे दिले म्हणून काट्यासकट खाल्ला
त्या हलव्याने मला एकटं खिंडीत गाठावे
एकदा तरी मनसोक्त मला हलव्याने खावे
म्हणूनच मला मरण यावे ते समुद्रात यावे
एकदा तरी मला मनसोक्त मला माशांनी खावे
वाचने
4657
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
गणपाचे काय होणार ?
गेले चौर्यायशी लक्ष योनी
In reply to गणपाचे काय होणार ? by कपिलमुनी
आईगं! नको नको. त्या हलव्याने
हलवा
In reply to आईगं! नको नको. त्या हलव्याने by रेवती
गणपा ऽऽऽ
अवांतर: बरय बाबा.. तु माशेच
खास कविता. आवडेश. भीतीही
हे लिहितांना
जागु काकु तर हे वाचुन
:)
मस्त कविता.. आवडली. आधी
माझे आवडते
निसर्गनियम...
पॉर्क आवडणार्या लोकांची दया
धन्यावाद सायबा हो